ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: August 20, 2018

केरळची हाक

देवभूमी केरळमध्ये सध्या आकांत मांडला आहे. गेल्या आठ ऑगस्टपासून पडलेल्या प्रचंड पावसामुळे जवळजवळ अर्ध्याहून अधिक केरळ बुडाले आहे. घरे बुडाली, दरडी कोसळल्या, रस्ते वाहून गेले. वीज नाही, पिण्याचे पाणी नाही, संपर्काची साधने नाहीत, पेट्रोल – डिझेल नाही अशा परिस्थितीत जागोजागी अडकून पडलेल्या नागरिकांच्या मदतीला एनडीआरएफची तब्बल ५५ पथके, नौदल, तटरक्षक दल, हवाई दल वावरते आहे. राज्य प्रशासनाच्या मदतीला शेजारचे कर्नाटक ... Read More »

अजातशत्रू अटलजी

अशोक टंडन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी भारताच्या इतिहासातील एक महान नेते होते. अत्यंत हुशार, संवेदनशील, मृदुस्वभावी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची ओळख देशाला आहे. संघ परिवारापलीकडे अनेक विचारांच्या, अनेक पक्षांच्या नेत्यांशी वाजपेयी यांची घट्ट मैत्री होती. अटलजींनी आपल्या वर्तनातून मैत्री कशी असावी याचा आदर्श अनेक रूपांत ठेवला आहे. भारतीय राजकारणातील अटलजींचे स्थान ... Read More »

म्हादई प्रश्‍नावर गोव्याची उद्या लवादासमोर अवमान याचिका

कर्नाटकाने म्हादईचे पाणी बेकायदा अडविले असून या कृतीची गंभीर दखल घेत गोवा सरकारने कर्नाटकाविरोधात म्हादई जलतंटा लवादासमोर अवमान याचिका दाखल करण्याचे ठरविले आहे. उद्या मंगळवारी सदर अवमान याचिका सादर केली जाणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी काल दिली. म्हादई जलतंटा लवादाने म्हादईचे पाणी वळविण्यास आक्षेप घेतला आहे. तरीही कर्नाटकाने लवादाच्या आदेशाला न जुमानता पाणी वळविले आहे. राज्य सरकारने कर्नाटकाच्या विरोधात ... Read More »

केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू

मुसळधार पाऊस व पुरामुळे आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त जणांचा बळी गेलेल्या केरळमधील पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पॉप फ्रान्सिस यांनी आंतरराष्ट्रीय जनसमुदायाला केरळातील पूरग्रस्तांना मदत करण्याची हाक दिली आहे. शनिवारी केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० कोटींची मदत जाहीर केली होती. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाला असून राज्य सरकारने रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. महाराष्ट्र ... Read More »

…तर गोव्यावर केरळप्रमाणे आपत्ती

>> पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचा इशारा गोव्याने पर्यावरणाच्या रक्षणार्थ वेळीच आवश्यक उपाययोजना न केल्यास केरळ प्रमाणे आपत्तीच्या परिणामांना तोंड द्यावे लागेल, असा इशारा प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना काल दिला आहे. केरळ राज्यावर ओढवलेल्या आपत्तीवर मत व्यक्त करताना पर्यावरणतज्ज्ञ गाडगीळ यांनी वरील मत व्यक्त केले आहे. गाडगीळ यांनी काही वर्षांपासून पश्‍चिम घाटाचा अभ्यास केलेला आहे. इतर राज्याप्रमाणे गोव्यात ... Read More »

१४ लाखांचे विदेशी चलन दाबोळी विमानतळावर जप्त

दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईत एका विदेशी नागरिकांकडून चौदा लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा बंगळूरूहू दुबईला जाणार्‍या प्रवाशाकडे विदेशी चलन सापडले. कस्टम विभाग गोवाचे आयुक्त आर. मनोहर यांनी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी उशिरा रात्री बंगळुरू – गोवा – दुबई मार्गे जाणार्‍या एअर इंडिया (क्र. एआय- ९९३) विमानामधून बंगळुरूहून दुबईला जाणार्‍या एका विदेशी नागरिकांची झडती ... Read More »

पणजी-मडगाव महामार्गावर अजूनही वाहतुकीची कोंडी

पणजी-मडगाव महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने तेथे होणारी मेगा ब्लॉकची समस्या सोडवण्यासाठी सरकारने रस्त्याची दुरुस्ती केलेली असली तरी अजूनही काही प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. रविवारी सुटीचा दिवस असूनही या रस्त्यावर वेळोवेळी १५ ते २० मिनिटे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत होत्या. मडगावहून पणजीच्या दिशेने येणार्‍या वाहनाना जास्त करून ह्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन ... Read More »

६० हजार बायो शौचालये खरेदीच्या प्रक्रियेला गती

>> कचरा व्यवस्थापन महामंडळाची निविदा जारी >> २०१९ पर्यंत राज्य हगणदारी मुक्तीचे ध्येय गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने ६० हजार बायो शौचालयांच्या खरेदीसाठी निविदा जारी केली असून सरकारने डिसेंबर २०१९ पर्यंत राज्याला उघड्यावरील शौचापासून मुक्त करण्याचे ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. गोवा राज्य विकासकामामध्ये आघाडीवर आहे. परंतु, देशपातळीवर गोवा राज्य हगणदारी मुक्तीमध्ये मागे आहे. राज्यात दोनच जिल्हे ... Read More »

बजरंगला गोल्ड

अंतिम फेरीत जपानच्या ताकातानी दायची याचा कडवा प्रतिकार ११-८ असा मोडून काढत भारतीय कुस्तीपटू बजरंग पूनिया याने भारताला १८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात बजरंग पूनियाने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना उझबेकिस्तानच्या खासानोव सिरोजुद्दिन याचा पहिल्या फेरीत तांत्रिक वर्चस्वाच्या आधारे १३-३ असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पूनिया प्रारंभी ०-३ असा पिछाडीवर पडला ... Read More »

अपूर्वी- रवी कुमारला कांस्य

>> १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकार इंडोनेशियात सुरू असलेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पहिल्याच दिवशी भारतीय नेमबाजांनी पदकाची कमाई केली आहे. १० मी. एअर रायफल सांघिक प्रकारात भारताच्या अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने कांस्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत कोरिया, मंगोलिया यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांची कडवी झुंज मोडून काढत भारतीय जोडीने ४२९.९ गुणांचा वेध घेत कांस्यपदकाची कमाई केली. सुरुवातीच्या काही ... Read More »