Monthly Archives: April 2019

संभ्रम पसरवू नये

यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा एकेक टप्पा मागे पडत चालला आहे, तसतशी निकालांबाबतची उत्सुकता वाढते आहे. देशाचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी यंदाची ही लोकसभेची निवडणूक आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत काही अगदी मोजके अपवाद वगळता मतदान सुरळीतपणे पार पडले आहे. परंतु विरोधी पक्षांनी मात्र मतदानयंत्रांवरच शंका घेत विरोधाची राळ उडवून दिलेली दिसते आहे. जवळजवळ एकवीस विरोधी पक्षांनी मतदानयंत्रांद्वारे निवडणूक घेण्याच्या प्रक्रियेविषयीच ... Read More »

राजची भूमिका मनसेला तारणार?

देवेश कु. कडकडे लोकसभा निवडणुकांचे निकाल भले कसेही आले तरी पुढच्या विधानसभेच्या निवडणुकात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मनसेला सोबत घ्यावेच लागेल, कारण कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या या निवडणुकीतील यश-अपयशाचा एक भागीदार राज ठाकरे असतील. जर कॉंग्रेस आघाडीने सहभागासाठी राज ठाकरे यांच्यासमोर नकारघंटा वाजवली, तर तेे विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीचीही अपयशाची लक्तरे वेशीवर टांगण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. निवडणुका जाहीर होताच सर्वप्रथम सर्वच पक्षांत उमेदवारीसाठी ... Read More »

मोदी, शहांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

>> आचारसंहिता उल्लंघन प्रकरण लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत दाखल केलेल्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवारी सुनावणी होणार असून या सुनावणीकडे तमाम देशवासीयांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष शहा यांच्यावर आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. ... Read More »

चौथ्या टप्प्यात ६४% मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील ७१ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७६ टक्के मतदानाची नोंद झाली. तर देशपातळीवर सरासरी ६४ टक्के मतदान झाले. तुरळक हिंसेचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. तर जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघात येणार्‍या कुलागाममध्ये अवघे १०.३ टक्के मतदान झाले. चौथ्या टप्प्यात बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात भाग घेतला. त्या अमिताभ बच्चन, जया बच्चन, ... Read More »

कुंकळ्येकर, वेलिंगकर यांचे उमेदवारी अर्ज

>> पणजी विधानसभा पोटनिवडणूक गोवा विधानसभेच्या पणजी मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी उमेदवारी अर्ज येथील निवडणूक अधिकार्‍यांकडे काल सादर केले. पोट निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे बाबुश मोन्सेर्रात, आम आदमी पार्टीचे वाल्मिकी नाईक यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. पोट निवडणुकीसाठी एकूण १० उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. उमेदवारांच्या अर्जांची छाननी ... Read More »

ताळगाव पंचायतीवर पुन्हा बाबुश मोन्सेर्रात गटाचे वर्चस्व

ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेर्रात आणि माजी मंत्री बाबुश मोन्सेर्रात यांच्या ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेेंट फ्रंटने ताळगाव पंचायतीच्या सर्व अकरा जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ताळगाव पंचायतीच्या १० प्रभागांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या मतदानातील मतमोजणी कांपाल, पणजी येथील बालभवनाच्या आवारात काल झाली. प्रभाग १ मध्ये रेघा पै (६७.६३ टक्के), प्रभाग २ मध्ये तेरेझा बार्रेटो (७८.४० टक्के), प्रभाग ४ महादेव कुंकळ्ळीकर (५४.५३ ... Read More »

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पालवाडा, उसगाव येथे निर्घृण खून

पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून रवींद्र शांताराम गावडे (३३) याचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्याचा प्रकार पालवाडा-उसगाव येथे घडला असून संशयित आरोपी अंकुश सूर्यकांत गावडे (४३) याला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. हा खुनाचा प्रकार रविवारी २८ रोजी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालवाडा-उसगाव येथील अंकुश सूर्यकांत गावडे याने रवींद्र शांताराम गावडे याच्यावर कोयत्याने वार ... Read More »

पंजाबचा ४५ धावांनी दारुण पराभव

>> सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक सत्कारणी किंग्स इलेव्हन पंजाबला काल सोमवारी सनरायझर्स हैदराबादकडून ४५ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ४८ वा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला. सनरायझर्सने विजयासाठी ठेवलेल्या २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाबला केवळ १६७ धावांपर्यंत मजल मारता आली. डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्स पंजाबला चांगल्या सुरुवातीची ... Read More »

सावईवेरच्या मदनंत स्पोर्ट्‌स क्लबला जेतेपद

पंकज तारीच्या नाबाद ३८ धावांच्या खेळीच्या जोरावर सावईवेरेच्या मदनंत स्पोर्ट्‌स क्लबने अंतिम सामन्यात ताळगावच्या सिद्धेश टायगर्स संघाचा ४ गड्यांनी पराभव करीत चिंबलच्या एसए क्रिकेटर्सने आयोजित केलेल्या २र्‍या अखिल गोवा टी-१० लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश टायगर्स संघाला ७ गडी गमावत ८० अशी धावसंख्या उभारता आली. शिशिर दिवकरने नाबाद २० तर निखिल दिवजीकरने २८ धावा जोडल्या. मदनंततर्फे ... Read More »

डिस्लेक्सिया ः वाचनातील अक्षमता

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) एक नॉर्मल मूल केजी किंवा बालवाडीमध्ये अक्षरं शिकतं आणि पहिलीत गेल्यावर वाचायला लागतं. पण या मुलांना बालवाडीत अक्षरओळख होत नाही. १ल्या-२र्‍या वर्गात गेल्यानंतरही त्यांना वाचता येत नाही. बरं, इतर गोष्टींमध्ये एकदम तल्लख असल्याने पालक गोंधळतात. या मुलांच्या क्षमतेनुसार अभ्यास करण्यासाठी तसे वातावरण तयार करा. एखाद्या शांत जागी त्यांचा अभ्यास घ्यावा. दिलेला अभ्यास पूर्ण करण्यास अधिक ... Read More »