Daily Archives: April 24, 2019

माया-मुलायम एकत्र

जवळजवळ पाव शतकानंतर मुलायमसिंग आणि मायावती मैनपुरीत मंचावर आल्या. दोन्ही पक्षांमधील दोन तपांचा विसंवाद मुलायमपुत्र अखिलेश यांनी संपुष्टात आणल्यानंतर पिता मुलायम यांनीही झाले गेले विसरून मायावतींशी हातमिळवणी केले याला उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये मोठे महत्त्व आहे. विशेषतः दोन्ही पक्षांमधील आजवरचा पराकोटीचा संघर्ष लक्षात घेता हे एकत्र येणे त्या राज्यातील मतांची आणि जागांची समीकरणे बदलू शकतील का हे पाहणे खरोखर औत्सुक्याचे असणार ... Read More »

पुन्हा ‘शेषनशाही’ची गरज

ऍड. प्रदीप उमप अर्धवट मतदारयाद्या, कमी मतदान, मतदानाप्रती मध्यमवर्गीयांची अनास्था, महागडी निवडणूक प्रक्रिया, मतदारांना आमिष दाखविणे, जात, धर्माच्या आधारावर मत मागणे, आचारसंहिता भंग अशा अनेक अपप्रवृत्तींचा शिरकाव आपल्या निवडणूक प्रक्रियेत झाला आहे. आता पुन्हा शेषनशाही येण्याची गरज निर्माण झाली आहे. १७ व्या लोकसभेसाठी तिसर्‍या टप्प्यातील मतदानही झाले आहे, मात्र वास्तवातले मुद्दे अजूनही गायबच आहेत. यावरून निवडणूक आणि जनतेचे प्रश्‍न यात ... Read More »

मतदान शांततेत : उमेदवारांचे भवितव्य बंदिस्त

>> लोकसभेसाठी सुमारे ७४.६% मतदान : ईव्हीएम बिघाडामुळे मतदारांची गैरसोय; १२८ यंत्रे बदलली राज्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी सुमारे ७४.६ टक्के मतदान झाले. उत्तर गोव्यात ७३.९२ टक्के तर दक्षिण गोव्यात ७०.१५ टक्के मतदान झाले. विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी मांद्रे मतदारसंघात ८१.६१ टक्के, शिरोड्यात ८२.९९ टक्के आणि म्हापसा मतदारसंघात ७५.१७ टक्के मतदान झाले. मतदानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडले. ... Read More »

अखेर मार्ली-तिर्वाळवासियांनी घातला मतदानावर बहिष्कार

संपूर्ण गोव्यातील राजकीय पक्ष, निर्वाचन आयोगाचे अधिकारी आणि काणकोणच्या शासकीय यंत्रणेचे लक्ष लागून असलेल्या काणकोण मतदार संघातील मार्ली तिर्वाळ वाडयावरील नागरीक दुपारी दोन वाजेपर्यत मतदान केंद्रावर न आल्यामुळे या केंद्रावर सर्वत्र सन्नाटा पसरला होता. या केंद्रावर नियुक्त केलेले कर्मचारी अक्षरशा मतदारांच्या प्रतिक्षेत होते. अखेर इडीसी ५ आणि बीएलओ १ अशा ६ जणांनी मतदान केल्याची नोंद या केद्रंावर नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांना ... Read More »

मुख्यमंत्र्यांचे साखळीत मतदान

गोव्याचे मुख्यमंत्री तथा साखळीचे आमदार डॉ.प्रमोद सावंत यांनी आपल्या पत्नी सौ.सुलक्षणा सावंत यांच्या सह कोठंबी(पाळी) येथील बुथ नं.४७ सरकारी प्राथमिक विद्यालय या ठिकाणी मतदान केले. लोकसभेप्रमाणे यंदाही मतदारांमध्ये उत्साह दिसत असून मतदारांनी सकारात्मक मतदान केले आहे. राष्ट्रवादासाठी, देशाच्या सुरक्षा व भविष्यासाठी मतदान केले आहे. गोव्यातील जागा दोन्हीही जागा उत्तरेत श्रीपाद नाईक पाचव्यांदा व दक्षिणेत नरेंद्र सावईकर दुसर्‍यांदा निवडून येतील व ... Read More »

केपे, कुंकळ्ळी मतदारसंघात नादुरुस्त ईव्हीएममुळे नाराजी

सासष्टी तालुक्यातील आठही विधानसभा मतदारसंघात मतदारांमध्ये यावेळी निरुत्साह दिसून आला. केपे मतदारसंघातील आंबावली, नुवें, वेर्णा, फात्राडे, बेतुल व अवेडे येथे इव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याने लोकांनी संताप व्यक्त केला. मात्र एकूण मतदान शांततेत झाले. कुंकळ्ळी मतदारसंघातील पुलवाडा मतदान केंद्रात सकाळी ७ वाजता इंव्हीएम मशिनची चाचणी करण्यासाठी प्रत्येक पक्षाला प्रत्येकी ९ वेळा बटन दाबून मत मारण्याचे प्रात्यक्षिके घेतले असता भाजपाला १७, कॉंगे्रसला ... Read More »

चेन्नई सुपरकिंग्सचा ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश

>> वॉटसनची ९६ धावांची दमदार खेळी >> सनरायझर्स हैदराबादवर ६ गड्यांनी मात शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत काल मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा ६ गडी व १ चेंडू राखून पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ४१वा सामना एम.ए. चिदंबमरम स्टेडियमवर खेळविण्यात आला. सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेेले १७६ धावांचे किचकट लक्ष्य चेन्नईने १९.५ षटकांत गाठले. सलग अपयशी ठरूनही कर्णधार ... Read More »

बजरंग पुनियाला सुवर्णपदक

भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने चीनच्या शियानमध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आकर्षक कामगिरी करीत सुवर्णपदक प्राप्त केले. त्याचे हे आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरे सुवर्णपद होय. अंतिम लढतीत कझाखस्तानच्या सायतबेक ओकासोव्ह याला १२-७ अशा फरकाने पराभूत करत ६५ किलो वजनी गटात पुनियाने ही सुवर्ण कामगिरी केली. अंतिम लढतीत एकवेळ बजरंग प्रारंभी २-७ अशा पिछाडीवर पडला होता होता. परंतु ... Read More »