Daily Archives: April 10, 2019

काश्मीर धगधगले

भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात अत्यंत कणखर भूमिका स्वीकारण्याची ग्वाही दिल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये वातावरण विलक्षण पेटल्याचे दिसते आहे. विशेषतः भाजपच्या जाहीरनाम्यात काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० आणि ३५ अ हटविण्याचे वचन देण्यात आलेले असल्याने काश्मिरी नेत्यांचा तीळपापड उडाला आहे. फारुख अब्दुल्लांपासून मेहबुबा मुफ्तींपर्यंत सारे काश्मिरी नेते एका सुरात त्याच्या विरोधात उभे ठाकले आहेत. ३७० वे कलम हटवलेत ... Read More »

आव्हान आपल्या लोकशाहीतील विसंगतींचे!

ऍड. प्रदीप उमप आपल्या लोकशाहीत अनेक प्रकारच्या विसंगती असल्यामुळे सत्तर वर्षांत लोकशाहीचे मोठे नुकसान झाले आहे. विविध भागातील मतदारांच्या मताचे मूल्य समान नाही. एवढेच नव्हे तर प्रसंगी दोन ठिकाणच्या मतांच्या मूल्यात ६० पटींपेक्षा अधिक तङ्गावत दिसून येते. मतदारसंघांच्या ङ्गेररचनेवेळी अनेक मुद्दे लक्षात घेतले गेलेले नाहीत.. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण लोकशाही राज्यव्यवस्थेचा स्वीकार केला, परंतु आज सत्तर वर्षे उलटून गेली तरी लोकशाहीत ... Read More »

पणजी विधानसभा मतदारसंघासाठी १९ मे रोजी पोटनिवडणूक जाहीर

दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघात येत्या १९ मे रोजी पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. पर्रीकर यांचे गेल्या १७ मार्च रोजी निधन झाले होते. त्यामुळे २३ एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभेच्या तीन पोट निवडणुकीच्या वेळी पणजी मतदारसंघात पोट निवडणूक घेण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. निवडणूक आयोगाने गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातील ... Read More »

पंतप्रधान मोदी यांची आज गोव्यात सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज ताळगाव पठारावरील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार आहे. स्टेडियममध्ये सुमारे १० हजार एवढी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय स्टेडियमबाहेर मोठा शामियाना उभारण्यात येणार असून तेथे लोकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. शामियान्यात स्क्रीनची व्यवस्था असल्याने तेथे लोकांना स्क्रीनवरून मोदी यांचे भाषण ऐकता येणार आहे. मोदी यांची गोव्यात होणारी ही तिसरी जाहीर सभा असून ... Read More »

सर्वोच्च न्यायालयात खाणींसाठी प्रतिज्ञापत्र सादरीकरणाची मागणी

नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर राज्यातील खाण अवलंबितांनी तीन दिवसीय धरणे आंदोलनाला कालपासून प्रारंभ केला असून धरणे ११ एप्रिलपर्यंत चालणार आहे. राज्यातील बंद खाण पडलेला व्यवसाय पुन्हा त्वरीत पुन्हा सुरू करावा, अशी मागणी आहे. गोवा विधानसभेत खाण प्रश्‍नी संमत केलेला ठराव आणि दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्राला खाण बंदीनंतर पाठविलेल्या पत्राच्या आधार घेऊन राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात खाणी सुरू ... Read More »

भाजप आमदारासह ५ जण नक्षली हल्ल्यात ठार

छत्तीसगडमधील दंत्तेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपचे आमदार भीमा मांडावी तसेच त्यांच्या वाहन ताफ्यातील ४ सुरक्षा रक्षक ठार झाले. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली होती. तरीही हा हल्ला झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. आमदार भीमा मांडावी यांच्या बुलेटप्रुफ वाहनावर आयईडी ... Read More »

ताळगावात दुकान आगीत भस्मसात ः ५० लाखांची हानी

ताळगाव येथील ट्रेड लिंक या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानाला काल दुपारी लागलेल्या आगीत दुकानातील सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले असून अंदाजे ५० ते ५५ लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुकानाचे मालक साईप्रसाद नाईक दुपारी पावणे दोनच्या सुमारास दुकान बंद करून घरी जेवणासाठी गेले होते. सव्वा दोनच्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याची माहिती नाईक यांना मिळाली. पणजी ... Read More »

उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती विरोधात कॉंग्रेस आव्हान देणार

>> आचारसंहिता उल्लंघनाचा दावा गोव्यात निवडणूक आचारसंहिता लागू असताना गोवा सरकारने दोघा जणांची जी उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे त्या प्रकरणी कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे नोंदवलेल्या तक्रारीवर आयोगाने आपला निवाडा दिला नाही तर कॉंग्रेस पक्ष पुढील ४८ तासांत उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रवक्ते ऍड. रोहित ब्रास डिसा यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. डिसा म्हणाले की, वरील प्रकरणी आम्ही २१ ... Read More »

सुपर किंग्सची केकेआरवर कुरघोडी

गोलंदाजांच्या भन्नाट मार्‍याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने काल मंगळवारी बलाढ्य कोलकाता नाईट रायडर्सचा ७ गडी व १६ चेंडू राखून पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा २३वा सामना चेपॉकच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी ठेवलेले १०९ धावांचे किरकोळ लक्ष्य १७.२ षटकांत गाठून चेन्नईने घरच्या मैदानावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. संथ खेळपट्टीवर वेगाने धावा ... Read More »

‘किंग्स कप’मध्ये खेळणार भारत

थायलंडमध्ये जूनमध्ये होणार्‍या निमंत्रितांच्या ‘किंग्स कप’ स्पर्धेत भारताचा फुटबॉल संघ सहभाग नोंदविणार आहे. ३६,००० प्रेक्षक क्षमता असलेल्या बुरिराम येथील चांग एरिनावर स्पर्धेतील सर्व सामने खेळविले जाणार आहेत. भारताव्यतिरिक्त यजमान थायलंड, व्हिएतनाम व कुराकाओ हे देश या स्पर्धेत खेळणार आहेत. एप्रिल महिन्यातील फिफा क्रमवारीनुसार भारत १०१व्या, थायलंड ११४व्या, व्हिएतनाम ९८व्या तर कुराकाओ ८२व्या स्थानी आहे. ५ जून रोजी दोन सामने होणार ... Read More »