ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: July 6, 2018

बळीराजासाठी..

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या फेब्रुवारीतील आपल्या अर्थसंकल्पामध्ये सूतोवाच केल्यानुसार शेतकर्‍यांच्या कृषी उत्पन्नाच्या किमान हमीभावामध्ये दीडपट वाढ करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर हमीभावात वाढ केल्याने शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात दिलासा जरी मिळणार असला, तरी हे पाऊल निव्वळ राजकीय लाभ डोळ्यांपुढे ठेवून उचलले गेले आहे यात शंका नाही. भाजपची सत्ता असलेल्या, परंतु ती गमावण्याची शक्यता ... Read More »

असे केले पाकिस्तानशी दोन हात…

भारताचे माजी उपपंतप्रधान तथा थोर दलित नेते बाबू जगजीवनराम यांची आज ६ जुलै रोजी ३२ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून पाकिस्तानशी दोन हात केले, ते त्यांच्याच शब्दांत… बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेव्हा तेथील युवा, विद्यार्थी यांनी लढा सुरू केला, तेव्हा पाकिस्तानने भारताच्या एक लाख फौजेला त्रास देण्यास सुरुवात केली. माझे सहकारी मला विचारत की, ‘या माध्यमातून बांगला देश स्वतंत्र होईल ... Read More »

रस्ता अपघातांमध्ये मे महिन्यात १४ बळी

राज्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक आणि पोलीस खात्यातर्फे कडक उपाय केले जात असताना मे महिन्यात रस्ता अपघातांमध्ये तब्बल १५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती वाहतूक खात्याने दिली आहे. या महिन्यात एकूण ३२० वाहन अपघातांची नोंद झाली असून १४ जणांचे बळी १३ भीषण अपघातांनी घेतले आहेत. वाहतूक खात्याने मे महिन्यातील अपघातांच्या माहितीचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार मे महिन्यात १३ जीवघेण्या ... Read More »

सत्तरी तालुक्यातील नानोडा, बांबर येथे काल पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात १४ फूट लांबीचा पकडण्यात आलेला किंगकोब्रा. वाळपई वन खात्याचे अधिकारी व प्राणीमित्रांनी नंतर त्याला अभयारण्यात सोडून दिले. Read More »

साखळीतील दत्तमंदिर चोरट्यांनी फोडले

>> अडीच लाखांचा ऐवज लंपास साखळी येथील प्रसिद्ध दत्तमंदिरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून दरवाजा तोडून मंदिरातील सुमारे २.५० लाख रुपये किमतीचे सामान चोरून नेल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री एकच्या नंतर ही चोरी केल्याचा अंदाज आहे. यामुळे साखळी भागात एखादी टोळी कार्यरत असल्याचे सिद्ध होत असून पोलीस गस्तीत वाढ करण्याची मागणी होत आहे. डिचोली पोलीस निरीक्षक संजय दळवी ... Read More »

दुप्पट कृषी उत्पन्नाचे उद्दिष्ट ः श्रीपाद

केंद्र सरकारकडून शेती विकासावर भर दिला जात असून २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. कंत्राटी शेतीमुळे पडीक शेतजमीन लागवडीखाली येण्यास चालना मिळणार आहे असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केले. केंद्र सरकारने पिकाच्या आधारभूत किमतीमध्ये केलेल्या वाढीचा शेतकर्‍यांना निश्‍चितच लाभ मिळणार असल्याचे ते म्हणाले. शेतकर्‍यांना युरिया खत मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले ... Read More »

हृदयविकार उपचारासाठी गोमेकॉ घेणार मियामी विद्यापीठाची मदत

>> सामंजस्य करार लवकरच ः आरोग्यमंत्री राज्यातील हृदयविकाराच्या रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचारासाठी मियामी विद्यापीठाची मदत घेतली जाणार आहे. यासंबंधी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि मियामी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार लवकरच केला जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. राज्यात ३५ वर्षे वयाच्या युवकालासुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशा रुग्णांवर वेळीच उपचार करण्याची गरज असते. हृदयविकाराचा ... Read More »

इनोव्हेशन काऊन्सिलच्या वेबसाइटचा शुभारंभ

गोवा राज्य इनोव्हेशन काऊन्सिलच्या वेबसाइटचा शुभारंभ मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते काल करण्यात आला. राज्याचे माहिती तंत्रज्ञान धोरण लवकरच जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पर्रीकर यांनी याप्रसंगी बोलताना दिली. या काऊन्सिलच्या वेबसाइटच्या माध्यमातून राज्यातील महाविद्यालयीन, विद्यापीठ विद्यार्थी, उद्योजक, गुंतवणूकदार यांच्यातील नवीन संकल्पना, उपक्रम, प्रतिभा, कौशल्य यांना उत्तेजन मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली. या वेबसाइटच्या ... Read More »

कॉंग्रेस पक्षात कार्यकर्त्यांना मान मिळतो का?

>> भाजपचा गिरीश चोडणकरांना प्रतिटोला गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसंबंधी केलेले आरोप दिशाभूल करणारे आहेत. भाजप आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य मान राखत आहे. कॉंग्रेस पक्षात कार्यकर्त्यांचा किती मान राखला जाते हे तपासण्याबरोबरच कॉंग्रेस पक्षाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी चोडणकर यांनी प्रयत्न करावेत असा प्रतिहल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ... Read More »

ब्राझिलसमोर बेल्जियमचे आव्हान

रशियात सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा जेदेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या ब्राझिलची लढत जागतिक तिसर्‍या स्थानावरील बेल्जियमशी होणार आहे. जागतिक दुसर्‍या स्थानी असलेल्या ब्राझिलने गट फेरीत चकमदार कामगिरी केलेल्या मेक्सिकोवर मात करीत अंतिम आठ संघातील आपले स्थान निश्‍चित केलेले आहे. तर बेल्जियमने आशियाई संघ जपानचे आव्हान मोडित काढत ब्राझिलविरुद्धची उपांत्यपूर्व लढत पक्की केली होती. ब्राझीलची मदार त्यांचा स्टार ... Read More »