ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: October 18, 2018

आकाश, अंकितचा सनसनाटी विजय

पणजी (क्री.प्र.) पहिल्या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स खुल्या बुद्धिबळ स्पर्धेतील काल बुधवारचा दिवस धक्कादायक निकालांचा ठरला. गोवा बुद्धिबळ संघटनेने ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित या स्पर्धेत काल आंतरराष्ट्रीय मास्टर आकाश जी. व फिडे मास्टर गजवा अंकित यांनी गाजवला. अव्वल मानांकन लाभलेला ग्रँडमास्टर क्रास्टसिव मार्टिन (२६५४) व ग्रँडमास्टर आलेक्झांडर प्रेडके यांना अनुक्रमे अंकित (२२५४) व आकाश (२४२४) यांनी पराभवाचा धक्का ... Read More »

चाहत्यांना गर्व वाटेल अशी कामगिरी करू ः सर्जिओ

पणजी (क्री. प्र.) गोव्यातील सामन्यात आपलेे खेळाडू चाहत्यांना गर्व वाटेल अशी कामगिरी करतील, असा विश्वास एफसी गोवाचे स्पॅनिश प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांनी काल बांबोळी येथील ऍथलेटिक स्टेडियमवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. आम्ही पुन्हा एकदा गोलांची बरसात करण्यासाठी सज्ज झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा संघ बराच मजबूत असून संघासाठी गोल होणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. ... Read More »

एटीकेला विजय गवसला; दिल्लीवर मात

दिल्ली बदली खेळाडू अल मैमौनीने सामना संपण्यास केवळ ६ मिनिटे बाकी असताना नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर ऍटलेटिको दी कोलकाताने दिल्ली डायनॅमोजवर २-० अशी मात करीत इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. नेहरू स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला. एटीकेचे खाते २०व्या मिनिटाला बलवंत सिंगने उघडले होते. दिल्लीने ५४व्या मिनिटास कर्णधार प्रीतम कोटल याच्या गोलमुळे बरोबरी साधली होती. एटीकेचे ... Read More »

काणकोण बस स्थानकाची स्थिती दयनीय

पैंगीण (प्रतिनिधी) काणकोण कदंब बसस्थानकाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन १४ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. आज या बसस्थानकाची अवस्था दयनीय झाली असल्याच्या प्रवासी वर्गाच्या तक्रारी आहेत. कदंब परिवहन महामंडळाने या बसस्थानकाचे त्वरित नूतनीकरण करण्याची मागणी काणकोणच्या नागरिकांनी केली आहे. विजय पै खोत यांच्या प्रयत्नाने काणकोणात गोवा राज्य पायाभूत विकास महामंडळातर्फे भव्य बसस्थानक बांधण्यात आले होते. २००४ साली या बसस्थानकाचे ... Read More »

भारताने टी-२० मालिका जिंकली

भोपाळ कर्णधार अजय रेड्डीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताने तिसर्‍या सामन्यात श्रीलंकेवर २० धावांनी मात करीत दृष्टिहिनांच्या ५ लढतींच्या टी-२० क्रिकेट मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षट्‌कांत ५ गडी गमावत २०९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. भारताचा कर्णधार अजय रेड्डीने नाबाद ८३ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. डी वेंकटेश्वराने ३५ तर दुर्गा रावने नाबाद ३४ ... Read More »

अकबरनामा

‘मी टू’ मोहिमेमुळे गोत्यात येऊनही कालपरवापर्यंत ‘तो मी नव्हेच’ च्या पवित्र्यात राहिलेले एकेकाळचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकार आणि सध्याचे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एम. जे. अकबर यांना शेवटी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले. अकबर यांच्या विरोधात तक्रार करणार्‍यांची संख्या मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढता वाढता वाढत जाऊन आजवर वीस महिलांपर्यंत पोहोचली आहे. अशा कर्तृत्ववान माणसाला मंत्रिपदावर आणखी राहू देेणे ‘बेटी बचाव, ... Read More »

काश्मीरमधील निवडणुकांचा संदेश आणि आव्हाने

जम्मू-काश्मिरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यापैकी ज्या नगरपरिषदा, शहरी स्थानिक संस्था यांच्या निवडणुकांना सुरुवात झाली आहे. एकूण १३ जिल्ह्यांतील ७९ नगरपालिकांमधील ३८० शहर स्थानिक समित्यांच्या निवडणुका ४ टप्प्यात पार पडल्या. जम्मू-काश्मिरची सद्य परिस्थिती आणि अशांतता पाहता या निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत. कारण तब्बल १३ वर्षांनंतर या निवडणुका पार पडल्या आहेत. अशा प्रकारच्या निवडणुकांसाठी १९५२ मध्ये भारतीय राज्यघटनेत ... Read More »

बोडगेश्वर फुगडी मंडळ राज्यात अव्वल

पेडणे (न. प्र.) लोककला सादर करून राज्यात हमखास प्रथम व दुसरे पारितोषिक पटकावणारे श्री देव बोडगेश्वर फुगडी मंडळ सध्या राज्यातील एक आघाडीचे युवा फुगडी मंडळ म्हणून नावारूपास येत आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी अखिल गोवा फुगडी स्पर्धा झाली त्यात या मंडळाने सहभागी होवून प्रथम क्रमांकही खेचून आणण्याची किमया केली आहे. हे एक युवा मंडळ असून यातील कलाकार आपले शिक्षण करूनही ... Read More »

आयुष मंत्रालयाचा तीन वर्षांत १२ देशांसोबत करार

पणजी केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना करून गत चार वर्षात वसुधैव कुटुम्बकम या भावनेने जागतिक स्तरावर सर्वांसाठी भारतीय उपचार पद्धती पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. योग हे त्याचेच एक उदाहरण आहे. तसेच आयुष मंत्रालयाने तीन वर्षात १२ देशांसोबत यासंबंधीचे करार केले असून ४० देशात ५८ माहिती केंद्रे उभी केली आहेत, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी ... Read More »

तिसर्‍या मांडवी पुलाचा अखेरचा पर्वरीत ‘डेक स्लॅब’ बसवला

पर्वरी (न. प्र.) मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाचा पर्वरीच्या बाजूचा शेवटचा ‘डेक स्लॅब’ बसविण्यात आला. काल बुधवारी गोवा राज्य पायाभूत विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर यांच्या हस्ते हा स्लॅब बसविण्यात आला. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने पर्वरी आणि पणजी ही दोन शहरे आता जोडली गेली आहेत. या पुलाचे जवळजवळ ९० टक्के काम पूर्ण झाले असून जानेवारी २०१९ च्या दुसर्‍या ... Read More »