ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: August 7, 2018

आगीशी खेळ

भारतीय संविधानातील काश्मीरच्या कायम रहिवाशांच्या विशेषाधिकारां संबंधीच्या कलम ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे आणि तिकडे काश्मीरमध्ये असंतोषही उफाळला आहे. तेथे कडकडीत बंदही पाळला गेला. या विशेषाधिकारांना हात लावणे म्हणजे काश्मीरच्या अस्तित्वावर घाला आहे असे वातावरण तेथे निर्माण झाले आहे आणि त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांपासून फुटिरतावाद्यांपर्यंत सगळेच एका सुरात बोलू लागले आहेत. काश्मीरसाठी विशेषाधिकारांचा हा विषय विलक्षण ... Read More »

डिचोलीची शान ः नूतन वाचनालय

देवेश कु. कडकडे (डिचोली) रविवार दि. १२ ऑगस्ट हा ग्रंथपाल दिन म्हणून साजरा झाला. गोव्यामध्ये शहरा-शहरांतून शतकमहोत्सव पार केलेली समृद्ध ग्रंथालये आहेत. शतकोत्तर वाटचाल समर्थपणे करीत आहेत. याच परंपरेतील एक आहे डिचोलीचे नूतन वाचनालय. त्याची ही यशोगाथा – शंभर वर्षांपूर्वी डिचोली परिसरात वाचनालयाच्या अभावामुळे वाचकांना पुस्तकांसाठी शहराबाहेर जावे लागायचे. ज्ञान आत्मसात करण्याबरोबरच फावल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी वाचन हे महत्त्वाचे साधन ... Read More »

खाणप्रश्‍नी तोडग्यासाठी मुख्यमंत्री आज दिल्लीत

गोव्यासाठी अत्यंत डोकेदुखी ठरलेल्या खाण प्रश्‍नावर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नियुक्ती केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या गट समितीची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आज नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. तद्नंतर ९ ऑगस्ट रोजी तेथूनच पर्रीकर हे आपल्या पुढील उपचारासाठी अमेरिकेकडे प्रयाण करणार आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आज मंगळवारी नवी दिल्लीला जाणार आहेत या वृत्ताला काल सोमवारी त्यांच्या ... Read More »

ऍप टॅक्सीसेवेचा शुभारंभ

मोबाइल ऍपवरील गोव्यातील पहिल्या टॅक्सी सेवेचा काल गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते वापर करून तर पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते गाड्यांना झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. पर्वरी येथे मंत्रालयात या सेवेचा शुभारंभ केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या टॅक्सी सेवेमुळे पर्यटक व स्थानिक लोकांची चांगली सोय होणार आहे. कुणालाही जेथे टॅक्सी हवी असेल तेथे ती मागवता येईल. टॅक्सी शोधण्यासाठी ... Read More »

टॅक्सीचालकांचे वास्कोत ठिय्या आंदोलन

गोवा सरकारने पर्यटन खात्यातर्फे कालपासून सुरू केलेल्या टॅक्सी ऍप सेवेला गोवा पर्यटक टॅक्सी चालक संघटनेने दाबोळी विमानतळावर ठिय्या आंदोलन करून विरोध केला. दक्षिण जिल्हा टॅक्सी मालक संघटना तसेच गोवा पर्यटक टॅक्सी चालक संघटनेचे सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते. दाबोळी विमानतळावर ऍप टॅक्सी सेवेला बावटा दाखवून संध्याकाळी सुरुवात करण्यात येणार असल्याचे समजताच पिवळ्या काळ्या टॅक्सी संघटनेने विरोध दर्शविण्यासाठी दाबोळी विमानतळ परिसरात ... Read More »

कोरगाव अपघातात पोलीस कॉन्स्टेबल ठार

कोरगाव येथे झालेल्या स्वयं अपघातात गंभीर जखमी झालेल्या केरी, पेडणे येथील कुणाल अशोक पेडणेकर (२७) या पोलीस शिपायाचे काल उपचार सुरू असताना गोमेकॉत निधन झाले. शनिवारी ४ रोजी सायंकाळी अपघातात गंभीर झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुणाल आपल्या दुचाकी मोटारसायकलवरून कोरगाव येथून केरीला जात होते. देऊळवाडा, कोरगाव येथे झालेल्या स्वयं अपघातात तो गटाराच्या बाजूला फेकला जाऊन गंभीर ... Read More »

फॉर्मेलीन प्रश्‍नावर कॉंग्रेसकडून जनतेची दिशाभूल : आरोग्यमंत्री

कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मासळीतील फॉर्मेलीनच्या प्रश्‍नावर नागरिकांमध्ये दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नये. सरकार राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत काल केले. अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) परराज्यातील येणार्‍या मासळीची दोन्ही तपासणी नाक्यांवर योग्य प्रकारे तपासणी केल्यानंतर मासळीची वाहतूक करण्यास मान्यता दिली जात आहे. कॉंग्रेस पक्षाकडे काहीच मुद्दे नसल्याने ... Read More »

शापूर, फोंड्यात अज्ञात महिलेचा खून

>> सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला शापूर, फोंडा येथील कदंब बस स्थानकाजवळील डोंगराळ भागात काल दुपारी अज्ञात महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला असून सदर महिलेचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कपड्यावरून सदर महिला परप्रांतीय असण्याची शक्यता असून ६-७ दिवसांपूर्वी खून झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मृत महिलेचे वय ३० ते ३५ च्या दरम्यान आहे. सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या ... Read More »

भारत ‘अ’ला विजयाची संधी

दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धचा चारदिवसीय अनधिकृत सामना एका डावाने जिंकण्याच्या दिशेने भारत ‘अ’ संघाने मार्गक्रमण केले आहे. पहिला डाव ८ बाद ५८४ धावांवर घोषित केल्यानंतर दुसर्‍या डावात पाहुण्यांची ४ बाद ९९ अशी स्थिती झाली आहे. पहिल्या डावात केवळ २४६ धावांपर्यंत मजल मारलेला द. आफ्रिकेचा संघ अजून २३९ धावांनी पिछाडीवर असून आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी, दुसर्‍या दिवसाच्या २ बाद ... Read More »

भारताची मदार जयरामवर

>> व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन आजपासून ‘बीडब्ल्यूएफ टूर सुपर १००’ दर्जाच्या व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. आशियाई ज्युनियर विजेत्या लक्ष्य सेन याने ७५,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेतून काल अंग काढून घेतल्याने अनुभवी अजय जयरामवर भारताची मदार असेल. अजय जयराम आपल्या मोहिमेची सुरुवात स्थानिक खेळाडू ली ड्युक फाट याच्याविरुद्ध करणार आहे. रशिया ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या ... Read More »