Daily Archives: April 27, 2019

मोदी मैदानात!

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील कळसाध्याय काल लिहिला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज काल आणि परवाच्या भव्य दिव्य शक्तिप्रदर्शनानंतर दाखल केला. गुरुवारचा भव्य रोड शो, त्यानंतरच्या गंगा आरतीला मोदींनी लावलेली उपस्थिती, त्यानंतरचे भाषण या सगळ्यातून आपल्या या निवडणुकीला हिंदुत्वाचे धार्मिक गंधलेपन मोदींनी पद्धतशीरपणे केलेले दिसले. वाराणसी म्हणजेच बनारस किंवा काशी ही पुरातन धार्मिक, आध्यात्मिक नगरी ... Read More »

अंतरिक्ष युद्धासाठी भारत सज्ज आहे?

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) भारताचे भविष्य त्याच्या अंतरिक्ष सुरक्षेवर निर्भर आहे आणि त्याच्या सुरक्षेसाठी भारताला अंतरिक्ष रक्षण करणारी यंत्रणा उभी करून आपल्या ‘स्पेस इंटरेस्ट’ची सुरक्षा अबाधित राखणे आवश्यक आहे. आजमितीला युद्ध जमीन, अवकाश आणि समुद्रात खेळले जाई, पण भविष्यातील युद्धे पृथ्वीभोवती फिरणार्‍या उपग्रहांच्या मध्यात, प्राणवायू असणार्‍या वातावणापलीकडील अवकाशात खेळली जातील. अमेरिका, रशिया व चीन या युद्धासाठी कंबर कसून तयार होत ... Read More »

बाबूश, वाल्मिकी यांचे उमेदवारी अर्ज दाखल

गोवा विधानसभेच्या पणजी पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात तसेच आपचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी आपापले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍याकडे काल दाखल केले. पणजी पोट निवडणुकीसाठी १९ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. कॉंग्रेसचे उमेदवार मोन्सेरात यांनी उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी येथील चर्चमध्ये जाऊन आशीर्वाद घेतला. त्यानंतर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. मोन्सेरात यांच्या समवेत विरोधी पक्षनेते चंद्रकांत ... Read More »

भाजप उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचे नाव आज शनिवारपर्यंत जाहीर होईल, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल सांगितले. पक्षाच केंद्रीय नेते वाराणसीला गेले होते. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यास विलंब झाला असे तेंडुलकर म्हणाले. उत्त्पल की सिद्धार्थ? दरम्यान, या पोटनिवडणुकीत भाजप पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी देईल की दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्त्पल पर्रीकर ... Read More »

पणजीसाठी सुभाष वेलिंगकर गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार

गोवा सुरक्षा मंचने सुभाष वेलिंगकर यांची पणजी पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार म्हणून निवड जाहीर केली. वेलिंगकर आज आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. काल पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत मंचचे ज्येष्ठ नेते अरविंद भाटीकर यांनी सुभाष वेलिंगकर यांच्या नावाची घोषणा केली. वेलिंगकर यांची पक्षाने एकमताने निवड केली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आयाराम गयारामांचा पराभव करून तत्त्वांचे राजकारण पुढे नेण्यासाठी सुभाष वेलिंगकर ... Read More »

निवडणुकीच्या दुसर्‍याच दिवशी कर्मचार्‍यांना कामाचा आदेश

>> मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन ः ‘आप’चा दावा राज्यात दोन लोकसभा व तीन विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी दि. २३ रोजी ड्युटीवर असलेल्या व सलग सुमारे ३० तास काम केलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना २४ रोजी सुटी न देता कामावर रुजू होण्याचा जो आदेश काढण्यात आला त्याबाबत राज्यातील मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी खुलासा करावा, अशी मागणी काल आम आदमी पार्टीने केली. यासंबंधी माहिती देताना ... Read More »

गायक दलेर मेहंदी भाजपमध्ये दाखल

सुप्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी काल केंद्रीय मंत्री विजय गोयल व दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे लोकसभा उमेदवार तथा सुफी गायक हंसराज हंस व केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन हेही यावेळी उपस्थित होते. हंस यांच्या मुलाशी मेहंदी यांच्या मुलीचा विवाह झाला आहे. Read More »

बलात्कारप्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साई दोषी जाहीर

>> ३० रोजी शिक्षा सुनावणार विविध आरोपांखाली सध्या तुरुंगात असलेल्या आसाराम बापू याचा मुलगा नारायण साई याला काल येथील सत्र न्यायालयाने बलात्कारप्रकरणी दोषी असल्याचा निवाडा दिला. त्याला दि. ३० एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. एका भाविक महिलेने नारायण साई याच्याविरुद्ध २०१३ साली बलात्काराची तक्रार दाखल केली होती. सूरत पोलिसांनी आरोपींवर २०१४ साली ११०० पानांचे आरोपपत्र सादर केले होते. ४७ ... Read More »

पुन्हा मोदी सरकारसाठी लोकांची तयारी

>> वाराणसीतून उमेदवारी दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा दावा केंद्रात पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आणण्याचा निर्धार केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेच्या वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भाजपसह एनडीएच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत येथील निवडणूक अधिकार्‍यांसमोर सादर केला. भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, विदेश मंत्री सुषमा स्वराज, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य नाथ, बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार, केंद्रीय ... Read More »

मुंबई इंडियन्सने चेन्नईला नमविले

कर्णधार रोहित शर्माचे दमदार अर्धशतक आणि मलिंगासह इतर गोलंदाजांच्या सूत्रबद्ध मार्‍याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला ४६ धावांनी पराभूत करीत आयपीएलच्या १२व्या पर्वात आपल्या ७व्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे मुंबईने ११ सामन्यांतून १४ गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे. मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज संघ पूर्णपणे ढेपाळला. ... Read More »