Daily Archives: April 8, 2019

लक्ष वायनाडकडे

अमेठीबरोबरच केरळमधील वायनाडमधून राहुल गांधी लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. एखाद्या उमेदवाराने एकाहून अधिक ठिकाणांहून निवडणूक लढवणे काही नवीन नाही आणि त्यात गैरही काही नाही. मात्र, अशा प्रकारे एकाहून अधिक ठिकाणांहून निवडणूक लढवणार्‍यांचा आपल्या मतदारसंघातील स्वतःच्या लोकप्रियतेविषयीचा आणि तेथून जिंकण्याविषयीचा आत्मविश्वास डळमळला आहे की काय असा प्रश्न मात्र जनतेला पडत असतो. कोणताही धोका पत्करावा लागू नये म्हणूनच असे पर्यायी मतदारसंघ निवडले ... Read More »

शिंग फुंकिले रणी…

ल. त्र्यं. जोशी भाजपा आपल्या दीडदीडशे उमेदवारांच्या याद्या झपाट्याने जाहीर करु शकली. त्याच्या मित्रपक्षांनाही तिकिटवाटपाबाबत फारशा अडचणी आल्या नाहीत. सपा – बसपा आघाडीतील तिकिटवाटपही भांडणांविना झाले. कॉंग्रेसच्या तिकिटवाटपाबाबत मात्र नेहमीप्रमाणेच घोळ झाला व तो शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या मुदतीपर्यंत चालणार आहे… तिकिटवाटप व प्रचार मोहीम ही निवडणुकीची दोन चाके आहेत. त्यांच्या आधारेच निवडणुकीचा गाडा पुढे जात असतो. खरे ... Read More »

जम्मू-श्रीनगर महामार्ग रविवारी व बुधवारी नागरी वाहनांना बंद ठेवण्याच्या राज्यपाल प्रशासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीमुळे काल या महामार्गानजीक सुमारे ३००० वाहने अडकून पडल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. याविरोधात निदर्शनेही झाली. वाहनांना जवान रोखतानाचे दृश्य. Read More »

निवडणुकांचे एकूण चित्र आज होणार स्पष्ट

>> उमेदवारी मागे घेण्याचा आज अंतिम दिवस लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ८ एप्रिल ही अंतिम तारीख असून आजच निवडणुकीचे एकंदर चित्र स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघातून प्रत्येक ६ उमेदवारी अर्ज ग्राह्य झाले आहेत. उत्तर गोव्यातून भाजपचे श्रीपाद नाईक, कॉंग्रेसचे गिरीश चोडणकर, आपचे दत्तात्रय पाडगावकर, आरपीआयचे अमित कोरगावकर, अपक्ष ऐश्‍वर्या साळगावकर ... Read More »

चिंबलच्या व्यावसायिकाचे अपहरण फसले

गवळेभाट चिंबल येथील एका बार ऍण्ड रेस्टॉरंट मालक विश्‍वंभर शिरवईकर यांचे खुनाच्या हेतूने अपहरण ओल्ड गोवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसले असून या प्रकरणी चार जणांना काल अटक करण्यात आली. अशी माहिती पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी काल दिली. या प्रकरणी अनार वागमुडे, चेतन वागमुडे, विनायक वागमुडे आणि गौरीश फातर्पेकर (सर्व मेरशी) अशा चार जणांना अटक करण्यात आली आहे. गवळेभाट चिंबल येथील ... Read More »

‘स्पीड ब्रेकर दिदींनी’ केले प. बंगालला बदनाम : मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कुच बिहारमधील भाजपच्या एका निवडणूक प्रचार सभेत पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची ‘स्पीड ब्रेकर दिदी’ अशा शब्दात संभावना करीत त्यांच्यावर घणाघाती टीका केली. केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांवर ‘स्पीड ब्रेकर दिदींनी’ ब्रेक लगावला आहे असा आरोप मोदी यांनी यावेळी केला. शारदा घोटाळा, रोज व्हॅली घोटाळा व अन्य घोटाळ्यांमुळे ममता बॅनर्जीनी बंगालचे नाव बदनाम केल्याची ... Read More »

मोहनदास पै विद्याधिराज पुरस्काराने सन्मानित

विद्याधिराज पुरस्कार बेंगलोर येथील अक्षय पात्राचे जनक टी.वी. मोहनदास पै तर गंगोळळी येथील एच गणेश कामथ व नगर सदाशिव नायक याना सामाजिक कार्याच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल जीवोत्तम पुरस्काराने पर्तगाळी मठात काल आयोजित समारंभात सन्मानित करण्यात आले. पर्तगाळी येथील वटवृक्षाची प्रतिकृती, रोख पंचवीस हजार रू. मानपत्र असे विद्याधिराज पुरस्काराचे स्वरूप असून दक्षिणाभिमुख हनुमंताची प्रतिकृती, मानपत्र आणि रोख १५ हजार रू. असे जीवोत्तम ... Read More »

लोकसभा, मांद्य्रातील मगोच्या पाठिंब्यावर लवकरच निर्णय

मगो पक्षाच्या लोकसभा आणि मांद्रे मतदारसंघातील पाठिंब्याबाबत निर्णय १२ एप्रिलपर्यंत घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मगो पक्ष ८ एप्रिलपर्यंत लोकसभा आणि मांद्रे मतदारसंघातील उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेणार आहे, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, ८ रोजी पाठिंब्याबाबत निर्णय घेण्यासाठी आयोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आगामी दोन – तीन दिवसात मगो पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक घेतली जाण्याची ... Read More »

बंगलोरचा सलग सहावा पराभव

>> दिल्ली कॅपिटल्सचा चार गड्यांनी विजय कर्णधार श्रेयस अय्यरने टोकलेले अर्धशतक व कगिसो रबाडाच्या प्रभावी मार्‍यावर आरुढ होत दिल्ली कॅपिटल्सने काल रविवारी रविवारी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १२व्या पर्वातील विसाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ४ गड्यांनी पराभव केला. बंगळुरुचा या हंगामातला हा सलग सहावा पराभव ठरला आहे. १५० धावांचे माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश लावणे बंगलोरच्या गोलंदाजांना ... Read More »

केकेआरसमोर राजस्थान ‘लिन’

कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा ८ गडी व ३७ चेंडू राखून पराभव करत इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील आपली विजयी दौड कायम राखली. स्टीव स्मिथच्या नाबाद ७३ धावांनंतरही राजस्थानचा डाव १३९ धावांत रोखताना केकेआरने विजयी लक्ष्य अवघ्या १३.५ षटकांत गाठले. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांना खेळपट्टीशी जुळवून घेता आले नाही. अजिंक्य रहाणे स्वस्तात परतल्यानंतर जोस बटलर व ... Read More »