ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: August 21, 2018

आव्हान उभारणीचे

पुराने कहर केलेल्या केरळमधील परिस्थिती पावसाने थोडी उसंत घेतल्याने हळूहळू का होईना, पूर्वपदावर येऊ लागली आहे. धरणांची दारे उघडल्याने नद्यांचे दुथडी भरून वाहणारे पाणीही हळूहळू ओसरू लागले आहे. मदत छावण्यांमध्ये आश्रयाला गेलेले नागरिक आपल्या घरादारांमध्ये परतू लागले आहेत. घरांत भरलेला गाळ उपसू लागले आहेत. गेलेल्या चीजवस्तूंचा अंदाज घेऊ लागले आहेत. पुन्हा नव्याने शून्यातून उभे राहण्यासाठी धडपडू लागले आहेत. एका महाआपत्तीनंतर ... Read More »

भारतापुढील समस्या आणि आव्हाने

  देवेश कु. कडकडे (डिचोली) आपण अजूनही रूढवादी मान्यता, प्रथांचा नकारात्मक दृष्टीकोन फेकून देऊन समानता आणि बंधुभावाच्या सिद्धांन्तावर विश्‍वास ठेवत नाही. आज आपल्या देशाला सर्वात जास्त आवश्यकता आहे ह्या भावनात्मक शुद्धीकरणाची. पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशवासियांना संदेश देताना आपल्या साडेचार वर्षांच्या कारकीर्दीचा लेखाजोगा मांडला. भविष्यातील आव्हानांचा आलेख मांडताना रोजगार, महिला सुरक्षा, देशातील अंतर्गत सुरक्षा, काश्मीर प्रश्‍न, यावर भर ... Read More »

म्हादई : कर्नाटकविरुद्ध अवमान याचिका दाखल

कर्नाटकने म्हादईचे पाणी बेकायदेशीररित्या अडविले असून या कृतीची गंभीर दखल घेत काल गोवा सरकारने कर्नाटक विरोधात म्हादई जलतंटा लवादासमोर काल अवमान याचिका दाखल केली. दरम्यान, म्हादई पाणीवाटप लवादाची मुदत २० ऑगस्ट रोजी संपत असतानाच लवादासमोर गोव्याने कर्नाटकविरोधात अवमान याचिका दाखल केल्याने लवादाची मुदत आणखी एका वर्षासाठी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला लवादाने आंतरराज्य जलविवाद कायदा १९५६च्या अंतर्गत गोवा, ... Read More »

जगात दहशतवादावरील चर्चेला सुरुवात वाजपेयींमुळेच : मोदी

वाजपेयींनी काश्मीरविषयी केलेल्या कामगिरीमुळे संपूर्ण जगाचा दृष्टिकोन बदलून जगात दहशतवादावर चर्चा सुरू झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत बोलताना केले. अणुचाचणीपासून काश्मीरसारख्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या भरीव कामगिरीमुळे भारताची जगात एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख निर्माण झाली अशा शब्दांनी मोदी यांनी यावेळी वाजपेयींचा गौरव केला. काश्मीर समस्या सोडवण्याबाबतच्या वाजपेयी यांच्या योगदानाबाबत बोलताना ... Read More »

गोमेकॉत कर्करोग विभाग उभारण्याची तयारी जोरात

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग विभाग उभारण्यासाठीची तयारी सध्या जोरात सुरू असून काम सुरू झाल्यानंतर १४ महिन्यांत हा विभाग उभा करण्याचे लक्ष्य आरोग्य खात्याने ठेवले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी इमेलद्वारे काल दिली. ते सध्या इंग्लंडमध्ये आहेत. ह्या विभागाच्या इमारत नकाशासाठीचे काम पूर्ण झालेले आहे. विभागासाठी हवे असलेले साहित्य आणण्यासाठीची तयारीही चालू आहे. ह्या विभागाची इमारत उभारण्याचे काम गोवा ... Read More »

वाळपई पाठोपाठ सांगेतही १०० इंच पाऊस

राज्यात मोसमी पावसाने इंचाचे शतक अद्याप गाठलेले नसले तरी, वाळपई पाठोपाठ आता सांगे तालुक्यात मोसमी पावसाने इंचाची शंभरी गाठली आहे. वाळपई येथे आत्तापर्यंत १२५. २८ इंच आणि सांगे येथे १००.१२ इंच पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासात सांगे येथे २ इंच पावसाची नोंद झाली आहे. फोंडा येथे साधारण १ इंच तर इतर भागात किरकोळ पावसाची नोंद झाली आहे. राज्यात ... Read More »

नगरविकासमंत्री फ्रांसिस डिसोझा उपचारासाठी अमेरिकेला रवाना

उपचारासाठी मुंबईला गेलेले नगरविकास खात्याचे मंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी काल दुपारी पुढील उपचारासाठी अमेरिकेकडे प्रयाण केले. मुंबईतील डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते अमेरिकेकडे रवाना झाले. त्यांच्या समवेत त्यांची पत्नी व मुलगा असून ते उपचारासाठी महिनाभर अमेरिकेत राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला त्यांनी त्यासंबंधी कळवले आहे. फ्रान्सिस डिसोझा यांनी गेल्या महिन्यात मुंबईतील लीलावती इस्पितळात उपचार घेतले होते. आजारी असल्याने ... Read More »

वीज मंत्र्यांविरुद्ध खोटी माहिती पोस्ट केल्याने महिलेविरुद्ध पोलीस तक्रार

मुंबईतील इस्पितळामध्ये मागील तीन महिने उपचार घेणारे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या आरोग्याविषयी खोटी माहिती फेसबुकवर पोस्ट करणार्‍या संकिता घाडी (सुर्ला, डिचोली) हिच्या विरोधात ओल्ड गोवा पोलीस स्टेशन आणि सायबर क्राईम पोलीस स्टेशनवर तक्रार काल दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, सदर तक्रार वरील दोन्ही पोलीस स्टेशनच्या कक्षेत येत नसल्याने ‘ती’ पर्वरी पोलीस स्टेशनकडे वर्ग केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस खात्यातील ... Read More »

मुतालिकांवरील बंदी दोन महिन्यांनी वाढविली

उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्यावरील बंदीत वाढ करण्यात आली आहे. १३ ऑगस्टपासून पुढील ६० दिवसांसाठी उत्तर गोव्यात येण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी लेव्हिन्सन मार्टिन्स यांनी १४४ कलमाखाली प्रमोद मुतालिक तसेच त्यांचे सहकारी व श्रीराम सेनेचे सदस्य यांच्यावर ही बंदी घातली आहे. २०१४ पासून त्यांच्यावर गोव्यात येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. Read More »

विनेश फोगाटला सुवर्ण

>> सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आशियाई खेळांमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत विनेशने जपानच्या इरी युकी या प्रतिस्पर्ध्यावर ६-२ अशी मात केली. या विजयासह विनेश आशियाई खेळांमध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू होण्याचा मान मिळविला. पहिल्या डावात विनेशने बेसावध असलेल्या जपानच्या प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्याचा प्रयत्न केला. विनेशचा ... Read More »