ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: August 9, 2018

दिलासा

गोव्याच्या जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेला उपचारांसाठी पुन्हा प्रयाण करण्यापूर्वी दिल्लीत पंतप्रधानांना आणि खाण प्रश्नाच्या अभ्यासासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिगटाला भेटले. गोव्याच्या खाण प्रश्नाची पार्श्वभूमी आणि तो सोडविण्यासाठीची अध्यादेशाची पळवाट याची माहिती त्यांनी त्यांना दिली आहे. गोवा विधानसभेने एकमुखाने संमत केलेल्या ठरावाची प्रतही त्यांना सुपूर्द करण्यात आलेली आहे. गोव्याचा खाण प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे अभिवचन पंतप्रधानांनी तसेच मंत्रिगटाचे प्रमुख ... Read More »

घुसखोरांना कठोर संदेश

– शैलेंद्र देवळाणकर नॅशनल रजिस्टर ऑङ्ग सिटीझन्सच्या दुसर्‍या यादीमध्ये आसाममधील ४० लाख जणांना बाहेर ठेवण्यात आल्यामुळे सध्या बराच गदारोळ माजला आहे. हा मुद्दा प्रामुख्याने बांगलादेशी घुसखोरीशी निगडित असून तो राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा आहे. कारण या निर्वासितांना भारतात घुसवण्यात ङ्गार मोठी भूमिका पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयची आहे. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित कऱणे गरजेचेच बनले आहे. ३१ जुलै रोजी ... Read More »

म्हादई : गोव्याची अवमान याचिका दाखल

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून कर्नाटक सरकारने म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीच्या पात्रात वळवण्याचे जे कृत्य केलेले आहे त्या प्रकरणी काल गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. ह्या ३६० पानी अवमान याचिकेतून गोवा सरकारने कर्नाटक सरकारने म्हादईचे पाणी वळवून न्यायालयाच्या आदेशाचा कसा भंग केलेला आहे ते स्पष्ट केले असल्याचे जलस्रोत खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी काल सांगितले. सर्वोच्च ... Read More »

मोदींच्या सकारात्मक प्रतिसादामुळे खाणी दोन-तीन महिन्यांत सुरू होणार

>> आमदार नीलेश काब्राल यांचा दावा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाणप्रश्‍नी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व खाण प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी मोदी यांनी स्थापन केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या गटाशी मंगळवारी चर्चा केल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता गोव्यातील खाणप्रश्‍न येत्या दोन ते तीन महिन्यांत सुटण्याची शक्यता खाणपट्ट्यातील एक आमदार नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली. प्रधानमंत्री मोदी यांनी सदर प्रश्‍नावर सकारात्मक प्रतिसाद देत ... Read More »

उपचारासाठी पर्रीकर आज पुन्हा अमेरिकेला

आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारासाठी परत अमेरिकेला जाण्यासाठी आज दुपारी गोव्यातून निघतील. १८ ऑगस्टपर्यंत उपचार घेऊन ते तेथून गोव्यात परततील. सुमारे आठवडाभर त्यांना उपचारासाठी अमेरिकेला थांबावे लागणार असल्याचे मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातील सूत्रांनी काल सांगितले. ह्या आठवडाभराच्या काळात ते अमेरिकेतूनच प्रशासन सांभाळणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यादिनी पर्रीकर हे गोव्यात नसतील. राज्याचे मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिनी गोव्यात नाहीत अशी स्थिती ... Read More »

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे मरीना बीचवर काल दफन करण्यात आले. तामिळनाडूच्या या लोकनेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी लोटलेला जनसागर. Read More »

मुळगावचे वेताळ मंदिर चोरट्यांनी फोडल

>> सुवर्णालंकारासह ३ लाखांचा ऐवज लंपास शिरोडावाडी, मुळगाव येथील प्रसिद्ध वेताळ देवस्थानात काल रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून सुमारे २ लाख ८० हजार रुपयांचे सोने व चांदीच्या वस्तू लंपास केल्या. जवळच असलेल्या वनदेवी देवस्थानचे कार्यालय फोडून चोरट्यांनी कपाटातील रोख ३ हजार तसेच सोन्याची नाणी लंपास केली. दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे ३ लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे ... Read More »

‘गोवा माईल्स’ ऍपखाली रिक्षा, मोटारसायकल्स आणणार

‘गोवा माईल्स’ ऍपखाली लवकरच रिक्षा व मोटारसायकल पायलटांनाही आणण्यात येणार आहे, अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. दोन दिवसांपूर्वीच पर्यटन खाते व जीटीडीसीने ऍप टॅक्सी सेवेचा शुभारंभ केला होता. गोव्यात प्रथमच अशा प्रकारची टॅक्सीसेवा सुरू करण्यात आली आहे. एकदा ही ऍपधारीत टॅक्सी सेवा सुरळीतपणे रूळावर आली की नंतर रिक्षा व मोटारसायकल पायलटांनाही ... Read More »

आजपासून भारताची दुसरी ‘कसोटी’

>> इंग्लंडच्या ओली पोपचे कसोटी पदार्पण निश्‍चित भारत व इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना आजपासून ऐतिहासिक लॉडर्‌‌स मैदानावर खेळविला जाणार आहे. यजमानांनी पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे आत्मविश्‍वास उंचावलेला इंग्लंडचा संघ भारतावर कुरघोडी करत आघाडी फुगवण्यासाठी आतुर झालेला आहे. बर्मिंघममधील पहिल्या कसोटी ... Read More »

जयराम, मिथुन तिसर्‍या फेरीत

>> रसिका, मुग्धा, वैदेहीचे आव्हान आटोपले भारताच्या अजय जयराम, कार्तिक जिंदाल व मिथुन मंजुनाथ यांनी व्हिएतनाम ओपन स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. रसिका राजे, मुग्धा आग्रे, वैदेही चौधरीसह महिला दुहेरीतील द्वितीय मानांकित जोडी जक्कमपुडी मेघना व पूर्विशा राम यांचे आव्हान काल बुधवारी अकाली आटोपले. महिला दुहेरीतील मेघना व पूर्विशा यांच्याकडून विजेतेपदाची अपेक्षा होती. परंतु, त्यांना प्राथमिक टप्प्यातच गाशा गुंडाळावा ... Read More »