ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: August 2018

डोंगर पोखरून उंदीर

मोदी सरकारने दोन वर्षांपूर्वी केलेल्या नोटबंदीद्वारे चलनातून बाद केलेल्या १५,४१७९३ लाख कोटी रू. च्या नोटांपैकी १५,३१,०७३ लाख कोटी रू. च्या म्हणजे जवळजवळ ९९.३ टक्के चलनी नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्याचे अखेर देशासमोर आले आहे. परत आलेल्या नोटांची मोजणी पूर्ण झालेली नाही असे रिझर्व्ह बँकेकडून आजवर सांगण्यात येत होते, परंतु अखेरीस दोन वर्षांनंतर ही मोजणी पूर्ण होऊन अंतिम आकडा आरबीआयच्या यंदाच्या ... Read More »

नवज्योतच्या गळाभेटीने पेटवली संतापाची ज्योत!

शंभू भाऊ बांदेकर पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत असे वाटणार्‍या भारतीयांची व भारताशीही मैत्रिपूर्ण वातावरण निर्माण व्हावे असे वाटणार्‍या पाकिस्तानी नागरिकांची संख्याही बरीच मोठी आहे. पण ते संबंध लष्करप्रमुखांशी गळाभेट घेऊन कसे दूर होतील, हे मात्र न सुटणारे कोडे आहे क्रिकेटमधून निवृत्त होऊन राजकारणात प्रवेश केलेल्या इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर आरूढ होऊन आता आपली सक्रिय राजकीय इनिंग सुरू केली ... Read More »

गोव्यात नेतृत्व बदलाचा प्रश्‍नच नाही ः तेंडुलकर

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आमचे नेते असून त्यांचे नेतृत्व बदलण्याचा प्रश्‍नच नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी काल स्पष्ट केले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या आजारावरील पुढील उपचारार्थ अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतल्याने बुधवारी सकाळी भाजप कोअर समितीच्या सदस्यांनी तातडीने मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती. त्यानंतर राज्यातील प्रशासकीय, राजकीय स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ... Read More »

१५ बड्या उद्योगपतींच्या लाभासाठीच पंतप्रधानांचा नोटाबंदी निर्णय ः राहुल

देशातील १५ बड्या उद्योगपतींचा फायदा करून देण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले. मोदी यांच्या नोटाबंदीच्या या निर्णयानंतर उद्योगपतींनी आपल्या काळ्या पैशाचे रुपांतर पांढर्‍या पैशात केले असा घणाघाती आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल येथे पत्रकार परिषदेत केला. नोटाबंदी हा देशात झालेला सर्वात मोठा भ्रष्टाचार सिद्ध झाला असल्याचा दावाही त्यांनी केला. नोटाबंदीमुळे ... Read More »

मडगाव उपनिबंधकांना घेरावामुळे महिला कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अटक

मडगाव येथील उपनिबंधकांच्या कार्यालयात जन्म नोंदणी, विवाह नोंदणीचे दाखले मिळण्यास तीन ते चार महिने लागतात व सर्वसामान्यांना त्यासाठी वारंवार हेलपाटे पडत असल्याच्या निषेधार्थ प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपनिबंधक दुमिंगो मार्टिन यांना काल घेराव घालून जाब विचारला. यावेळी प्रचंड गोंधळ झाल्यामुळे पोलिसांना पाचारण केल्यानंतर पोलिसांनी सर्वांना अटक केली. नंतर जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी दाखले मिळविण्यासाठी शेंकडो ... Read More »

दुचाकीवरून २२ राज्यांतून प्रवास करून पत्रकार गोव्यात

रस्ता वाहतूक सुरक्षा आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या जनजागृतीसाठी आपल्या दुचाकीवरून देशभ्रमण करणारे नवी दिल्लीतील ६० वर्षीय निवृत्त पत्रकार शरत शर्मा २२ राज्यातून सुमारे २२,६५० किलो मीटरचा प्रवास करून गोव्यात पोहोचले आहेत. देशातील विविध राज्यातून प्रवास करताना वाटेत वाहतूक सुरक्षा, फिटनेसबाबत वाहन चालक आणि नागरिकांना माहिती देण्याचे काम करतो. सामाजिक बांधीलकीतून ही जनजागृती मोहिमेला सुरुवात केली आहे. या जनजागृती मोहिमेतून १ हजार ... Read More »

१५०० मीटरमध्ये जॉन्सनला सुवर्ण

भारतीय धावपटू जिन्सन जॉन्सन याने १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत काल गुरुवारी सुवर्णपदकाची कमाई करताना स्वतःला इतिहासाचा भाग बनवले. त्याने ३.४४.७२ मिनिटे अशी वेळ नोंदविली. आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारात तब्बल ५६ वर्षांनी भारताला प्रथम स्थान मिळाले आहे. १९६२ साली मोहिंदर सिंग यांनी भारताला गोल्ड जिंकून दिले होते. या प्रकारात महिला विभागात २००२ साली बुसान आशियाई क्रीडा स्पर्धेत सुनीता राणीने भारताला ... Read More »

महिलांची सोनेरी कामगिरी

>> चार बाय ४०० मीटरमध्ये पुरुषांना रौप्य भारताच्या महिलांनी चार बाय ४०० मीटर रिले प्रकारात अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदकाची कमाई केली. आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग पाचव्यांदा या प्रकारात भारताने सुवर्ण कमाई केली. पुरुषांना मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला संघात हिमा दास, एम.आर. पूवम्मा, सरिताबेन गायकवाड व विस्मया वेल्लुवा करोथ यांचा समावेश होता. त्यांनी ३ मिनिटे २८.७२ सेकंदसह सुवर्ण आपल्या नावे केले. ... Read More »

इंधनाचा भडका

देशामध्ये इंधनाचे दर पुन्हा एकदा कडाडत चाललेले दिसत आहेत. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले विक्रमी अवमूल्यन, इराणसारख्या भारताच्या मोठ्या इंधन पुरवठादारावर अमेरिकेने घातलेले निर्बंध, जागतिक तापमानवाढीवर नियंत्रणासाठी कच्च्या तेलावर लागू करण्यात आलेली नवी मानके अशी अनेक बाह्य कारणे जरी त्यामागे असली, तरीदेखील सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पावले उचलण्याची नितांत आवश्यकता आज भासते आहे. इंधनाचे दर ठरविण्याचा अधिकार भले तेल ... Read More »

काश्मीरमधले नवे आव्हान

शैलेंद्र देवळाणकर जम्मू-काश्मीरमध्ये सत्यपाल मलिक यांनी नवे राज्यपाल म्हणून कार्यभार हाती घेतला असला तरी ताज्या दोन घटनांमुळे त्यांच्यापुढील आव्हानांमध्ये भर पडली आहे. बकरी ईदच्या दिवशी श्रीनगरमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये इस्लामिक स्टेटचे झेंडे ङ्गडकावले गेले. हा पाकिस्तानचा सुनियोजित कट असून भारताला बदनाम करण्याचा डाव आहे. त्याचा मुकाबला करावा लागेल. ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. काश्मिरसंदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये तीन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी ... Read More »