ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: October 10, 2018

मोठ्या आतड्याचा व गुद भागाचा कर्करोग

आता आपण पाहूयात की कोलोरेक्टल कॅन्सरचे निदान कोणकोणत्या चाचण्या करून केले जाते. ह्यालाच स्क्रिनिंग असे देखील वैद्यकीय परिभाषेत म्हणतात. मोठ्या आतड्यातील ऍडिनोमॅटस पॉलिप्स हे जर समजल्यावर लगेच काढून टाकले तर पुढे होणारा कोलोरेक्टल कॅन्सर टाळता येतो. तसेच ज्या व्यक्तींमध्ये कर्करोगाची कोणतीच लक्षणे आढळत नाहीत त्यांच्यात योग्य पाठपुरावा केल्यास मोठ्या आतड्याचा कर्करोग स्थानिक अवस्थेत असतानाच कळून येतो. हे स्क्रीनिंग प्रामुख्याने अशा ... Read More »

व्यसनमुक्ती आठवडा

देशात सध्या व्यसनमुक्ती आठवडा साजरा केला जात आहे. या दिवसाचा उद्देश म्हणजे व्यसनमुक्त देश घडविणे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे नेहमी संदेश दिले आहेत. अंमलीपदार्थ समाजाकरिता अत्यंत घातक विष आहे. कारण व्यसन फक्त मानवालाच नाही तर संपूर्ण समाजाला पोकळ करते. आजच्या या वेळेत मानव भरकटत चाललाय. आपल्या लक्ष्याला जलद गतीने प्राप्त करण्याकरिता ... Read More »

मुलांचे आरोग्य पालकांच्या हाती

मुलांबद्दल पालकांच्या फक्त आणि फक्त तक्रारीच असतात… तीही एखाद-दुसरी तक्रार नव्हे.. तर भरपूर तक्रारी असतात. असे का बरे व्हावे?? – मुले नीट जेवत नाही… ही तक्रार सर्रासपणे सर्वच आया करतात. – मुले सांगितल्याशिवाय अभ्यास करत नाहीत. – मुले सतत टिव्ही पाहतात. – त्यांना मोबाइल हवाच. त्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. अगदी पाळण्यातील बाळसुद्धा मोबाइलवर गाणं लावल्यावर शांत होते. – अभ्याससुद्धा ... Read More »

आरोग्य कूटप्रश्‍नावली

कूट म्हणजे कोडं. कूट म्हणजे पर्वत (जसा चित्रकूट) तसाच कूट या शब्दाचा अर्थ आहे गहन, रहस्यमय, गुहेसारखा गूढ नि खोल. परमेश्‍वराला गीतेत ‘कूटस्थ’ असं म्हटलंय.आपल्या लोकसंस्कृतीत अशी कोडी, उखाणे, प्रश्‍नमालिका खूपच असतात. कहाण्या, गीत, नृत्यं, नाट्य इतकंच काय पण काही क्रीडाप्रकारातूनही व्यक्त होतात. अशा प्रश्‍नोत्तरात लावणीचा सवाल-जवाब (कलगीतुरा), तेनाली रमण, बिरबल असा हजरजबाबी माणसांचे किस्सेही येऊन जातात. साहित्याचं, संस्कृतीचं हे ... Read More »

शेतकर्‍यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील : आमदार सोपटे

पेडणे (न. प्र.) शेतकरी शेती उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह चालवत असतात. विविध कृषियोजना कार्यरत असल्या तरी त्या वाढवण्याची गरज आहे. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार भविष्यात अधिक योजना मिळवून देण्यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करणार आहे. शेतकर्‍यांनी कृषी योजनांचा लाभ घेऊन पडीक शेती ओलिताखाली आणावी असे आवाहन आमदार दयानंद सोपटे यांनी सावंतवाडा, मांद्रे येथे केले. पेडणे तालुका शेतकरी सोसायटीच्या भात कापणी व मळणी यंत्राच्या ... Read More »

काणकोणात खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण

पैंगीण (न. प्र.) काणकोण तालुक्यात या दिवसात वारंवार खंडित होण्यार्‍या वीज पुरवठ्यामुळे या भागातील नागरिक संतप्त बनले आहेत. त्याचा येथील पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला असल्याचे काणकोणच्या माजी नगराध्यक्ष सूचना गावकर यांचे म्हणणे आहे. गेले आठ दिवस नळाला एक तासही दिवसाला पाणी येत नसल्याचे त्यांनी सांगितले. सकाळच्यावेळी कामावर जाणारे कुटुंब सदस्य व मुलांना टिफीन बनविणार्‍या गृहिणींना या खंडित वीज पुरवठ्यामुळे बर्‍याच ... Read More »

होंडा पंचायतीची इमारत धोकादायक

वाळपई (न. प्र.) होंडा पंचायतीची इमारत धोकादायक स्थितीत असून पंचायतीने डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. होंडा पंचायतीची इमारत बांधून वीस वर्षापेक्षा अधिक काळ झाला असून त्या इमारतीची डागडुजी न केल्याने इमारत मोडकळीस आली आहे. इमारतीच्या तळ मजल्यावर दुकाने आहेत. इमारतीच्या तळमजल्यावरील दुकाने सोडल्यास दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावरील जागा अशीच पडली आहे. पंचायत त्यासाठी काहीही करताना दिसत नाही. त्यामुळे ती इमारत ... Read More »

केरीत साडेतीन मीटर लांबीचा अजगर!

मोर्ले (न. वा.) केरी-सत्तरी येथील व्यंकटराव ऊर्फ बबन राणे यांच्या घराच्या छतावर असलेला सुमारे साडेतीन मीटर लांबीचा अजगर काल रविवारी सर्पमित्र विराज(वीरू) नाईक व अमेय (बिट्टू) नाईक यांनी पकडला व त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले. बबन राणे यांनी सर्पमित्र विराज नाईक याला फोन केल्यानंतर लागलीच विराज व अमेय त्याठिकाणी पोचून त्यांनी अजगराला पकडले. विराज नाईक यांनी यापूर्वी किंग कोब्रा पकडले ... Read More »

पणजीत ‘ज्येष्ठांची धम्माल २’ उत्साहात

पणजी हौशी ज्येष्ठ कलाकारांना आपल्या अंगभूत कलांच्या आविष्कार करण्याची संधी देणारा ‘ज्येष्ठांची धम्माल २’’ हा कार्यक्रम’ आयोजित करणारे गोवा आर्ट सर्कलचे शशिकांत सरदेसाई आणि ऍड. सुभाष सावंत हे अभिनंदनास पात्र असून अशाप्रकारचे कार्यक्रम नियमित आयोजित करावे, असे उद्गार गोव्याचे माजी ऍडव्होकेट जनरल (अधिवक्ता) ज्येष्ठ विधिज्ञ सुरेश लोटलीकर यांनी काढले. गोवा आर्ट सर्कलने कला आणि संस्कृती संचालनालयाचा सहयोगाने रविवार दि. ८ ... Read More »

भारताची विजयी हॅट्‌ट्रिक

जोहोर बाहरू कर्णधार मनदीप मोर याने ४२व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावल्याने भारतीय हॉकी संघाने काल मंगळवारी सुलतान ऑफ जोहोर कप स्पर्धेत जपानवर १-० असा विजय संपादन केला. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या सत्रात काही मिनिटे खेळ थांबविण्यात आला होता. भारताचा आक्रमक खेळ थोपविण्याचे काम जपानच्या शिस्तबद्ध बचावफळीने केले. पहिल्या सत्रात भारताने एका पेनल्टी कॉर्नरसह काही संधी निर्माण केल्या. परंतु, गोल नोंदविण्याच्या ... Read More »