ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: August 10, 2018

भाजपला संधी

राजकीय पोकळी काय असते याचा अनुभव सध्या तामीळनाडूची जनता घेते आहे. दोन वर्षांपूर्वी जे. जयललिता यांचे झालेले निधन आणि नुकतेच एम. करुणानिधी यांचे झालेले निधन या त्या राज्यातील दोन उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या मृत्यूनंतर तामीळनाडूच्या राजकारणात खरोखरच महाकाय पोकळी निर्माण झालेली दिसते आहे. जयललितांचे निधन झाले त्यानंतर काय घडले हे देशाने पाहिले. त्यांच्या मागे पक्षाची धुरा स्वीकारण्यासाठी धडपडणार्‍या त्यांच्या जिवश्च कंठश्च ... Read More »

विधानसभेतील मंथन आणि चिंतन…

शंभू भाऊ बांदेकर जेव्हा जनता ‘सरकार शिरजोर अन् विरोधक कमजोर’ असे दृश्य बघते, तेव्हा जणू जनतेच्या पायाखालची जमीन हलू लागते. त्याच्यात शिक्षण, आरोग्य, उद्योग, नोकर्‍या आणि प्रादेशिक आराखडा असे जनतेच्या जीवनात प्रत्यक्ष डोकावणारे विषय असतील तर ती अधिक सतर्क असते. जुलै महिन्यातील एक महत्त्वाची राजकीय घटना म्हणजे लोकसभेत नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात मांडला गेलेला अविश्‍वास ठराव ही होय. तसा तो ... Read More »

पर्रीकर उपचारांसाठी अमेरिकेला रवाना

>> १७ ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री अनुपलब्ध >> प्रधान सचिवांकडे प्रशासकीय कामकाजाची सूत्रे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्या आजारावरील वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईमार्गे अमेरिकेला काल रवाना झाले आहेत. यामुळे मुख्यमंत्री पर्रीकर १० ते १७ ऑगस्ट दरम्यान राज्यात उपलब्ध नसतील, असे मुख्यमंत्री कार्यालयाने काल कळविले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अमेरिकेला रवाना होताना मागील वेळी प्रमाणे मंत्रिमंडळ सदस्यांच्या खास समितीची स्थापना केलेली नाही. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्रीही ... Read More »

मुसळधार पावसाचे केरळात २६ बळी

केरळमध्ये काल पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला असून विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत किमान २६ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून राज्यभरातील १० हजारांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. दरम्यान, आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी केरळ सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आलेल्या माहितीनुसार इडुक्की व मलप्पुरम या दोन जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे भूसख्खलन होऊन ... Read More »

महाराष्ट्र बंदला हिंसक वळण

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून काल पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे, औरंगाबाद, नाशिकमध्ये हिंसक वळण लागले. औरंगाबादमध्ये ६० औद्योगिक कंपन्यांची तोडफोड केल्याचा दावा कंपन्यांच्या अधिकार्‍यांनी केला आहे. तर मुंबईत मराठा आंदोलकांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले. पुण्यात कोथरूड डेपोजवळ दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. औरंगाबादेत वाळुज एमआयडीसीत २ खासगी वाहने व पोलीसांची एक गाडी पेटवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मुंबई – पुणे ... Read More »

परराज्यातील मासळीची नियमानुसार तपासणी

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) परराज्यातून येणार्‍या मासळीच्या तपासणीचे काम योग्य प्रकारे आणि नियमानुसार करण्यात येत आहे. मासळीवाहू ट्रकातील प्रत्येक मासळीची तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे ट्रकातील मासळीचे निवडक नमुने घेऊन तपासणी केली जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. एफडीएकडे कर्मचार्‍यांची कमतरता असताना जास्तीत जास्त कर्मचार्‍यांची मासळीच्या तपासणीसाठी पोळे – ... Read More »

म्हादईप्रश्‍नी कर्नाटकाची अरेरावी : जलस्रोतमंत्री

म्हादई पाणीवाटप प्रश्‍नावर जल लवादासमोर खटला सुरू असल्याने गोव्याचे पथक गेली ४ वर्षे नियमित कणकुंबीला भेट देऊन पाहणी करत आहेत. परंतु या पथकातील अधिकार्‍यांना अडविण्याचा जो प्रकार घडला तो निंदनीय आहे. गोव्याच्या पथकाला गुन्हेगारी स्वरूपाची वागणूक देताना गेटसमोर उभे करून फोटोही घेण्यात आले. ही कृती अलोकशाही पद्धतीची असल्याची प्रतिक्रिया जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी काल व्यक्त केली. गोव्याच्या पथकातील तांत्रिक टीमबरोबर ... Read More »

मिरामारला ‘रेरा’वर १८-१९ रोजी परिषद

भारतीय अभियंते संस्थेच्या गोवा शाखेतर्फे येत्या १८ व १९ ऑगस्ट रोजी मिरामार येथील विज्ञान केंद्रात ‘रेरा’ या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती संस्थेच्या गोवा शाखेचे अध्यक्ष गुरूनाथ नाईक पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. राज्यात रेरा कायद्याचा प्रभाव आणि अंमलबजावणीवर परिषदेत चर्चा केली जाणार आहे. गोवा रेरा आणि क्रेडायच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले ... Read More »

सप्टेंबरपासून राज्यातील ड्रायव्हींग स्कुलांची तपासणी

वाहतूक खात्याकडून सप्टेंबरपासून राज्यातील १३५ मोटर ड्रायव्हींग स्कुलांची इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटीव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) गुडगाव, हरयाणा या संस्थेकडून तपासणी केली जाणार असल्याची माहिती वाहतूक खात्याच्या सूत्रांनी दिली. वाहतूक खात्याने राज्यातील वाहन चालविण्याचा परवाना घेणार्‍या नागरिकांना दर्जात्मक वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी पाऊल उचलले आहे. वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेत असताना वाहतूक नियमांबाबत योग्य माहिती दिल्यास बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण येऊ शकते असा ... Read More »

‘एक राज्य, एक मत’ धोरण रद्द

>> सौराष्ट्र, विदर्भ, मुंबई, रेल्वे, सेनादल, विद्यापीठ यांना पूर्ण सदस्याचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) घटनेमधील काही बदलांना मान्यता दिली आहे. ‘एक राज्य, एक मत’ तसेच एका कार्यकाळानंतर तीन वर्षांची लोढा समितीची विश्रांतीची शिफारस सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे व तीन वर्षांच्या सलग दोन कार्यकाळानंतर तीन वर्षांचा ‘कूलिंग पिरियड’ ठेवत सदस्यांना मोठा प्रमाणात दिलासा दिला आहे. राज्य संघटनेमध्ये, ... Read More »