Daily Archives: April 29, 2019

प्रतिष्ठेच्या निवडणुका कल कोणाकडे? कौल कोणाला?

बबन विनायक भगत   गोव्याची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा पोटनिवडणूक नुकतीच झाली. काय होते यावेळी प्रचाराचे मुद्दे आणि कोणाला असेल मतदारांचा कौल? एक विश्‍लेषण-   २०१४ साली या देशात एक मोठी लाट आली. त्या लाटेचं नाव होतं नरेंद्र मोदी. देशातील सर्वात जुना असलेला व काही वर्षांचा अपवाद सोडल्यास सतत सत्तेत राहिलेला कॉंग्रेस पक्ष या लाटेत असा काही वाहून गेला की ... Read More »

वाङ्‌मयीन संस्कृतीच्या निस्सीम उपासक ः डॉ. विजया राजाध्यक्ष

 डॉ. सोमनाथ कोमरपंत   विजयाबाईंनी अनेक महत्त्वपूर्ण वाङ्‌मयीन प्रकल्प राबविले. एकोणसत्तर वर्षे व्रतस्थ वृत्तीने साहित्यसाधना करणे आणि वाङ्‌मयीन संस्कृतीला सातत्याने स्वतःला जोडून घेणे ही सोपी गोष्ट नव्हे. अंतर्निष्ठा आणि सत्त्वशील जीवनधारणा असते तेव्हाच अशी कार्ये सिद्ध होतात. मराठी साहित्यविश्‍वात आपल्या पृथगात्म कर्तृत्वाने उठून दिसणार्‍या आणि अभिरुचिसंपन्न अशा जुन्या-नव्या दांपत्यांमध्ये राजाध्यक्ष दांपत्याची अग्रक्रमाने गणना करावी लागेल. अनिल-कुसुमावती, पु. य. देशपांडे- विमलाबाई ... Read More »

सिद्धार्थला न्याय

पणजी विधानसभा मतदारसंघाच्या येत्या पोटनिवडणुकीत अखेर उत्पल पर्रीकर यांच्या ऐवजी सिद्धार्थ कुंकळकर यांना उमेदवारी घोषित करून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने उशिरा का होईना, राजकीयदृष्ट्या उचित पाऊल उचलले आहे. ही पोटनिवडणूक लढवून वडिलांचा राजकीय वारसा चालवण्याची भले उत्पल यांची किंवा त्याहून अधिक त्यांच्या पाठीराख्यांची तीव्र इच्छा जरी असली, तरी या पोटनिवडणुकीचा एकूण रागरंग पाहता तेथे सिद्धार्थसारख्या अनुभवी व्यक्तीलाच रिंगणात उतरवणे ... Read More »

न्यायपालिकेवर पुन्हा एकदा धर्मसंकट

ल. त्र्यं. जोशी न्यायपालिका उद्ध्वस्त करण्याचे फार मोठे कारस्थान देशात शिजत आहे. सरन्याधीशांवर अशा पध्दतीने दडपण आणण्याचा प्रयत्न होत आहे यासारखे गंभीर निवेदन त्यांनी स्वत: न्यायालयात केले आहे. त्यामुळे त्या विषयाची चौकशी होणे अत्यावश्यक आहे. बारा जानेवारी २०१७ रोजी चार विद्यमान न्यायमूर्ती आणि तेही कॉलेजियमचे सदस्य यांनी घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेच्या घटनेनंतर यावेळी सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्यावरील विनयभंगाच्या आरोपामुळे ... Read More »

पणजीत भाजपची उमेदवारी अखेर सिध्दार्थ कुंकळकरांना

मागचे काही दिवस भाजपकडून पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उत्त्पल पर्रीकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र शेवटी भाजपने उमेदवारी पक्षाचे पणजी मतदारसंघातील माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांच्याच गळ्यात घातली. भाजपने सिद्धार्थ कुंकळकर व उत्त्पल पर्रीकर अशी दोन नावे निश्‍चित करून ती नवी दिल्लीला पाठवली होती. मात्र, म्हापसा मतदारसंघात आपले दिवंगत नेते फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र जोशुआ डिसोझा यांना उमेदवारी देणार्‍या भाजपने ... Read More »

नाराज न होता राजकारणातील प्रवेशासाठी प्रयत्नरत ः उत्पल

राजकारणात प्रवेश करताना सुरुवातीला अडथळे येतात. या अडथळ्यामुळे नाराज न होता राजकारणातील प्रवेशासाठी प्रयत्नरत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी दिली. पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर पत्रकारांशी उत्पल काल बोलत होते. आपले वडील मनोहर पर्रीकर यांनाही राजकारण प्रवेश करताना सुरुवातीला अडचणी आल्या होत्या. भाजपकडून दिली जाणारी जबाबदार पार पाडणार आहे, असेही उत्पल ... Read More »

पणजीत मनोहर पर्रीकरांविषयी सहानुभूती नाही : चोडणकर

पणजीतील मतदारांमध्ये दिवंगत भाजप नेते व २५ वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले मनोहर पर्रीकर यांच्याविषयी सहानुभूती नसल्याचे दिसून आल्यानेच भाजपने उत्त्पल पर्रीकर यांना उमेदवारी देण्याचे टाळल्याचे प्रदेश कॉंगे्रस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल सांगितले. मतदारसंघात पर्रीकर यांच्याविषयी सहानुभूतीची लाट आहे की काय हे जाणून घेण्यासाठीच भाजपने उत्त्पल पर्रीकर यांचे नाव पुढे केले होते. मात्र, ती नसल्याचे दिसून आल्यानेच भाजपने त्यांच्याऐवजी ... Read More »

कुंकळकरांची निवड दिल्लीतून : तेंडुलकर

पणजी मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी आम्ही नवी दिल्लीला दोन नावे पाठवली होती. त्यात पक्षाचे पणजी मतदारसंघातील माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर व पक्षाचे दिवंगत नेते आणि पणजी मतदारसंघाचे सुमारे २५ वर्षे प्रतिनिधीत्व केलेले आमदार व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्त्पल पर्रीकर यांच्या नावाचा समावेश होता, असे काल भाजपचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले. पक्षाने दोन्ही नावांचा विचार करून ... Read More »

पणजीच्या विकासासाठीच निवडणूक रिंगणात : मोन्सेर्रात

पणजी मतदारसंघाच्या विकासासाठी आपण पणजीच्या पोटनिवडणुकीत उतरलो असल्याचे काल कॉंग्रेस उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांनी सांगितले. आपण पणजीचा विकास करणार असून तो सर्वसमावेशक असा असेल, असे ते पुढे म्हणाले. आपल्या निवडणूक जाहिरनाम्यावरून नजर फिरवल्यास लोकांना ते कळून चुकणार आहे. विरोधात असलेल्या वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांपैकी तुमचा लढा हा कोणत्या पक्षाच्या उमेदवाराशी आहे असे विचारले असता सगळ्यांशी असल्याचे त्यांनी सांगितले. आपण कोणत्याही उमेदवाराला ... Read More »

गोव्याच्या कॅसिनोंसाठी नेपाळमध्ये नोकरभरती

>> वाल्मिकी नाईक यांचा आरोप गोव्यातील कॅसिनोंसाठी नेपाळ येथे नोकर भरती केली जात आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे पणजी मतदारसंघातील उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केला. कॅसिनोंमुळे गोवा राज्य जुगाराचे मोठे केंद्र बनले आहे. राज्य सरकारचे कॅसिनोंवर कोणतेही नियंत्रण नाही. कॅसिनो मालकांचा मनमानी कारभार सुरू आहे. भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने कॅसिनोंबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नाईक ... Read More »