Daily Archives: April 25, 2019

धडा काय घेणार?

श्रीलंकेत इस्टर संडेच्या पवित्र दिवशी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेमागील भयावह कटकारस्थानाचा तपशील हळूहळू बाहेर येत आहे. या स्फोटांतील मृतांचा आकडा साडे तीनशेची संख्या केव्हाच पार करून गेला आहे आणि गंभीर जखमींची प्रचंड संख्या पाहता हा आकडा आणखी वाढत जाणार आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली. जगभरातील अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आयसिस त्याचे श्रेय घेत असते, परंतु अनेकवेळा आयसिसचा अशा हल्ल्यांत ... Read More »

हल्ला श्रीलंकेवर, धोका जगाला!

शैलेंद्र देवळणकर श्रीलंकेतील हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि हे स्ङ्गोट घडवण्यासाठी जाणीवपूर्वक इस्टर संडेचा दिवस निवडण्यात आला. तसेच यासाठीची स्थळेही पूर्वनियोजित होती. या संपूर्ण प्रकाराला धार्मिक दहशतवादाचा प्रकार म्हणता येईल. विविध धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे हाच या हल्ल्यांमागचा उद्देश असतो.आज दक्षिण आशियातील कोणताही देश मूलतत्ववादापासून सुरक्षित राहिलेला नाही. ही धोक्याची घंटा आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील ८ साखळी बॉम्बस्ङ्गोटांनी संपूर्ण ... Read More »

बारावीचा निकाल मंगळवारी

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या ३० एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार आहे. बारावीच्या गुणपत्रिकांचे वितरण निकालाच्या दिवशी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० यावेळेत केले जाणार आहे. बार्देश, तिसवाडी, पेडणे, डिचोली, सत्तरी, फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यांत उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे वितरण पर्वरी येथे मंडळाच्या कार्यालयात करण्यात येणार ... Read More »

‘कॉंग्रेसची उमेदवारी मला मिळणार हे निश्‍चित होते’

>> बाबुश मोन्सेरात : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी हवी म्हणूनच आपण कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे आपणाला उमेदवारी मिळणार हे निश्‍चित होते असे बाबुश मोन्सेर्रात यांनी काल त्यांना कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगितले. या पोटनिवडणुकीत तुमचा विजय होईल याची खात्री आहे काय, असे विचारले असता मला निवडून आणायचे की नाही याचा निर्णय पणजी मतदारसंघातील ... Read More »

भाजपचा पणजीचा उमेदवार दोन दिवसात निश्‍चित : तेंडुलकर

भाजपचा पणजी मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी उमेदवार येत्या दोन दिवसात निश्‍चित केला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. भाजपच्या उमेदवारीसाठी उत्पल पर्रीकर आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपकडून सोपविण्यात येणारी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी उत्पल पर्रीकर दर्शविलेली आहे. स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्याशी विचार विनिमय करून गुरूवारी उमेदवाराच्या संभाव्य नावाबाबतचा ... Read More »

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट स्ट्रॉंग रूममध्ये

राज्यातील लोकसभा आणि विधानसभेच्या पोट निवडणुकीतील मतदानानंतर सीलबंद करण्यात आलेली ईव्हीएम यंत्रे आणि व्हीव्हीपॅट पणजी आणि मडगाव येथील स्ट्रॉंग रूममध्ये कडक सुरक्षेत ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी काल दिली. राज्यात २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मतदान केंद्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे सीलबंद करून तालुका पातळावरील केंद्रात आणण्यात आली. त्यानंतर मतदान यंत्रे जिल्हा निवडणूक कार्यालयात आणण्यात ... Read More »

उत्तरेत खाणपट्ट्यात ६० टक्के मते मिळणार : श्रीपाद

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील खाण व्याप्त भागात भाजपला सुमारे ६० टक्के मते मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी कमी झालेली असली तरी, आपला १ लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय निश्‍चित आहे, असा दावा भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला. मांद्रे मतदारसंघात भाजपचे उमेदवार दयांनद सोपटे ४ हजार आणि म्हापसा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जोशुआ डिसोझा ३ ... Read More »

श्रीलंकेच्या संरक्षण सचिवासह पोलीसप्रमुखांना राजिनाम्याचे आदेश

>> साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी अपयश ईस्टर संडेदिवशी येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी गुप्तचर यंत्रणेने आगाऊ सावधगिरीचा इशारा देऊनही हे हल्ले टाळण्यात अपयशी ठरल्याबद्दल श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी देशाचे संरक्षण सचिव हेमसिरी फर्नांडो व पोलीस प्रमुख पुजित जयसुंदरा यांना पदाचे राजिनामे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या बॉम्बहल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ३५९ वर गेली आहे. कोलंबोतील भीषण बॉम्बस्फोटानंतर देशवासियांना उद्देशून प्रथमच ... Read More »

दिल्लीतील भाजप खासदार उदित राज कॉंग्रेसमध्ये

दिल्लीचे विद्यमान भाजप खासदार उदित राज यांनी यावेळी भाजपने लोकसभेसाठी तिकीट न दिल्याने काल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेस प्रवेश केला. आपल्याला उमेदवारी दिली जाणार नाही याची माहिती आधी दिली असती तर आपण दुखावलो गेलो नसतो असे उदित राज यांनी यावेळी सांगितले. Read More »

ममता बॅनर्जी मला अजूनही दोन कुर्ते पाठवतात : मोदी

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात निवडणूक प्रचारसभांमधून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीकास्त्रांचा भडीमार सुरू असतानाच मोदी यांची मुलाखत अभिनेता अक्षय कुमार याने काल घेतली. यावेळी मोदी यांनी ममता बॅनर्जी अजूनही आपल्याला दर वर्षी दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई भेटीदाखल पाठवित असतात असे सांगितले. याचबरोबर कॉंग्रेसचे ज्येष्ट नेते गुलाम नबी आझाद यांच्याशी आपले चांगले मैत्रीसंबंध असल्याची माहिती ... Read More »