Daily Archives: April 18, 2019

संजीवनीच्या प्रतीक्षेत जेट

गेले काही दिवस मृत्युपंथाला लागलेली जेट एअरवेज ही भारतातील एकेकाळची आघाडीची विमान कंपनी नवसंजीवनीच्या प्रतीक्षेत आहे. आपली सेवा सुरू ठेवण्यासाठी हवे असलेले चारशे कोटी देण्यासही कर्जदारांनी नकार दर्शवल्याने जेटसमोर गंभीर पेचप्रसंग उभा राहिला आहे. जेट एअरवेजवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी तितक्याच रकमेचे समभाग बाजारात उतरवण्याची स्टेट बँकेने पुढे केलेली योजना जर कर्जदारांना मंजूर झाली तर ‘किंगफिशर’च्या वाटेने जाण्याचे ‘जेट’ चे भोग ... Read More »

‘अङ्गस्पा’ शिथीलीकरणाची गरजच काय?

शैलेंद्र देवळणकर जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला लागू असलेला आर्मड् ङ्गोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट अर्थात अङ्गस्पा हा कायदा काढून टाकण्याची अथवा शिथील करण्याची चर्चा सध्या पुन्हा एकदा सुरू झाली आहे. याबाबतच्या विचारामागे भारतीय लष्कराकडून या कायद्याचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा सांगितला जातो; पण तो पूर्णतः चुकीचा आहे. उलट हा कायदा मागे घेण्याचे दुष्परिणाम अधिक आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला ... Read More »

जेट एअरवेजने गाशा गुंडाळला

>> बँकांचा ४०० कोटी कर्ज देण्यास नकार >> २० हजार कर्मचार्‍यांवर टांगती तलवार कर्जबाजारी झालेल्या जेट एअरवेज कंपनीला ४०० कोटी रुपयांचे अंतरिम कर्ज देण्यास बँकांनी नकार दिल्याने काल बुधवारी मध्यरात्रीपासून आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काल मध्यरात्रीनंतर जेट एअरवेजची सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित झाली आहेत. जेट एअरवेजच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी ... Read More »

बंधूप्रेमात अडकले, ते राजकारणात संपले

>> गडकरींचा सुदिन ढवळीकरांवर हल्लाबोल मगोने कॉंग्रेस पक्षाबरोबर केलेली युती विचारांची नसून फक्त स्वार्थापुरती आहे. मगोला बंधूप्रेम बाधले आहेत. आपला इतिहास सांगतो की, बंधू प्रेमामध्ये किंवा नात्यागोत्यात अडकलेली व्यक्ती राजकारणामध्ये संपते. मगो नेते सुदिन ढवळीकर हे त्याच दिशेने गेल्याची टीका केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी काल मांद्रे येथे भाजपच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना केली. गडकरी म्हणाले, ... Read More »

मुख्यमंत्र्यांनी घेतली मंत्र्यांबरोबर आढावा बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल आपल्या मंत्र्यांबरोबर एक आढावा बैठक घेतली. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने बैठकीत कोणत्याही विकास कामांवर चर्चा करता आली नाही, असे पत्रकारांशी बोलताना मंत्र्यांनी सांगितले. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठक घेता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व मंत्री यांची भेट होऊ शकली नव्हती. या पार्श्‍वभूमीवर काल ही अनौपचारिक अशी बैठक घेण्यात आल्याचे मंत्री रोहन ... Read More »

बाबुश मोन्सेर्रात यांचा गोवा फॉरवर्डला रामराम

Read More »

घसरलेली कामगिरी सरकारसाठी चपराक

>> कॉंग्रेसचा पत्रकार परिषदेत टोला ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ने ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या काळात केलेल्या सर्व्हेमध्ये गोवा सरकारची कामगिरी ही अत्यंत वाईट व सामान्यपेक्षाही खाली गेल्याचे आढळून आले असल्याचे म्हटले असून सरकारसाठी ही एक मोठी चपराक आहे, असे काल कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. वरील पाहणीत रोजगार, स्वस्त अन्नधान्य व चांगल्या आरोग्य सुविधा या तिन्ही ... Read More »

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञा भाजपमध्ये

>> भोपाळमधून कॉंग्रेसच्या दिग्विजय सिंहांविरोधात लढणार मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून त्या लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. भोपाळमध्ये त्यांचा मुकाबला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवराज सिंह चौहान, रामलाल आणि प्रभात झा हे भाजपचे बडे नेते साध्वी प्रज्ञा यांच्या संपर्कात होते. अखेर त्यांच्यात ... Read More »

हैदराबादसमोर चेन्नईची शरणागती

>> वॉर्नर-बॅअरस्टोवची तडाखेबंद फलंदाजी >> राशिद खानचा प्रभावी मारा डेव्हिड वॉर्नर व जॉनी बॅअरस्टोव यांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर ‘ऑरेंज आर्मी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सनरायझर्स हैदराबादने काल बुधवारी चेन्नई सुपरकिंग्सचा १९ चेंडू व ६ गडी राखून दारुण पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ३३वा सामना राजीव गांधी स्टेडियमवर खेळविण्यात आला. वॉर्नर-बॅअरस्टोव जोडीने केवळ ५.४ षटकांत दिलेल्या ६६ धावांच्या घणाघाती ... Read More »

जोफ्रा आर्चरला संधी नाही

>> इंग्लंडच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा इंग्लंड क्रिकेट मंडळाने काल बुधवारी विश्‍वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला. या संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला स्थान देण्यात आलेले नाही. परंतु, पुढील महिन्यात आयर्लंडविरुद्ध होणारा एकदिवसीय तसेच पाकिस्तानविरुद्धचा एकमेव टी-ट्वेंटी सामना व पाच एकदिवसीय सामन्यांसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. या सामन्यांतील कामगिरीच्या आधारे त्याची तसेच ख्रिस जॉर्डन याची ऐनवेळी ... Read More »