ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: August 13, 2018

मटक्याला अटकाव

कांदोळीत ‘मुंबई’ मटक्याचा आकडा काढण्यासाठी जमलेल्या २९ जणांच्या मुसक्या एका अनपेक्षित कारवाईत गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने नुकत्याच आवळल्या. या कारवाईमुळे मुंबई मटक्याचा त्या दिवसाचा आकडा निघू शकला नाही आणि त्याचा व्यवहार ठप्प होण्याची अभूतपूर्व घटना घडली. पण एकीकडे ही पोलिसांची कौतुकास्पद कारवाई होत असताना दुसरीकडे मात्र राज्यातील मटका अड्डे बिनदिक्कत चालू असल्याचे पाहायला मिळते आहे. हे काय गौडबंगाल आहे? ... Read More »

न्यायपालिकेतील आणखी एक निरर्थक विवाद

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) प्रश्न फक्त एवढाच आहे की, न्यायपालिकेने आपले अंतर्गत मतभेद कसे हाताळावेत? आपापले निर्णय देण्यात तर ही मंडळी पूर्णपणे मोकळी आहेत. सरन्यायाधीशाशी त्यासंदर्भात असलेली मतभिन्नता तर ते निर्णयातूनच नोंदवू शकतात व त्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. मुंबई येथील सी.बी.आय. न्यायालयाचे दिवंगत न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या तथाकथित हत्येचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या कसोटीवर निकालात काढल्यानंतरही भारताच्या न्यायपालिकेला बदनाम ... Read More »

जातनिहाय आरक्षण बदलाचा विचार नाही : पंतप्रधान

जातीनिहाय राखीवतेत कोणताही बदल करण्याचा आपल्या सरकारचा विचार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी स्पष्ट केले. तसेच एनआरसीच्या विषयावरून कोणाही भारतीयाला देश सोडावा लागणार नाही असेही त्यांनी काल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. देशाच्या विविध भागांत जमावाकडून होणार्‍या मारहाणीच्या घटनांवरही त्यांनी यावेळी भाष्य केले. अशा घटनांचे समर्थन होऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जातीनिहाय राखीवतेत बदल करण्याचा सरकारचा विचार ... Read More »

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीदिनी काल मिरामार येथील त्यांच्या समाधीवर पुष्पांजली वाहून राज्य सरकारतर्फे त्यांना अभिवादन करताना गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत. बाजूस मान्यवर. Read More »

राज्यात ९ दिवसांत ६३७ ट्रक मासळी आयात

>> आक्षेपार्ह काहीच आढळले नाही : विश्‍वजीत राणे राज्यात मागील नऊ दिवसात परराज्यातून सुमारे ६३७ ट्रक मासळी आणण्यात आली आहे. एफडीएला परराज्यातून आयात मासळीच्या तपासणीमध्ये काहीच आक्षेपार्ह आढळून आलेले नाही, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल पत्रकारांना पाठविलेल्या संदेशाद्वारे दिली. शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत पोळे काणकोण येथील तपासणी नाक्यावर ५१ मासळीवाहू ट्रकांची तपासणी करण्यात आली. तर पत्रादेवी ... Read More »

बेळगावात पत्नीचा खून केलेल्यास पणजीत अटक

बेळगाव जिल्ह्यातील सदलगा (कर्नाटक) येथे पत्नीचा खून करून गोव्यात पळून आलेला दिनेश गणपत पाटील (इंचलकरंजी – कोल्हापूर) याला पणजी पोलिसांनी मिरामार येथे काल संध्याकाळी अटक केली. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी येथील दिनेश पाटील याने शनिवार ११ ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्ह्यातील सदलगा येथे पत्नी दिशा पाटील हिचा खून करून आपल्या मोटरसायकलने गोव्यात आला. स्थानिक सदलगा पोलिसांना दिशा हिचा मृतदेह आढळून आला. ... Read More »

राज्यपातळीवर सभापतींकडून ध्वजारोहण संयुक्तिक ठरत नाही : रमाकांत खलप

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गैरहजेरीत सभापती प्रमोद सावंत १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पणजीत ध्वजारोहण करणार असले तरी त्यांना यावेळी सरकारच्यावतीने भाषण करता येणार नसल्याचे माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड्. रमाकांत खलप यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सभापतींकडे राज्यपातळीवरील ध्वजारोहण सोपवणे संयुक्तिक नसल्याचे मत त्यांनी मांडले. स्वातंत्र्यदिनी प्रत्येक राज्यात राज्याच्या मुख्यमंत्र्या हस्ते ध्वजारोहण होत असते. यावेळी मुख्यमंत्री आपण केलेल्या कामाचा तसेच ... Read More »

राणेंवर कारवाईबाबत चर्चा केली काय? : रेजिनाल्ड

विदेशात काम करणार्‍या गोमंतकीयांसंबंधी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व आमदार प्रतापसिंह राणे यांनी जे विधान केले होते त्यासंबंधी कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाने बैठक घेऊन चर्चा करायला हवी होती व नंतरच त्यासंबंधीची पक्षाची भूमिका ठरवायला हवी होती, असे कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल सांगितले. पक्षाची एक शिस्त असते. अशी मागणी करण्यापूर्वी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते यांच्याशी या नेत्यांनी चर्चा ... Read More »

पावसाचे प्रमाण १८ टक्के कमी

राज्यात मोसमी पावसाच्या आत्तापर्यंतच्या ७२ दिवसांपैकी केवळ १८ दिवस सरासरी पावसाची नोंद झाली असून ५४ दिवस सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सातत्याने मागील २२ दिवस सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याने पावसाचे प्रमाण १८ टक्क्यांनी कमी झाले आहे. राज्यात आत्तापर्यंत ७६.११ इंच पावसाची नोंद झाली आहे. अंदाजानुसार आत्तापर्यंत सरासरी पाऊस ९२.९४ इंच एवढा पडायला हवा होता. दक्षिण गोव्यात पावसाचे प्रमाण २० ... Read More »

भारतावर डावाने पराभवाची नामुष्की

>> इंग्लंडचा १ डाव व १५९ धावांनी विजय >> मालिकेत २-० अशी आघाडी इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच टीम इंडियाला एक डाव व १५९ धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ न होतादेखील यजमानांनी पुढील तीन दिवसांत पाहुण्यांचा खेळ खल्लास केला. आपला पहिला डाव ७ बाद ३९६ धावांवर घोषित करत इंग्लंडने भारताचा दुसरा डाव १३० ... Read More »