ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: July 10, 2018

सुर्लचा आदर्श

आपल्या गावामध्ये दारूचा भस्मासुर नको या निर्धाराने उभ्या ठाकलेल्या सुर्ल – सत्तरीच्या ग्रामस्थांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. सुर्ल हा गोवा – कर्नाटक सीमेवरचा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचा छोटासा पण अतिशय सुंदर गाव. कर्नाटक सीमेवर वसल्याने आणि कर्नाटकाच्या तुलनेत गोव्यात दारू स्वस्त असल्याने गोव्याला पर्यटनासाठी येणारे आणि गोव्याहून कर्नाटकात परतणारे दारूबाज सुर्लमध्ये मदिराप्राशनासाठी, मद्य खरेदीसाठी हमखास थांबतात. शिवाय पावसाळ्यात येथील चोर्ला घाटातील नयनरम्य ... Read More »

गुन्हेगारी वृत्तीचे उदात्तीकरण नको

देवेश कु. कडकडे (डिचोली) आम्ही फक्त अमक्या तमक्याचा चित्रपट पाहायला जातो, या सर्व सबबी तकलादू आहेत. मुख्य प्रश्‍न आहे, आपण यातून समाजविघातक कृत्यांना एका तर्‍हेने समर्थन देत असतो आणि हीच दृष्कृत्ये वाढीला लागून आपल्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाहीत. खंडणी, हत्या, दहशतवाद, हवालाकांड, संघटित गुन्हेगारी यात सहभागी असलेल्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट निर्’ाण होऊन त्यांना नायकाच्या रुपात सादर केले जाते. यात ... Read More »

गव्यारेड्याच्या हल्ल्यात गुळेलीत युवती ठार

>> शेळ-मेळावली येथील दुर्घटना >> दीड महिन्यात सत्तरीत दुसरा बळी गुळेली, सत्तरी पंचायत क्षेत्रात गव्यारेड्यांचा धुमाकूळ सुरूच असून काल शेळ – मेळावली येथे गव्यारेड्याने दुचाकीवर केलेल्या हल्ल्यात पूजन पुंडलिक मेळेकर (२५) ही दुचाकीस्वार युवतीचा मृत्यू झाला. ती उसगाव येथील नेस्ले या कंपनीची कंत्राटी कामगार आहे. सदर दुर्दैवी हल्ला सकाळी सातच्या सुमारास ती कामावर जातेवेळी झाला. गेल्या दीड महिन्यात गव्यारेड्याने गुळेली ... Read More »

पावसाळी अधिवेशनासाठी १७३३ प्रश्‍न

राज्य विधानसभेच्या १९ जुलैपासून ३ ऑगस्टपर्यंत चालणार्‍या पावसाळी अधिवेशनासाठी आमदारांनी आत्तापर्यंत एकूण १७३३ प्रश्‍न सादर केले आहेत. सरकारच्या वतीने सात प्रस्तावित विधेयके सादर करण्यात आली आहेत. तसेच दोन खासगी विधेयके सादर करण्यात आली आहेत. पावसाळी अधिवेशन १२ दिवस चालणार आहे. या अधिवेशनाचे पहिले दोन दिवस अर्थसंकल्पावर चर्चा व मुख्यमंत्र्यांकडून उत्तर दिले जाणार आहे. त्यानंतर १० दिवस अनुदानित पुरवणी मागण्यांवर चर्चा ... Read More »

नवीन सीआरझेड कायदा रद्द करा

>> राजकीय पक्ष, स्वयंसेवी संघटनांची मागणी केंद्र सरकारने नव्याने जारी केलेली सीआरझेड अधिसूचना २०१८ चा मसुदा रद्दबातल करावा, अशी मागणी स्वयंसेवी संघटना व राजकीय पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषदेत काल केली. केंद्र सरकारने जारी केलेल्या सीआरझेड अधिसूचना २०१८ च्या मसुद्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या नवीन सीआरझेड अधिसूचना २०१८ च्या मसुद्याला राज्यातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था व राजकीय ... Read More »

भंडारी समाजाच्या दोन्ही समित्यांमध्ये समेट

>> पदाधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय गोमंतक भंडारी समाजाच्या दोन वेगवेगळ्या गटांनी काल आपल्या समाजातील राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत एकत्र येऊन आपल्यातील मतभेद व हेवेदावे विसरून समाज परत एकदा एकसंध करण्याचा निर्णय घेतला. अनिल होबळे व फक्रू पणजीकर यांच्या अध्यक्षतेखालील समाजाच्या दोन वेगवेगळ्या समित्यांनी काल हा निर्णय घेतला. उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय आयुषमंत्री असलेले समाजाचे एक नेते श्रीपाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ... Read More »

तुल्यबळ संघांत घमासान!

>> फ्रान्स- बेल्जियम उपांत्य सामना आज फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना आज फ्रान्स व बेल्जियम यांच्यात खेळविला जाणार आहे. जागतिक क्रमवारीत बेल्जियमचा संघ तिसर्‍या तर फ्रान्सचा सातव्या स्थानी आहे. फ्रान्स संघ दुसर्‍यांदा विश्‍वविजेता बनण्याच्या प्रयत्नात असून ‘अंतिम १६’ व उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी अनुक्रमे अर्जेंटिना व उरुग्वेला नमवून आपली सिद्धता दाखवून दिली आहे. दुसरीकडे ‘रेड डेव्हिल्स’ म्हणून सुपरिचित असलेल्या ... Read More »

फेडरर, नदाल उपांत्यपूर्व फेरीत

स्वित्झर्लंडचा अव्वल मानांकित रॉजर फेडरर व स्पेनच्या द्वितीय मानांकित राफेल नदाल यांनी काल सोमवारी विंबल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. फेडररने फ्रान्सच्या २२व्या मानांकित ऍड्रियन मन्नारिनो याचा सरळ तीन सेटमध्ये ६-०,७-५,६-४ असा पराभव केला तर नदालने झेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्ली याला ६-३, ६-३, ६-४ असे पाणी पाजले. उपांत्यपूर्व फेरीत फेडररचा सामना द. आफ्रिकेच्या केविन अँडरसन याच्याशी होणार आहे. जपानच्या ... Read More »

कव्हर स्टोरी (दोन पाने ४,५) पावसाळ्यात त्रास देणारा ‘अतिसार’

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) ‘अतिसार’ हा आजार वरवर साधा वाटणारा पण योग्य उपचाराअभावी मृत्यूही होऊ शकतो असा आहे. पावसाळ्यातील अस्वच्छ पाण्याच्या संपर्काने हा आजार पावसाळ्यात त्वरित पसरतो. पावसाळ्यात पाणी हे जीवजंतुयुक्त, दूषित, ज्यामध्ये प्राण्यांचे मल-मूत्रादी घटक झिरपतात, कुजके गवत, केरकचरा, शेवाळ असलेले, किडे पडलेले पावसाचे पाणी, गटार ज्यात वाहून येते असे गढूळ, रंगीत, फेसाळ, दुर्गंधीयुक्त, वाईट चवीचे, अति शीत अशा ... Read More »

संग्रहणी

 वैदू भरत नाईक ‘संग्रहणी’ म्हणजे थोडक्यात ‘हगवण’. विशेषतः या विकाराचे स्त्रीरोगीच जास्त आढळतात. आमांश, अतिसार बरेच दिवसांचा असला की लहान आतड्यातील त्वचेची आतील बाजू बिघडते व त्यामुळे अन्न नीट न पचता बाहेर पडते. आमांश व अतिसार बरा झाल्यावर पचनास जड, तेलकट पदार्थ खाण्यात आल्यास आतड्याला त्याचे पचन करणे लगेच शक्य नसते. कारण ते अगोदरच आमांशाने दुर्बल झालेले असते. व्हिटॅमिन्सचा अभाव, ... Read More »