Daily Archives: April 9, 2019

राष्ट्रीय सुरक्षेवर भर

सतराव्या लोकसभेच्या येत्या निवडणुकीसाठीचा आपला जाहीरनामा भारतीय जनता पक्षाने काल जारी केला. कॉंग्रेसने आपला जाहीरनामा आधीच जाहीर केलेला आहे, त्यात सर्व गरीब जनतेला किमान उत्पन्नाद्वारे ‘न्याय’ देण्यावर भर दिलेला होता, तर भाजपाच्या ह्या जाहीरनाम्यामधील मुख्य भर हा राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयांवर असल्याचे दिसते आहे. ईशान्येतील राज्यांतील घुसखोरीपासून काश्मीरमधील दहशतवादापर्यंतच्या सर्व समस्यांवर आपले सरकार आल्यास आक्रमक नीती स्वीकारील असे आश्वासन भाजपाने ह्या ... Read More »

संधिसाधू पक्षबदलू आणि सुस्त मतदार…

देवेश कु. कडकडे वास्तव असे की अनेकजण तत्त्वे खुंटीला टांगून वार्‍याची दिशा ओळखून पक्ष बदलतात. निवडणुका जशा जवळ येतात तसा कोणता पक्ष बाजी मारेल याचा अंदाज घेत अनेकांची पळापळ आणि पळवापळवी सुरू होते. जनता ही आमदार – खासदार यांना केवळ आपले एक मत देऊन निवडून देत नसते, तर त्या मतांमध्ये त्यांच्या आशा आकांक्षांचे बळ असते. निवडणुकांमध्ये पक्ष आपले जाहीरनामे प्रसिद्ध ... Read More »

लोकसभेसाठी भाजप-कॉंग्रेस यांच्यातच प्रमुख लढत

>> विधानसभा पोटनिवडणुकीत बहुरंगी लढती ः दोनच अपक्षांची माघार लोकसभा आणि गोवा विधानसभेच्या तीन मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघातील प्रत्येकी एका उमेदवारांनी मिळून एकूण दोन उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. लोकसभेच्या दोन जागांसाठी १२ उमेदवार आणि तीन विधानसभा मतदारसंघातून १६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघात भाजप आणि कॉंग्रेस ... Read More »

दिल्लीतील जंतरमंतरवर आजपासून खाण अवलंबितांचे धरणे आंदोलन

नवी दिल्ली येथील जंतर मंतर येथे राज्यातील खाण अवलंबितांनी आज मंगळवार ९ ते ११ एप्रिल दरम्यान खाण बंदीच्या प्रश्‍नाकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी काल दिली. सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील खाण प्रश्‍नी एक याचिका १५ एप्रिलला सुनावणीला येण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर खाण अवलंबितांनी धरणे ... Read More »

आश्‍वासनांची खैरात करणारा भाजपचा जाहीरनामा पंतप्रधान मोदींहस्ते जाहीर

‘संकल्पित भारत, सशक्त भारत’ या घोषवाक्याखालील विविध अशा सुमारे ७५ आश्‍वासनांची खैरात करणारा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा भाजपने काल प्रकाशित केला. गतीमानतेने राम मंदिर उभारणी, घटनेतील जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करणे या महत्त्वाच्या आश्‍वासनांचा समावेश असलेला हा ४५ पानी जाहीरनामा प्रकाशित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर तपशीलवार भाष्य केले. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविणे हा ... Read More »

पाकचे एफ-१६ पाडल्याचे पुरावे हवाई दलाकडून जाहीर

गेल्या २७ फेब्रुवारी रोजीच्या हवाई चकमकी दरम्यान आपले एफ-१६ विमान पाडले गेले नाही असा दावा करणार्‍या पाकिस्तानला काल भारतीय हवाई दलाने त्यासंदर्भातील पुरावे सादर करून उघडे पाडले. भारतीय हवाई दलाचे एअर व्हाईस मार्शल आर. जी. कपूर यांनी काल प्रसारमाध्यमांसमोर या प्रकरणीची तपशीलवार माहिती पुराव्यांसह मांडली. पाकचे एफ-१६ विमान भारतीय हवाई दलाच्या मिग-२१ बायसन या विमानानेच या चकमकींवेळी पाडल्याचे या पुराव्यांद्वारे ... Read More »

कॅसिनो मधील कामगारांची नावे मतदारयादीप्रश्‍नी अहवाल सादर

>> मुख्य निवडणूक अधिकार्‍याची माहिती येत्या २३ एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली असून राज्यात ११ लाख ३५ हजार ८१० मतदार आहेत. निवडणूक कार्यालयाने जानेवारी महिन्यात मतदारयादी जाहीर केली होती. मागील दोन महिन्यात सुमारे ४२०० मतदारांची संख्या वाढली आहे. उत्तर गोवा मतदारसंघात ५ लाख ५६ हजार ६२५ मतदार आहेत. तर, दक्षिण गोव्यात ५ लाख ७९ ... Read More »

शिरोड्यात कॉंग्रेसचे मगोबरोबर फिक्सिंग ः मुख्यमंत्री सावंत

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या गोव्यात सभा ः तयारी जोरात सुरू शिरोड्यात कॉंग्रेसने मगोबरोबर फिक्सिंग केले आहे. त्यामुळे महादेव नाईक यांचा बळी जाणार असून भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांचाच विजय होणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेवेळी सांगितले. यावेळी मांद्रे मतदारसंघाविषयी बोलताना ते म्हणाले की, काल (रविवारी) दिवसभर आपण मांद्रे मतदारसंघात होतो. तेथे कॉंग्रेस, मगोमध्ये प्रचंड घोळ ... Read More »

मोहालीत पंजाबची पुन्हा बाजी

>> राहुलची नाबाद खेळी >> मयांकचेही अर्धशतक >> हैदराबादवर ६ गड्यांनी मात लोकेश राहुल आणि मयांक अग्रवालच्या शानदा अर्धशतकी खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने मोहालीतील आपला विजयी अश्वमेध चालूच ठेवताना काल अंतिम षट्‌कापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत सनरायझर्स हैदराबादला ६ गड्यांनी पराभूत केले. पंजाबचा हा मोहालीतील सलग सातवा विजय ठरला. सनराझर्स हैदराबादकडून मिळालेले १५१ धावांचे आव्हान किंग्ज इेलेव्हन पंजाबने २०व्या षट्‌काच्या ... Read More »

सेंट रॉक्स यूथ क्लबला अजिंक्यपद

यजमान सेंट रॉक्स यूथ क्लबने अंतिम सामन्यात डॉन बॉस्को ओरेटरी फातोर्डाचा ३-० असा एकतर्फी पराभव करीत ३०व्या सेंट रॉक्स चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. पहिल्या सत्रात १६व्या मिनिटाला यजमान सेंट रॉक्स यूथ क्लबने आपले खाते खोलले. १०व्या मिनिटाला गोल करण्याची सोपी संधी गमावलेल्या फ्लेसबन फेर्रावने वेंडेल कुयेल्होकडून मिळालेल्या अचूक क्रॉसवर १६व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी डॉन बॉस्को ओरेटरीचा गोलरक्षक स्विझेल परेराला चकवित ... Read More »