ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: July 4, 2018

पर्यायाचा शोध

मराठी साहित्यविश्वासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक न घेता सर्वानुमते निवड करण्याचा जो निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नुकताच नागपूरच्या बैठकीत घेतला तो ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. इ. स. १८७८ पासून नेमाने भरत असलेली ही साहित्य संमेलने आज अत्यंत भव्य दिव्य सोहळ्यामध्ये रुपांतरित झाली आहेत. त्यामुळे त्यांचा अध्यक्षही तेवढ्याच तोलामोलाचा असावा अशी साहित्यरसिकांची ... Read More »

नद्यांचे प्रदूषण आणि वैज्ञानिकतेचा अभाव

 ऍड. असीम सरोदे आपण दिखाऊ स्वरुपात पर्यावरण रक्षण करतो. लहरीपणा आणि विशेषाधिकार यांच्या वापरातून पर्यावरण वाचणार नाही. विशेषाधिकार हा पर्यावरणकेंद्री असला पाहिजे. त्यामध्ये कोणाचाही लहरीपणा, धार्मिकपणा चालणार नाही. अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने नदी स्वच्छतेचे काम झाले पाहिजे. वारकरी संप्रदायासाठी सर्वांत महत्त्वाचे स्थान असणार्‍या पंढरपुरातील चंद्रभागा नदीची अलीकडच्या काळात सातत्याने वाढत गेलेल्या प्रदूषणामुळे झालेली दुरवस्था कुणापासूनही लपलेली नाही. मात्र, असे असतानाही या ... Read More »

२०१९ मध्येही केंद्रात एनडीएचेच सरकार : पंतप्रधान

आपल्या सरकारने गेल्या चार वर्षांत वित्त, सुरक्षा, सामाजिक न्याय, विदेश धोरण अशा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याने देशाची जनता पुन्हा एकदा आपल्यावर विश्‍वास टाकणार आहे आणि २०१९ मध्ये आपलेच सरकार सत्तेवर येणार आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. एका नियतकालिकाला काल दिलेल्या मुलाखती त्यांनी विरोधकांच्या प्रस्तावित महाआघाडीची तसेच कॉंग्रेस पक्षाचीही खिल्ली उडवली आहे. विरोधकांची प्रस्तावित महाआघाडी म्हणजे ... Read More »

प्रतापसिंह राणे विधानसभेत मांडणार कॅटमाईन विषयावर लक्षवेधी सूचना

पिसुर्ले सत्तरी येथे एका आस्थापनांतून जप्त करण्यात आलेल्या कॅटमाईन या अमलीपदार्थाच्या विषयावर कॉंग्रेसचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. राज्यात अमलीपदार्थाचा विषय गंभीर बनलेला आहे. पिसुर्ले सत्तरी येथील भाजप नेते वासुदेव परब यांच्या आस्थापनांतून ताब्यात घेण्यात आलेल्या कॅटमाईन या अमलीपदार्थाचा विषय कॉंग्रेसचे ज्येष्ठ ... Read More »

सीआरझेड अधिसूचना : सरकारने भूमिका मांडावी : कॉंग्रेस

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्र सरकारच्या सीआरझेडच्या नवीन अधिसूचनेच्या प्रश्‍नावर स्पष्टीकरण करून सीआरझेडप्रश्‍नी सरकारची भूमिका स्पष्ट करावी. तसेच गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी सीआरझेड प्रश्‍नी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल केली. केंद्र सरकारच्या नवीन सीआरझेड अधिसूचनेमुळे राज्यातील पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या नवीन सीआरझेड अधिसूचनेला अनेक लोकांनी आक्षेप घेऊन संबंधित अधिकार्‍याकडे ... Read More »

कार्यवाहू डीजीपीपदी कोणाही अधिकार्‍याची नियुक्ती नको

>> सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश देशातील सर्व राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने काल आदेश जारी करून कोणाही पोलिस अधिकार्‍याची कार्यवाहू पोलीस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्ती न करण्याचे निर्देश दिले. देशाचे सरन्यायधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा आदेश जारी केला. सर्व राज्ये व संघ प्रदेशांच्या प्रशासनांनी केंद्रीय सार्वजनिक सेवा आयोगाला (युपीएससी) संभाव्य पोलीस महासंचालक किंवा पोलीस आयुक्तपदासाठी उमेदवार म्हणून वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांची ... Read More »

२ लाखांच्या गांजासह ५ युवकांना अटक

मडगाव पोलिसांनी काल पाजीफोंड येथील एका हॉटेलजवळ छापा टाकून पाच तरूणांना ताब्यांत घेऊन २ लाख रुपये किमतीचा ५४१ ग्रॅम गांजा हस्तगत केला. याप्रकरणी पोलिसांनी हरिश मदार (२२) मालभाट, विशाल कनुजा (१९) जुना बाजार, गौतम पवार (२०) गांधी मार्केट. शुभम नाईक (२२) इराभाट दवर्ली, केतन नेडली (१८) सिने लता मागे, या पाच जणाना दोन दुचाकींसहीत ताब्यांत घेतले. ते मोठ्या प्रमाणात गांजाचा ... Read More »

दक्षिण गोवा जिल्हाधिकारीपदी तारीक थॉमस

राज्य प्रशासनाच्या सचिव पदांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल राज्य प्रशासनातील सचिवांच्या पदांमध्ये बदल करण्यात आला आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांची बदली करण्यात आली असून दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी म्हणून आयएएस अधिकारी तारीक थॉमस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारीपदाचा तात्पुरता ताबा नीला मोहनन यांच्याकडे देण्यात आला आहे. मोहनन यांची शिक्षण, वीज, अपारंपरिक ऊर्जा, रोजगार व मजूर आणि महसूल सचिवपदी ... Read More »

धूम स्टाईल दुचाकी चालविल्याने युवक ठार

धूम स्टाईल दुचाकी शर्यत अंगलट येऊन एका युवकाचा काल अंत झाला. तर मोटरसायकलच्या मागे बसलेला दुसरा युवक गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी दोन युवक शबीद शेख व सोहेल खान हे केटीएक जीए ०६ आर ८६८३ या दुचाकीवरून भगवेगाने चिखली विमानतळ मार्गावरून दुसर्‍या एका दुचाकीला मागे टाकण्याच्या प्रयत्नात असताना दुचाकी चालक शबीद शेख याचा आपल्या दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्याची ... Read More »

स्वीडनची २४ वर्षानंतर उपांत्यपूर्व फेरीत धडक

>> स्वित्झर्लंडवर १-० अशी मात एमिल फोर्सबर्गने दुसर्‍या सत्रात नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर रोमहर्षक झालेल्या लढतीत स्वीडनने स्वित्झर्लंडचा १-० असा पराभव करीत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची २४ वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठली. ते १९९४नंतर प्रथम अंतिम आठ संघात स्थान मिळविण्यात यशस्वी झाले. दोन्ही संघांनी आक्रमक खेळावर भर दिला होता. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने पहिल्या सत्रात त्यांना गोलकोंडी सोडविता आली नव्हती. त्यातच दोघांचीही ... Read More »