ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: August 16, 2018

दृढसंकल्प

भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाला दरवर्षीप्रमाणे संबोधित केले. पुढील वर्ष हे लोकसभा निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे मोदी यांचे या कार्यकाळातील स्वातंत्र्यदिनाचे हे शेवटचे भाषण होते. साहजिकच त्यावर त्यांच्या सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कामगिरीची दाट छाया होती. सन २०१३ नंतरच्या काळात देशाच्या झालेल्या प्रगतीचा लेखाजोखा त्यांनी मांडला आणि ते स्वाभाविक होते. स्वातंत्र्यदिनाचे लाल ... Read More »

कलम ३५ अ ः फेरविचाराची गरज का?

शैलेंद्र देवळाणकर भारतीय राज्यघटनेतील कलम ३५ (अ) हे केवळ भारतीय नागरिक व काश्मिरी निवासी यांच्यातील भेदाभेद करणारे नाही तर खुद्द काश्मिरमधील निवासी लोकांनाच असमानतेची वागणूक देणारे व विषमतेवर आधारित आहे. या कलमामुळे काश्मीरमधील निवासी महिला, तेथील मागासवर्गीय वाल्मिकी समाज व पंजाबी अल्पसंख्यांक यांच्यावर अन्याय होत असल्यामुळे या कलमावर पुनर्विचार होणे गरजेचे आहे. काश्मीरसंदर्भात लागू करण्यात आलेले कलम ३५ (अ)े वगळायचे ... Read More »

गोवा आयटी हब बनविण्याचे उद्दिष्ट

>> स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सभापती डॉ. सावंत; ५ वर्षांत दहा हजारांना रोजगार गोव्यात शांती, एकता आणि सर्वधर्मसमभाव अखंडित ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपातळीवरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यात बोलताना काल केले. येथील जुन्या सचिवालयाजवळ राज्यपातळीवरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सभापती डॉ. सावंत यांनी ध्वजारोहण केल्यानंतर बोलत होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारावरील उपचारार्थ अमेरिकेत असल्याने राज्यपातळीवरील ध्वजारोहण करण्याचा मान ... Read More »

अवकाशवीरांसह २०२२ पर्यंत ‘गगनयान’ अवकाश मोहिमेचा संकल्प ः मोदी

लष्करात महिलांची कायमस्वरूपी भरती आणि २०२२ पर्यंत अवकाशवीरांसह अवकाश मोहीम याबाबतच्या घोषणा ही देशाच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यावेळच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची ठळक वैशिष्ट्ये ठरली. येत्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने मोदी यांचे लाल किल्ल्यावरून झालेले कालचे शेवटचे भाषण आहे. राष्ट्रध्वज हाती घेतलेल्या देशाच्या सुपुत्राला किंवा कन्येला अवकाश मोहिमेवर २०२२ पर्यंत पाठवू, असे मोदी म्हणाले. ‘गगनयान’ या नावाने ही ... Read More »

दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेची नवीन ओळखपत्रे सप्टेंबरनंतर

सरकारच्या दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेखाली नवीन ओळखपत्रे तयार करण्याच्या कामाला सप्टेंबरनंतर सुरू पुन्हा सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती डीडीएसएसवाय या आरोग्य विमा योजनेचे सल्लागार डॉ. बाळकृष्ण व्ही. पै यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. सरकारच्या डीडीएसएसवाय योजनेखाली नवीन ओळखपत्र तयार करण्याचे काम १ ऑगस्ट २०१८ पासून बंद ठेवण्यात आल्याने या योजनेखाली नवीन नोंदणी करू इच्छिणार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या ... Read More »

कला अकादमी राज्य भजन स्पर्धेत हॅपी स्पोर्ट्‌स क्लब चिंबल प्रथम

कला अकादमी गोवा आयोजित पुरुष गटाच्या स्व. पं. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती राज्यस्तरीय भजन स्पर्धेत हॅपी स्पोर्टस् क्लब, चिंबलने ७५००० रुपयांचे प्रथम पारितोषिक व स्व. पं. मनोहरबुवा शिरगावकर चषक पटकाविला. ५०,००० रुपयांचे द्वितीय पारितोषिक श्री शांतादुर्गा भजनी मंडळ, कवळेला, तृतीय ४०,००० रुपयांचे पारितोषिक श्री वनदेवी संगीत संस्था, कायसुव तर ३०,००० रुपयाचे चौथे पारितोषिक श्री लक्ष्मी साखळ्यो भजनी मंडळ, रासईला प्राप्त झाले. ... Read More »

महिला कॉंग्रेसतर्फे ‘मेगा ब्लॉक’ निषेधार्थ आज मोर्चा

पणजी – मडगाव महामार्गावर आगशी – कुठ्ठाळी येथे गेल्या काही दिवसांपासून होणार्‍या प्रचंड वाहतूक कोंडीचा निषेध करण्यासाठी महिला कॉंग्रेस पक्षातर्फे आज गुरुवारी सकाळी ९ वा. एका निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी काल दिली. हा मोर्चा कुठ्ठाळी जंक्शन येथून सुरू होणार असून आगशी पोलीस स्थानकापर्यंत मोर्चा जाणार असल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले. Read More »

दैनिक नवप्रभाचा ४८ वा वर्धापनदिन उत्साहात

दैनिक नवप्रभाचा ४८ वा वर्धापनदिन पणजीतील नवहिंद भवनमध्ये असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते श्री. चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, राज्यसभेचे खासदार श्री. विनय तेंडुलकर, दक्षिण गोव्याचे खासदार श्री. नरेंद्र सावईकर, पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर आदींची यावेळी महनीय उपस्थिती होती. धेंपो उद्योसमूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, नवहिंद पेपर्स अँड ... Read More »

कुझनेत्सोवा, वावरिंकाला वाईल्ड कार्ड

>> युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा सुवर्णमहोत्सवी वर्ष माजी युएस ओपन विजेते स्टॅन वावरिंका व स्वेतलाना कुझनेत्सोवा यांच्यासह दोनवेळची ऑस्ट्रेलियन ओपन विजेती व्हिक्टोरिया अझारेंका यांना आगामी युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी वाईल्ड कार्ड देण्याता निर्णय आयोजकांनी काल जाहीर केला. न्यूयॉर्कमध्ये २०१६ साली नोवाक जोकोविचचा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातलेला वावरिंका १५१व्या स्थानी घसरला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे मागील वर्षाच्या शेवटच्या सहामाहीत तो स्पर्धात्मक ... Read More »