ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: October 11, 2018

विरोधकांची महायुती ही अयशस्वी कल्पना ः मोदी

नवी दिल्ली कॉंग्रेससह विविध विरोधी पक्षांनी एक होऊन महायुती करण्याचा केलेला खटाटोप ही एक अपयशस्वी कल्पना असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाजप कार्यकर्त्यांशी मोदी ऍपवरून संवाद साधताना केली. हे विविध पक्ष परस्परांशी भांडत असतात. मात्र त्यांना जेव्हा सत्ता स्थापनेची जाणीव होते त्यावेळी ते एकत्र येतात आणि कर्नाटकमधील विद्यमान सरकार हे याबाबतचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. Read More »

नगरनियोजन मंडळाची बैठक पुन्हा स्थगित

पणजी (प्रतिनिधी) नगरनियोजन मंडळाची काल बुधवारी आयोजित बैठक पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली. नगरनियोजन मंडळाची ऑगस्ट महिन्यात आयोजित बैठक काही कारणास्तव स्थगित करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात ही बैठक पहिल्यांदा स्थगित करण्यात आली. या बैठकीत कळंगुट – कांदोळी बाह्य विकास आराखडे, जमीन रूपांतराचे दर, ओडीपी नवीन नियम आदी विषय चर्चेसाठी होते. Read More »

पोलीस खात्यातील ४०० कर्मचार्‍यांच्या बदल्या

पणजी (प्रतिनिधी) पोलीस खात्यातील ४०० कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस खात्यातील पोलीस साहाय्यक उपनिरीक्षक, हवालदार, शिपाई यांच्या बदल्यांचे दोन आदेश पोलीस मुख्यालयातून जारी करण्यात आले आहेत. पहिल्या बदली आदेशात २४३ पोलीस कर्मचारी आणि दुसर्‍या बदली आदेशातून १५७ पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. Read More »

मुख्यमंत्र्यांकडून सर्व मंत्र्यांना उद्या दिल्लीत पाचारण

पणजी (न. प्र.) मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्याकडील खाती पुढील आठवड्यात मंत्र्यांना वाटणार असून या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना उद्या दि. १२ रोजी नवी दिल्लीतील एम्स इस्पितळात बोलावले आहे. बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्याबरोबरच आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, मंत्री बाबू आजगावकर, महसूल मंत्री रोहन खंवटे, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, मच्छीमारी मंत्री विनोद पालयेकर, ... Read More »

कॉंग्रेसचे राज्यपालांना पाचवे निवेदन

पणजी (न. प्र.) विरोधी कॉंग्रेस पक्षाचे आमदार व प्रदेश कॉंग्रेस समितीच्या सदस्यानी काल राजभवनवर राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांना एक निवेदन सादर करून खाण लिज नूतनीकरण घोटाळा प्रकरणी कॉंग्रेस पक्षाने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच खाण सचिव पवन कुमार सेन, खाण संचालक प्रसन्न आचार्य तसेच मुख्यमंत्र्याचे सचिव कृष्णमूर्ती यांच्याविरुद्ध ३ व ४ ऑक्टोबर रोजी जी तक्रार ... Read More »

गोव्यात येऊन महत्त्वाचा निर्णय घेणार ः फ्रान्सिस

पणजी (न. प्र.) पर्रीकर मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेले व कर्करोगावर सध्या अमेरिकेत उपचार घेणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार फ्रान्सिस डिसोझा हे १७ ऑक्टोबरनंतर गोव्यात पोचणार आहेत. गोव्यात आल्यानंतर आपण एक महत्वाचा निर्णय घेणार आहे. पण नक्की कोणता निर्णय ते सांगण्यास त्यांनी नकार दिला. काल ह्या प्रतिनिधीशी बोलताना डिसोझा म्हणाले की, १० ऑकेटबर रोजी माझे उपचार संपणार होते व ११ रोजी आपण ... Read More »

राफेल कराराच्या निर्णय प्रक्रियेचा तपशील द्या

नवी दिल्ली भारत व फ्रान्स यांच्यातील राफेल जेट लढाऊ विमाने खरेदीसाठी झालेल्या करारामधील निर्णय प्रक्रियेची माहिती सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काल या प्रकरणीच्या सुनावणीवेळी केंद्र सरकारला दिले. मात्र न्यायालय या अनुषंगाने नोटीस बजावणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर सरकारनेही करारातील तांत्रिक बाबींची माहिती सादर न करता केवळ निर्णय प्रक्रियेचीच सविस्तर माहिती बंद लिफाफ्यात सादर करावी असे न्यायालयाने म्हटले आहे. ... Read More »

भाजप सरकार झोपले आहे काय? ः प्रतापसिंह

राज्यातील नागरिकांना मागील दोन वर्षापासून विविध प्रश्‍नांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. खाण उद्योग बंद पडला आहे. राज्यात नवीन उद्योगधंदे येत नाहीत. भाजपच्या एका पदाधिकार्‍याच्या आस्थापनामधून कॅटमाईन अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी कोणतीही कारवाई केली जात नाही, राज्यात भ्रष्टाचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रशासन ठप्प झालेले आहे. भाजप सरकार झोपले आहे की झोपेचे सोंग करीत आहे? असा प्रश्‍न ... Read More »

सरकार अस्तित्वहीन झाल्याने भ्रष्टाचारात वाढ

पणजी (प्रतिनिधी) कॉंग्रेस पक्षाने काल राजधानी पणजीत भ्रष्टाचार विरोधात जागृती मोर्चा काढून आझाद मैदानावरील जाहीर सभेत भाजप आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध सरकारी खात्यांत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. सरकारने कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेसच्या आमदारांना गृहीत धरू नये. कॉंग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचार विरोधी जागराची त्वरित दखल घेऊन सरकारी पातळीवरील कारभारात सुधारणा करावी. अन्यथा, भ्रष्टाचाराच्या विरोधातील पुढील मोर्चा अन्य ठिकाणी वळवावा लागेल, असा ... Read More »

दीपराज कोळमकरने जिंकली मिनी मॅरेथॉन शर्यत

साखळी (न. वा.) साखळीतील ईगल स्पोर्ट्स क्लब आयोजित मिनी मॅरेथॉन शर्यतीचे प्रथम बक्षीस कुडणे येथील महालक्ष्मी हायस्कूलचा विद्यार्थी दीपराज कोळमकर याने प्राप्त केले. त्याला बक्षीसाच्या स्वरुपात रोख रु. ३००० व चषक प्राप्त झाला. साखळी मार्केट ते पर्ये सत्तरी येथील श्री भूमिका मंदिरापर्यंतच्या अंतराच्या या स्पर्धेत २५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. दीपराज कोळमकर यांच्या बरोबरच महालक्ष्मी हायस्कूलच्या, गौरेश मळीक, प्रथमेश सुतार, ... Read More »