ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: July 9, 2018

झुंडशाहीचे बळी

देशात गेल्या वर्षभरात सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवांमुळे नऊ राज्यांमध्ये २७ जणांची हिंसक जमावाकडून हत्या झाल्याची सुन्न करणारी आकडेवारी समोर आली आहे. अगदी पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रापासून मागासलेल्या झारखंडपर्यंत आणि संस्कृतीप्रेमी दाक्षिणात्य राज्यांपासून ईशान्येतील आसाम, त्रिपुरापर्यंत हे प्रकार घडले आहेत. एखाद्या अफवेची खातरजमा करण्याची वाट न पाहता आणि मागचा पुढचा विचार न करता झुंडीच्या झुंडी एखाद्याच्या जिवावर उठायला पुढे सरसावतात हे चित्र ... Read More »

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) युती तोडण्यासाठी मेहबूबांनी पहिले पाऊल उचलले असते तर त्याचा त्यांना राजकीय लाभ झाला असता. ती संधी भाजपाने त्यांना का द्यावी? म्हणून त्याने स्वत:च सरकार पाडण्याचे पहिले पाऊल उचलले. जम्मू काश्मीरमधील मेहबुबा सरकारचा पाठिंबा काढून घेऊन तेथे राज्यपाल राजवटीचा मार्ग प्रशस्त करणे हा भाजपाचा निर्णय असला व त्यामुळे त्याला ‘भाजपाचा मास्टरस्ट्रोक’ म्हणण्याचा मोह आवरत नसेल तर मला ... Read More »

तिळारी घाट अपघातात पाच ठार

>> कार दिडशे फूट दरीत कोसळली, मृत तरुण बेळगावचे तिळारी रामघाट येथे कार दिडशे फूट खोल दरीत पडून झालेल्या अपघातात बेळगाव येथील पाच पर्यटकांचा मृत्यू झाला. तिलारीनगर येथील लष्कर दर्शन (पॉंईंट) स्थळावर निसरड्या वाटेने चालकाने कार नेली. त्यामुळे ब्रेक न लागता व तेथे संरक्षण कठडा नसल्यामुळे कार सरळ खाली दिडशे फूट दरीत कोसळली व हा अपघात झाला. यात कारमधील पाचही ... Read More »

लोकसभेसाठी भाजपसोबत जेडीयूची युती

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जनता दल संयुक्तचा (जेडीयू) भाजपला पाठिंबा असेल असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व भाजप वेगवेगळे लढणार असल्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. भाजप-जेडीयू युती होणार असली तरी दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे जेडीयूच्या सूत्रांनी सांगितले. बिहारमध्ये काल जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात २०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपसोबत युती करून लढवण्याच्या निर्णयावर ... Read More »

थायलंडमध्ये अडकलेल्या ६ खेळाडूना बाहेर काढले

तब्बल १६ दिवसांनंतर थायलंडच्या गुहेत अडकलेल्या १२ पैकी ६ मुलांना बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले आहे. गुहेत अडकलेले १२ खेळाडू आणि एका प्रशिक्षकाला वाचण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. १३ विदेशी पाणबुडे आणि थायलंडच्या नौदलाचे ५ कमांडो या मुलांना बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. सहा मुलांना वाचवण्यात आल्याने आता उर्वरित मुले वाचण्याची आशा वाढली आहे. सर्व मुले बाहेर काढण्यासाठी ... Read More »

मगो पक्षातर्फे युतीचा अद्याप निर्णय नाही : दीपक ढवळीकर

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर युती करायची की नाही याचा मगो पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. येत्या डिसेंबर महिन्यात पक्षाची नवी केंद्रीय समिती निवडण्यात येणार आहे. त्यानंतरच युतीसंबंधी काय तो निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना दिली. भाजपबरोबर येत्या लोकसभा निवडणुकीत युती करायची की नाही याचा निर्णय घेण्याची जबाबदारी आम्ही पक्षाच्या नव्या ... Read More »

राष्ट्रपतींचे नवी दिल्लीस प्रयाण

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि भारताच्या प्रथम महिला श्रीमती सविता कोविंद गोव्याच्या दोन दिवसांच्या भेटीनंतर आयएनएस हंसा दाबोळी विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, पोलीस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर आणि रीयर ऍडमिरल हेमंत पडबिद्री व शिष्टाचार सचिव डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांनी त्यांना निरोप दिला. जुने गोवा चर्च, ... Read More »

सरकारी परिचारिकांना विशेष प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री

इस्पितळातील विविध विभागांत काम करण्यासाठी सरकारी परिचारिकांना विशेष प्रशिक्षण देण्याचा विचार आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल सांगितले. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत संस्थांशी हातमिळवणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सध्या सर्व परिचारिका सर्व विभागात काम करतात, मात्र, आता अतिदक्षता विभाग, बालरोग विभाग अशा वेगवेगळ्या विभागांत काम करण्यासाठी परिचारीकांना विशेष प्रशिक्षण देण्याचा विचार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. ... Read More »

सुर्ला गावात ग्रामस्थांकडून दारू बंदी

>> गाव एकवटले, एकमताने ठराव संमत दारूबंदीविरोधात सत्तरी तालुक्यातील सुर्ला ग्रामस्थ एकवटले असून गावातील सर्व बार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील सर्वच घरांतील लोकांनी बार बंदीला आपला पाठिंबा दिला. त्यामुळे गावातील देवस्थानात झालेल्या बैठकीत बार बंदीचा ठराव समंत करण्यात आला. सुर्ला गावात कर्नाटकमधून पर्यटक येतात. गावात एकूण नऊ बार आहेत. शनिवार-रविवारी हे पर्यटक गावात दाखल होतात व दारू पिऊन ... Read More »

राष्ट्रपतींच्या सत्कारप्रसंगी कवळेकरांचा अनादर ः आमोणकर

सरकारने राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांचा योग्य आदर न राखता शिष्टाचाराचे उल्लंघन केले आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली. या सोहळ्यात विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही. सरकारने राष्ट्रपतींचा नागरी सत्कार सोहळा तमाम गोमंतकीयांच्यावतीने आयोजित केला होता. त्यामुळे या सोहळ्यात व्यासपीठावर विरोधी ... Read More »