ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: July 5, 2018

सामंजस्याची बात

दिल्लीमधील आम आदमी पक्षाचे सरकार आणि तेथील नायब राज्यपाल यांच्यात गेली जवळजवळ तीन वर्षे सुरू असलेल्या शीतयुद्धाला विराम देऊ शकेल अशी अपेक्षा ज्याच्यामुळे बाळगता येईल असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने काल दिला आहे. लोकनियुक्त सरकार आणि नायब राज्यपाल यांनी एकमेकांविरुद्ध संघर्षाच्या पवित्र्यात उभे न राहता भारतीय संविधानानुसार परस्पर समन्वयानेच काम केले पाहिजे असे या निवाड्याचे एकंदरीत सार आहे. नायब राज्यपालपद ... Read More »

काश्मीरमध्ये एनएसजी ः केंद्राचा हुकमी एक्का

– शैलेंद्र देवळाणकर काश्मीरमध्ये वाढत गेलेला हिंसाचार लक्षात घेऊन आणि पाकिस्तानचे आगामी काळातील मनसुबे विचारात घेऊन केंद्र सरकारने तेथे एनएसजी कमांडोंना तैनात केले आहे. एनएसजी हा केंद्राचा हुकुमी एक्का आहे. शेवटचा पर्यात म्हणून वापरले जाणारे आयुध आहे… काश्मीर हा  जगामधील हाय मिलिटराईज्ड झोन म्हणजे लष्कराच्या प्रभावाखाली असलेला प्रदेश अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. या परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा दल आणि ब्लॅक ... Read More »

खाणप्रश्‍नी पूर्ण अभ्यासानंतरच पंतप्रधानांना भेटणार ः मुख्यमंत्री

>> तूर्त खाणींशी संबंधित सर्व घटकांशी चाललीय चर्चा खाणींशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करण्याचे काम सध्या चालू आहे. एकदा हे काम संपले की राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग लवकरात लवकर सुरू करता यावा यासाठी कोणते पर्याय आहेत त्याचा आपण अभ्यास करणार असून नंतरच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. काल ... Read More »

१४ पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ

>> हमीभाव दीडपट वाढविण्यास मोदी सरकारची मंजुरी लोकसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विविध धान्यांच्या आधारभूत किमतीत भरीव वाढ जाहीर केली आहे. धान्यांच्या आधारभूत किंमतींमध्ये (हमी भाव) ऐतिहासिक वाढ करून सरकारने शेतकर्‍यांना दिलेले आश्‍वासन पूर्ण केले असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी काल याबाबत घोषणा केल्यानंतर ट्विटरवरून केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने याबाबत काल ... Read More »

राज्यपाल राज्य कारभारात अडथळा ठरू शकत नाही

>> केजरीवालांना न्यायालयाचा दिलासा अधिकारांसंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी गेल्या बर्‍याच काळापासून सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर काल सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना दिलासा देणारा निवाडा दिला. राज्य प्रशासनाचे निर्णय घेण्याचा नायब राज्यपालांना अधिकार नसून निवडून आलेल्या सरकारचा सल्ला त्यांना (नायब राज्यपालांना) बंधनकारक आहे असे या निवाड्यात स्पष्ट करण्यात आले. मात्र कायदा व सुव्यवस्था आणि जमीन ... Read More »

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास राज्य सरकारचे प्राधान्य

राज्यातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासंबंधी कृती योजना तयार करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह खात्याच्या अभियंत्यांची बैठक घेतली. राज्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्य क्रमाने हाती घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. संबंधित कार्यकारी अभियंत्यांना आपापल्या भागांत जाऊन तेथील रस्त्यांची पाहणी करुन दर आठवड्याला रस्त्यांवरील खड्डे, कोसळलेली झाडे तसेच धोकादायक स्थितीत असलेली झाडे यासंबंधीचा ... Read More »

राष्ट्रपती कोविंद यांचे शनिवारी गोव्यात आगमन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे येत्या ७ जुलैला गोव्यात आगमन होणार असून ८ जुलैपर्यंत ते गोव्यात असतील. राष्ट्रपती कोविंद प्रथमच गोव्यात येत असल्याने त्यांचा ७ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता दोनापावल येथील एनआयओ सभागृहात नागरी सन्मान करण्यात येणार आहे. माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक टी. एस. सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल ही माहिती दिली. राष्ट्रपती कोविंद यांचे ७ रोजी सकाळी दाबोळी ... Read More »

हरवळेतील अपघातात महिला ठार

साखळी – होंडा मुख्य रस्त्यावरील हरवळे येथील मारुती शोरूमजवळ काल सकाळी इनोव्हा कारने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात गाडीतील रेन्सी जॉय (वय ३८) ही आजोबा नगर होंडा येथील महिला जागीच ठार झाली. तर पती बिजो जॉय किरकोळ जखमी झाला. जीए ०४-सी-४१४३ क्रमांकाच्या इनोव्हा कारने बिजो जॉय व त्यांची पत्नी रेन्सी जॉय हे साखळीहून होंडा येथे जात असताना चालक बिजो जॉय ... Read More »

माशेलमधील ‘त्या’ कुमारी मातेला न्याय मिळवून देण्याचे आयोगाचे आश्‍वासन

माशेल येथील कुमारी माता आणि तिच्या चार महिन्यांच्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसने गोवा महिला आयोगाकडे काल केली. आयोगाने संबंधितांना सहकार्याचे आश्‍वासन दिले आहे. महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली महिला कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कुमारी माता आणि तिच्या निकटवर्तीयांनी गोवा महिला आयोगाच्या अध्यक्ष ऍड. शुभलक्ष्मी नाईक यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कुमारी माता आणि तिच्या मुलीची ... Read More »

रोजगार विनिमय केंद्रात ऑनलाईन नोंदणी पोर्टलचा मुख्यमंत्र्यांहस्ते प्रारंभ

रोजगार विनिमय केंद्रात ऑनलाईन नोंदणीची सुविधा असलेल्या नॅशनल करियर सर्व्हिस पोर्टलचा काल पर्वरी येथे मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. बेरोजगार युवा वर्ग तसेच नोकर्‍या देणार्‍या कंपन्या व आस्थापने अशा सर्वांनाच या पोर्टलचा फायदा होणार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी सागितले. कामगार आणि रोजगार मंत्री रोहन खंवटे हेही यावेळी हजर होते. बेरोजगार युवक ... Read More »