ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: August 14, 2018

रामशास्त्री

अखेर सोमनाथदा गेले. ठायी ठायी तत्त्वांना तिलांजली देत चाललेल्या आजच्या स्वार्थी, सोईस्कर, संधिसाधू राजकारणात मुळीच न शोभणारे, आपल्या विचारधारेशी अविचल निष्ठा राखणारे, पदाची प्रतिष्ठा यत्किंचितही डागाळू नये यासाठी जागरूक राहिलेले आणि भारतीय संसदेच्या सार्वभौमत्वाचा कोणत्याही बाह्य शक्तीकडून अधिक्षेप होऊ नये यासाठी प्रसंग येताच कणखरपणे उभे राहिलेले एक आधुनिक रामशास्त्री म्हणूनच सोमनाथ चटर्जी हे नाव स्वतंत्र भारताच्या सांसदीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये कायम ... Read More »

तत्त्वनिष्ठ राजकारणी सोमनाथ चटर्जी

सुहास साळुंखे साधेपणा आणि कर्तव्याप्रती प्रामाणिकता ही सोमनाथ चटर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वाची मुख्य वैशिष्ट्ये होती. तत्त्वनिष्ठ राजकारणी असा त्यांचा लौकीक होता. त्यांनी तत्त्वासाठी कधीही तडजोड केली नाही. वेळोवेळी विरोधकांवर कडक टीका करतानाही त्यांनी विरोधकांशी कधी कटूता निर्माण होऊ दिली नाही. त्यांच्या जाण्यानं आपण एका उत्तम, कर्तव्यकठोर तसंच तत्त्वनिष्ठ राजकारण्याला मुकलो आहोत. माजी लोकसभाध्यक्ष सोमनाथ चटर्जींच्या निधनानं एक उत्तम लोकसेवक गमावल्याची भावना ... Read More »

पणजी-मडगाव महामार्गावर चार तास वाहतूक का

>> सततच्या प्रकारामुळे प्रवाशांत संताप; तातडीने उपायाची मागणी गेल्या काही दिवसांपासून पणजी-मडगाव महामार्गावर ‘मेगा ब्लॉक’ होऊ लागलेला असून काल सोमवारी या मेगा ब्लॉकने कळस गाठला. काल या महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ खोळंबल्याने मडगावहून पणजीच्या दिशेने येणार्‍या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे पणजीहून मडगावच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीतपणे चालू होती. मात्र मडगावहून येणारी वाहने तब्बल चार ... Read More »

माजी लोकसभा सभापती सोमनाथ चटर्जींचे निधन

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, माजी लोकसभा सभापती सोमनाथ चटर्जी यांचे काल सकाळी इस्पितळात उपचारांदरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. गेले काही दिवस मूत्रपिंडाच्या विकाराने चटर्जी आजारी होते. प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना दि. १० रोजी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र काल त्यांची प्रकृती खालावली व त्यांची तेथेच प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी व दोन कन्या आहेत. चटर्जी यांच्या ... Read More »

लाचप्रकरणी वाहतूक अधिकारी निलंबित

पोळे-काणकोण येथील वाहतूक खात्याच्या तपासणी नाक्यावर एका वाहन चालकाकडून कथित लाच स्वीकारताना कॅमेर्‍यात बंदिस्त झालेले वाहतूक अधिकारी नारायण फडते यांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून या प्रकरणी सविस्तर चौकशीचा आदेश वाहतूक खात्याच्या संचालकांनी काल दिला आहे. एका वृत्तवाहिनीने शुक्रवारी मध्यरात्री पोळे काणकोण येथील वाहतूक खात्याच्या तपासणी नाक्यावर स्टींग ऑपरेशन करून वाहतूक खात्याच्या अधिकार्‍याला लाच स्वीकारताना कॅमेर्‍यामध्ये बंदिस्त केले. परराज्यातून येणार्‍या ... Read More »

निलंबनास विलंब का लावला?

>> पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचा सवाल परराज्यातून मासळी घेऊन गोव्यात येणारे ट्रक लांच घेऊन तपासणीशिवाय सोडत असताना रंगेहाथ पकडण्यात आलेले वाहतूक अधिकारी नारायण फडते यांना निलंबित करण्यास सरकारने विलंब का लावला असा प्रश्‍न कॉंग्रेस प्रवक्ते उरफान मुल्ला यांनी काल पत्रकार परिषदेत केला. मासळी घेऊन परराज्यातून गोव्यात येणार्‍या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येणार असल्याचे मंत्री विश्‍वजीत राणे यानी सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर ... Read More »

आठवणींतले दिग्गज नेते सोमनाथ चटर्जी

 ऍड. रमाकांत खलप (देशाचे माजी कायदामंत्री) सोमनाथदा गेले. डाव्या विचारसरणीचा एक विद्वान हरपला. बंगालच्या मातीत जन्मलेल्या अनेक विद्वानांच्या मालिकेतला एक मौल्यवान हिरा निखळला. ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून १९९६ साली गौरविला गेलेला अष्टपैलू सदस्य काळाच्या पडद्याआड झाला. १९९६ सालीच माझी – त्यांची भेट तुडुंब भरलेल्या लोकसभागृहात झाली. माजी राष्ट्रपती संजीव रेड्डी यांचे निधन झाले होते. लोकसभेत दुखवट्याचा ठराव चर्चेला आला. खासदार सोमनाथ ... Read More »

चांगल्या शहरांत पणजी जगात ९०वे !

देशात जगण्यासाठी सर्वांत चांगल्या शहरांच्या यादीत पणजी शहराला ९० वा क्रमांक प्राप्त झाला आहे. या सर्वेक्षणात पुणे शहराने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. चांगल्या शहराची यादी तयार करण्यासाठी देशातील १११ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने जगण्यासाठी अव्वल शहराची यादी तयार करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी जाहीर केला आहे. Read More »

फेडररच्या गुणांत घट

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने काल सोमवारी जाहीर केलेल्या एटीपी क्रमवारीत ‘टॉप २०मध्ये मोेठे फेरबदल दिसून आले. रॉजर्स कप स्पर्धा जिंकून स्पेनच्या राफेल नदालने आपले अग्रस्थान अधिक भक्कम करताना दुसर्‍या स्थानावरील रॉजर फेडरर याच्यावर ३७४० गुणांची मोठी आघाडी घेतली आहे. नदालने १० हजार गुणांचा टप्पा ओलांडताना १०,२२० गुण आपल्या खात्यात जमा केले आहे. दुसरीकडे फेडररच्या खात्यात ६४८० गुण आहेत. मागील आठवड्यापेक्षा त्याच्या ... Read More »

अँडरसनने ओलांडला ९०० गुणांचा टप्पा

इंग्लंडचा स्विंग गोलंदाज जेम्स अँडरसन याने भारताविरुद्धच्या लॉडर्‌‌स कसोटीतील ९ बळींच्या जोरावर आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत ९०० गुणांचा टप्पा ओलांडला आहे. इयान बोथम (१९८०) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा अँडरसन हा इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. अँडरसनने लॉडर्‌‌स कसोटीत एकूण १९ गुणांची कमाई करताना आपले पहिले स्थान अधिक भक्कम केले. पहिल्या स्थानावरील अँडरसनचे ९०३ तर दुसर्‍या स्थानावरील कगिसो रबाडाचे ८८२ ... Read More »