ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: August 6, 2018

वर्मावर बोट

राज्य सरकारच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, गृह आधार आणि लाडली लक्ष्मी या तिन्ही प्रमुख सामाजिक कल्याणयोजनांमधील गैरप्रकारांची पोलखोल महालेखापालांच्या अहवालातून झालेली आहे. अर्थात नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात हा विषय चर्चेला आला होता आणि या योजनांसाठी खोटी माहिती हा फौजदारी गुन्हा ठरवला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी त्यात केली आहे. दोन ऑगस्टचा अग्रलेखही त्याच विषयावर होता. या योजनांमागील सरकारचे हेतू कितीही उदात्त ... Read More »

२०१९ च्या भुताचा राजकारण्यांमध्ये संचार

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) हे घुसखोर बांगलादेश सीमेला लागून असलेल्या राज्यांतच नव्हे तर संपूर्ण देशातच पसरलेले आहेत. त्यांना हुडकून काढून ते मतदानात भाग घेऊ शकणार नाहीत, या देशाच्या संसाधनावर डल्ला मारु शकणार नाहीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणतेही अराष्ट्रीय कृत्य करु शकणार नाहीत एवढी काळजी तर कुठल्याही सरकारने घ्यायलाच हवी. २०१९ ची लोकसभा निवडणूक व्हायला अद्याप नऊ महिन्यांचा अवधी आहे. ... Read More »

म्हादई : गोव्याची आज किंवा उद्या अवमान याचिका

>> गोव्याचे पथक नवी दिल्लीत दाखल >> जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांची माहिती म्हादई जल लवादाच्या आदेशाचा भंग करून कर्नाटक सरकारने म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्याचे जे गैरकृत्य केलेले आहे त्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यासाठी गोवा सरकारचे म्हादईचे पथक काल नवी दिल्लीला रवाना झाले. ही अवमान याचिका आज सोमवारी अथवा उद्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे, असे ... Read More »

फॉर्मेलीन प्रकरणी सरकारने जनतेच्या आरोग्याशी खेळू नय

>> प्रदेश कॉंग्रेसाध्यक्षांचा इशारा परराज्यातून येणार्‍या ट्रकांतील मासळीची तपासणी सीमेवर करणे शक्य नसून फॉर्मेलीन प्रकरणी गोवा सरकारने गोव्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ मांडू नये, असा इशारा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल येथे पत्रकार परिषदेत दिला. परराज्यातील मासळीवर सरकारने कायमची बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली. एका ट्रकातील मासळीचे किती नमुने घेऊन तपासणी करणार असा सवाल त्यांनी केला. मध्यरात्रीच हे ... Read More »

वन-मावळींगे पंचायत कोसळली

मये मतदारसंघातील वन मावळींगे पंचायत इमारतीचा एक भाग काल रविवारी रात्री कोसळल्याने मोठी हानी झाली असून सुदैवाने रात्री कुणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला. या पंचायतीची इमारत मोडकळीस आली होती. काही महिन्यांपूर्वी आमदार प्रवीण झांटये यांनी पाहणी करून सरकारला माहिती दिली होती. सदर इमारतीचे छप्पर व भिंती धोकादायक बनल्या होत्या. रविवारी तलाठी बसत असलेल्या खोलीचे छप्पर व भिंती पडल्याने आतील सर्व ... Read More »

बेतोड्याच्या सातेरी प्रासादिक संगीत संस्थेचे पथक प्रथम

>> कला अकादमी आयोजित बालभजन स्पर्धा कला अकादमी आयोजित भजनसम्राट स्व. मनोहरबुवा शिरगावकर स्पर्धेच्या बाल कलाकार विभाग अंतिम भजनी स्पर्धेत श्री सातेरी प्रासादिक संगीत संस्था, बेतोडा या बाल भजनी पथकाने २५००० रुपयांचे प्रथम पारितोषिक व मनोहरबुवा शिरगावकर स्मृती फिरता चषक पटकाविला. सलग तिसर्‍या वर्षी या पथकाने प्रथम पारितोषिक पटकावून ‘हॅटट्रीक’ साधली आहे. सर्वोदय एज्युकेशन सोसायटी विद्यालय, कुडचडे या पथकाला २०,००० ... Read More »

सेझ : व्याजासह पैसे देण्यामागे घोटाळा

>> कॉंगे्रसचा आरोप सेझ कंपन्यांना त्यांचे पैसे व्याजासह परत देण्याचा निर्णय हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. या घोटाळ्यात काही मंत्र्यांचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. चोडणकर म्हणाले की, सेझवाल्यांनी आपले पैसे वसूल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना सरकारने घाईगडबडीत मंत्रिमंडळ बैठक ... Read More »

विराट कसोटीत नंबर १

इंग्लंडविरुद्धच्या पहिला कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी कर्णधार विराट कोहलीला मात्र या लढतीच्या दोन्ही धावात केलेल्या दमदार फलंदाजीचा फायदा झाला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला खाली खेचत आयसीसीच्या कसोटी जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविले आहे. कसोटी क्रमवारीत अग्रस्थान मिळविणारा विराट हा भारताचा सातवा फलंदाज ठरला आाहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गौतम गंभीर, सुनिल गावसकर, ... Read More »

पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपद

>> जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा भारताच्या पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चीनमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिच्याकडून २१-१९, २१-१० असा पराभव स्वीकारवा लागला. मरिनचे हे तिसरे जागतिक अजिंक्यपद ठरले. यापूर्वी तिने जकार्तात २०१४ आणि २०१५ साली या स्पर्धेचे जेतेपद प्राप्त केले होते. नुकत्याच झालेल्या थायलंड ओपनमध्येही सिंधूला उपविजेतेपदावर ... Read More »