ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: July 7, 2018

जुगार कायदेशीर!

भारतामध्ये जुगार आणि सट्टेबाजी कायदेशीर करावी अशी शिफारस कायदा आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. देशात जुगार आणि सट्टेबाजी प्रचंड प्रमाणात चालते व त्यावर सरकार नियंत्रण आणू शकत नाही. त्यामुळे त्याला कायदेशीर स्वरूप देऊन त्याद्वारे सरकारने अधिकृतरीत्या महसूल मिळवावा असे कायदा आयोगाचे एकंदरीत म्हणणे आहे. जुगार आणि सट्टेबाजी यांना ज्या देशांमध्ये कायदेशीर मान्यता आहे, तेथील सरकारांना त्यापासून प्रचंड उत्पन्न मिळते. चीनच्या ... Read More »

तीव्र गरज लढाऊ विमानांची…

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) एकीकडे भारतापुढे असलेला संरक्षणधोका वाढत चाललेला असतानाच युद्धसज्जतेसाठी आवश्यक असणार्‍या उणिवा भरून काढण्याच्या दिशेने सरकारदरबारी ङ्गारशी गतिमानता दिसून येत नाही. याचे मोठे उदाहरण म्हणजे भारतीय वायुसेनेत सध्या असणारी लढाऊ विमानांची फार मोठी कमतरता. भारतीय वायुसेनेत सध्या लढाऊ विमानांची (फायटर/इंटरसेप्टर्स) फार मोठी कमतरता आहे आणि भविष्यात ती अधिकच भीषण होत जाणार आहे. ही कमी पूर्ण करण्यात होत ... Read More »

ग्रामीण भागांसह शहरांमध्येही पावसाचा हाहाःकार

काणकोणपासून पेडण्यापर्यंत संपूर्ण राज्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाने थैमान घातल्याने काल सर्वत्र हाहाःकार उडाला. राजधानी पणजीलाही गुरुवारी सकाळी व संध्याकाळी वादळी वार्‍याचा तडाखा बसला. शुक्रवारी सकाळी सांतइनेज, काम्राभाट या भागातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने तेथील लोकांना अन्यत्र हलविण्यात आले. आश्‍वे येथे दरड कोसळली. खंडीत वीज पुरवठ्यामुळेही लोकांची तारांबळ उडाली. अवेडे-पारोडा पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. पणजीसह अनेक भागांमध्ये झाडे घरे ... Read More »

गोवा अँटिबायोटिक्सकडून यापुढे औषध खरेदी नाही ः आरोग्यमंत्री

गोवा अँटिबायोटिक्स औषधे देण्यास दीर्घ विलंब लावत असल्याचे दिसून आल्याने यापुढे त्यांच्याकडून औषधांची खरेदी करायची नाही असा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. १५ ते २० दिवसपर्यंत ते आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा करत नसल्याचे दिसून आल्याने गोवा अँटिबायोटिक्सला कारणे दाखवा नोटीसही पाठण्यात आली होती, अशी माहितीही राणे यांनी यावेळी दिली. जास्त ‘साईड इफेक्ट्‌स’ असलेल्या जुन्या ... Read More »

लवकरच ७ नव्या रुग्णवाहिका

येत्या मंगळवारी आणखी ७ नव्या १०८ रुग्णवाहिका आणण्यात येणार असून त्यात अत्याधुनिक अशा व्हेंटिलेटर्सची सोय असेल अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या रुग्णवाहिकांत काम करण्यासाठी युवक-युवतींना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहितीही राणे यांनी दिली. गोवा शिपयार्डने एक रुग्णवाहिका दिलेली असून ती चिखली येथील इस्पितळाजवळ ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. १०८ रुग्णवाहिकेचा काणकोण येथे आणिबाणी ... Read More »

रेशन दुकानदारांना कमिशन वाढविण्यावर विचार ः गावडे

राज्यातील स्वस्त धान्य दुकानात पीओएस यंत्रणा बसविण्याच्या निर्णयावर सरकार ठाम आहे. पीओएस यंत्रणेबाबत स्वस्त धान्य दुकान मालकांच्या काही समस्या असल्यास त्यावर निश्‍चित तोडगा काढला जाईल. दुकान मालकांना कमिशन वाढवून देण्यावर विचार केला जात आहे, अशी माहिती नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी काल दिली. पीओएस यंत्रणा बसविण्याच्या विरोधात काही जणांनी निवेदन सादर केले आहे. दुकान मालकांच्या प्रश्‍नावर विचार करून योग्य ... Read More »

मिरामार कॉंक्रिट रस्त्याचा चौकशी अहवाल जाहीर करा ः कॉंग्रेस

मिरामार ते दोनापावल या सिमेंट क्रॉंक्रीटच्या रस्त्याला तडे गेल्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रस्त्याची पाहणी करून तत्कालीन मुख्य सचिवांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. या रस्त्याच्या कामाची चौकशी झाली की नाही ? सरकारने चौकशी अहवाल जाहीर करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते ऍड. यतीश नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केली. मिरामार ते ... Read More »

राष्ट्रपती कोविंद आज गोव्यात

>> विद्यापीठाचे पदवीदान व नागरी सत्कार गोवा विद्यापीठाच्या वार्षिक पदवीदान सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज गोव्यात आगमन होत आहे. आज दुपारी १२ वाजता बांबोळी पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार्‍या या सोहळ्यात राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल. गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यावेळी अध्यक्षस्थानी असतील. सन्माननीय पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे हजर असतील. संध्याकाळी ५ वाजता दोनापावला येथील राष्ट्रीय ... Read More »

फ्रान्स सेमीफायनलमध्ये

>> उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेला २-० ने नमविले फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या काल शुक्रवारी झालेल्या सामन्यात १९९८च्या विजेत्या फ्रान्सने उरुग्वेचा २-० असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. फ्रान्सकडून राफेल वाराने आणि एंटोइन ग्रीझमन यांनी प्रत्येकी एक गोल केला. फिफा क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या फ्रान्सने चौदाव्या स्थानावरील उरुग्वेवर सामन्याच्या सुरुवातीपासून दबाव टाकला आणि आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना ४०व्या ... Read More »

भारताचे इंग्लंडसमोर १४९ धावांचे लक्ष्य

कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने कार्डिफमध्ये खेळविण्यात येत असलेल्या दुसर्‍या टी-२० लढतीत ५ गडी गमावत इंग्लंडसमोर १४९ धावांचे लक्ष्य ठवेले आहेे. भारतीय संघाने या सामन्यासाठी कोणताही बदल केला नाही. तर इंग्लंडने गेल्या सामन्यात काहीसा महागडा ठरलेल्या मोईन अलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा कर्णधार ईयॉन मॉर्गेनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा हा निर्णय योग्य ... Read More »