ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: August 8, 2018

टॅक्सी ऍपचे स्वागत

गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांची वर्षानुवर्षांची मनमानी आणि मुजोरी मोडीत काढू शकणारे मोबाईल ऍप कार्यरत करून गोवा पर्यटन विकास महामंडळाने एक चांगले व स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. गोव्यातील टॅक्सी व्यवसायाला शिस्त लावण्यात हे ऍप महत्त्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही. काही विपक्षी व काही स्वपक्षीय राजकारण्यांच्या असलेल्या विरोधाची फिकीर न करता गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी खंबीरपणे हे पाऊल ... Read More »

मराठा आरक्षणाच्या मागणीमागचे वास्तव

ऍड. असीम सरोदे आपण खाजगी नोकर्‍या तयार करु शकलो नाही. नोकर्‍यांचे प्रमाण आणि शक्यता वाढवल्या नाहीत आणि त्याच वेळी सरकारी नोकरीत असलेल्या कामाच्या प्रमाणापेक्षा जास्त पगार देण्याची पद्धती स्वीकारली. सरकारी कर्मचार्‍यांचे लांगूलचालन सर्वांनीच केले आहे. त्यातूनच नवे प्रश्‍न जन्माला आले असून ते जटिल बनत चालले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन निघालेल्या मोर्च्यांना झालेली गर्दी विचारात घेता हा प्रश्‍न म्हणून खूप महत्त्वाचा ... Read More »

दक्षिण ध्रुव

विशेष संपादकीय   द्रविडी अस्मितेचे कैवारी आणि द्रमुकचे आधारस्तंभ मुथुवेल करुणानिधी यांच्या निधनाने तामीळनाडूच्या राजकारणातील एक मोठे पर्व संपले आहे. यापूर्वी जे. जयललिता यांच्या निधनाने तामीळनाडूच्या दोन ध्रुवांपैकी एक तारा निखळला होता. आता करुणानिधीही अनंताच्या यात्रेला निघून गेले आहेत. प्रदीर्घ काळ चाललेल्या आणि पराकोटीच्या तीव्र राजकीय संघर्षाची अखेर इतिश्री झाली आहे. पाच वेळा राज्याचे मुख्यमंत्री, तेरा वेळा आमदार आणि एकाही ... Read More »

एम. करुणानिधी यांचे निधन

>> आज चेन्नईत अंत्यसंस्कार >> मोदींसह दिग्गज नेते उपस्थित राहणार द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे (द्रमुक) सर्वेसर्वा आणि पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे एम. करुणानिधी यांचे काल वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. कावेरी रुग्णालयात त्यांनी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी अखेरचा श्‍वास घेतला. द्रविडी नेता म्हणून ओळखले जाणारे करुणानिधी यांच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकारणातील एक मातब्बर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. दरम्यान, ... Read More »

खाणप्रश्‍न सोडविण्याचे नरेंद्र मोदींचे आश्‍वासन

>> पर्रीकरांनी खासदारांसह केली दिल्लीत चर्चा खाण प्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी नवी दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी मोदी यांनी गोव्यातील खाण उद्योग लवकर सुरू व्हावा यासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचे आश्‍वासन पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला दिले. खाण उद्योग हा गोव्याचा कणा असल्याचे पर्रीकर यांनी चर्चेवेळी मोदी यांच्या लक्षात ... Read More »

लुईस बर्जर लाचप्रकरण; मॅक्लमविरोधात नोटीस

येथील खास न्यायालय तथा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने कथित लुईस बर्जर लाच प्रकरणात लुईस बर्जर कंपनीचे माजी अधिकारी जेम्स मॅक्लम यांच्याविरोधात वृत्तपत्रातून नोटीस जारी केली आहे. न्यायालयाचे समन्स जेम्स मॅक्लम चुकवत असल्याचे निदर्शनास आल्याने ही नोटीस जारी करण्यात आली आहे. जेम्स याला १७ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्यातील जायका प्रकल्पाचे ... Read More »

फॉर्मेलीन प्रश्‍नावर न्यायालयाची राज्य व केंद्र सरकारला नोटीस

मासळीतील फॉर्मेलीनसंबंधीच्या जनहित याचिकेवर काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने राज्य सरकार, केंद्र सरकार आणि भारतीय अन्न व सुरक्षा मानक यांना नोटीस जारी केली असून दोन आठवड्यांत बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयात शिवराज कामत तारकर व विठ्ठल नाईक यांनी मासळीतील फॉर्मेलीन संबंधी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल युक्तिवाद झाला. याचिकादारांच्या वकिलाने युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने संबंधितांना ... Read More »

कांदोळीत हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या

>> दोन्ही संशयितांना १२ तासांच्या आत गदग, कर्नाटक येथे अटक कांदोळी येेथील सन अँड सँड अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या दिल्लीस्थित विश्‍वजित सिंग या हॉटेल व्यावसायिकाचा मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान घरात घुसून तलवारीने सपासप वार करून निर्घृण खून करण्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेनंतर पळून गेलेल्या उमेश टुकाप्पा राठोड, नेरुल (मूळ कर्नाटक) व त्याचा मित्र दयाशंकर (सध्या राहणारा कळंगुट) या दोन्ही ... Read More »

भारत ‘अ’ डावाने विजयी

>> मोहम्मद सिराजचे सामन्यात १० बळी रुडी सेकंड याचा चिवट प्रतिकार मोडून काढत भारत ‘अ’ संघाने चारदिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा एक डाव व ३० धावांनी पराभव केला. पहिल्या डावात पाच बळी घेतलेल्या सिराजने दुसर्‍या डावातही पाच बळी घेत एकूण दहा बळी घेण्याचा पराक्रम केला. पहिल्या डावात संघ ४ बाद ९३ अशा स्थितीत असताना ९४ धावांची समयोचित ... Read More »

महिला हॉकी संघ नवव्या स्थानी

भारतीय महिला संघाने काल मंगळवारी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने जाहीर झालेल्या हॉकी क्रमवारीत नववे स्थान प्राप्त केले आहे. विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी दहाव्या स्थानी असलेल्या भारताने स्पर्धेतील ‘अंतिम ८’मधील प्रवेशाच्या जोरावर एका स्थानाची सुधारणा केली आहे. शोर्ड मरिन यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाच्या खात्यात ११३८ गुण आहेत. विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत झालेल्या आयर्लंडने मोठी झेप घेत थेट आठवे स्थान आपल्या नावे केले ... Read More »