Daily Archives: April 17, 2019

उत्पलचे पदार्पण

शरद पवारांसारख्या मुरब्बी नेत्याला थेट निशाणा करीत उत्पल मनोहर पर्रीकर यांचे गोव्याच्या राजकीय क्षितिजावर दमदार पदार्पण झाले आहे. राजकारणातील दुधाचे दात अजून पडलेले नसताना थेट पवारांना प्रत्युत्तर देण्याची हिंमत त्यांनी दाखवली हे विस्मयकारक आहे. आपल्या दिवंगत पित्याच्या नावाने राजकारण करू नका असे त्यांनी पवारांना बजावले. वास्तविक, ‘राफेल करारातील बदलांशी सहमत नसल्याने पर्रीकर संरक्षणमंत्रिपद सोडून गोव्यात परतले’ एवढेच पवार म्हणाले होते, ... Read More »

राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

ऍड. प्रदीप उमप निवडणुकीत राजकीय पक्षांना मिळालेल्या गलेलठ्ठ देणग्या हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला असून, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता नष्ट होते असे मानले जाते. यावर तोडगा म्हणून काढण्यात आलेल्या निवडणूक बॉंड्‌समुळे उलट अधिक अपारदर्शकता आणली. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आता याविषयी कठोर भूमिका घेतली आहे. राजकीय पक्षांना निवडणुका लढवण्यासाठी लागणारा निधी हा कायमच चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या ३०-३५ वर्षांत राजकीय ... Read More »

मोदी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर खाणप्रश्‍नी तोडगा

>> केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची ग्वाही >> मोदी सरकार पुन्हा येणार असल्याचा केला दावा केंद्रात नव्याने मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यासाठी शक्य ती सगळी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग व नागरी विमान उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. खाण, पर्यटन व मच्छीमारी या तीन उद्योगांवर ... Read More »

निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

>> सहाय्यक निवडणूक अधिकार्‍यांनी दिली माहिती लोकसभेसाठीच्या दोन जागा व विधानसभेसाठीच्या तीन पोटनिवडणुका आठ दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील १६५२ मतदान केंद्रे सज्ज करण्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती काल राज्याचे सहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी दिली. मतदानासाठी येणार्‍या लोकांना ऊनात उभे रहावे लागू नये यासाठी यावेळी सर्व १६५२ मतदान केंद्रांवर मंडप घालण्यात येणार आहेत, असे सावंत यांनी ... Read More »

फा. कोसेसांव डिसिल्वांना जिल्हाधिकार्‍यांकडून समज

>> भाजपविरोधी वादग्रस्त वक्तव्य प्रकरण दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजप नेत्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे राय येथील चर्चचे फादर कोसेसांव डिसिल्वा यांनी चौकशीच्या वेळी माफीनामा सादर केला. राय चर्चचे फादर डिसिल्वा यांचा माफीनामा स्वीकारण्यात आला असून यापुढे अशा प्रकारची कोणतेही वक्तव्य न करण्याची समज त्यांना देण्यात आली आहे. फादर डिसिल्वा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे मान्य केले असून या वक्तव्यामुळे जनतेची ... Read More »

वेल्लोर येथील लोकसभा निवडणूक रद्द

>> पैशांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर निवडणूक आयोगाच्या शिफारशीनंतर काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडूच्या वेल्लोर मतदारसंघातील मतदान रद्द करण्याचे आदेश दिले. वेल्लोरमध्ये १८ एप्रिलला मतदान होणार होते. मात्र, या मतदारसंघातील निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे येथील मतदान प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस केली होती. या ठिकाणी मतदारांना भुलवण्यासाठी पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याची ... Read More »

गोवा डेअरीचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे अखेर ताबा

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशानंतर गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसू सावंत यांनी गोवा डेअरीचा ताबा सात महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा कालपासून स्वीकारला आहे. दरम्यान, गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी सहकार निबंधकांकडून चार महिन्यांत चौकशी पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तत्कालीन सहकार निबंधक संजीव गडकर यांनी ३१ ऑगस्ट २०१८ रोजी एका आदेशाद्वारे गोवा ... Read More »

निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अपुरी माहिती

>> एडीआरची पत्रकार परिषदेत माहिती लोकसभा आणि विधानसभेच्या पोट निवडणूक रिंगणात असलेल्या काही उमेदवारांनी निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अपुरी माहिती दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांच्या नजरेस ही बाब आणून देण्यात आलेली आहे, अशी माहिती एडीआरचे गोवा राज्य समन्वयक भास्कर असोल्डेकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. निवडणूक अधिकार्‍यांकडे काही उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अपुरी माहिती देण्यात ... Read More »

पंजाबची राजस्थानवर १२ धावांनी मात

>> रविचंद्रन अश्‍विनची अष्टपैलू चमक किंग्स इलेव्हन पंजाबने काल मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील ३२व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा १२ धावांनी पराभव केला. किंग्स पंजाबने १८२ धावांचा यशस्वी बचाव करताना राजस्थानचा डाव ७ बाद १६८ धावांवर रोखला. धावांचा पाठलाग करताना राहुल त्रिपाठीने जोस बटलरसह राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी ३८ धावा जोडल्या. अर्शदीपने धोकादायक बटलरला बाद करत ... Read More »

गोव्याचा मेघालयावर विजय

>> ‘अ’ गटात द्वितीय स्थान; उपांत्य फेरीतील स्थान निश्‍चित गोव्याने मेघालयाचा २-१ अशा गोलफरकाने पराभव करीत लुधियाना येथे सुरू असलेल्या हीरो संतोष चषक २०१८-१९ राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत काल शानदार विजयासह ‘अ’ गटात द्वितीय स्थान मिळविले. चैतन कोमरपंत आणि व्हिक्टोरिनो फर्नांडिस यांनी गोव्याचे गोला नोंदविले. आता उपांत्य फेरीत गोव्याची लढत ‘ब’ गटात अव्वल राहणार्‍या संघाशी होणार आहे. विजयानंतर ... Read More »