ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: July 3, 2018

नीरववर नजर

पीएनबी बँकेला म्हणजेच पर्यायाने देशाला तब्बल तेरा हजार कोटींचा गंडा घालून परदेशात पळालेल्या नीरव मोदीविरुद्ध अखेर इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय यांच्यासाठी हा मैलाचा दगड नक्कीच आहे. त्याच्याविरुद्ध भारतात अटक वॉरंट जारी झाले असल्याने त्या आधारे स्थानिक न्यायालयाची अनुमती घेऊन तपास यंत्रणांनी इंटरपोलला ही रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यास ... Read More »

गरज कणखर कारवाईचीच…

देवेश कु. कडकडे (डिचोली) आज काश्मिरी पंडित काश्मीरमधून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कोणी त्यांच्या पुनर्वसनासाठी आवाज उठवला नाही, ना त्यांच्या अधिकारांसाठी झगडले. नक्षलवाद्यांना उघडपणे समर्थन देणार्‍या तथाकथित पुरोगामी विचारवंतांना फुटिरतावाद्यांचा मोठा पुळका… एकेकाळी काश्मीर हा पृथ्वीवरचा स्वर्ग आणि भारताचे नंदनवन होते. पर्यटकांना सदैव साद घालणारे, हिमाच्छादित पर्वतशिखरे, खळाळत वाहणार्‍या नद्या, तिथल्या माणसांचे अवर्णनीय सौंदर्य यासाठी काश्मीरची ख्याती होती. आता काश्मीर ... Read More »

ड्रग्ससंबंधित दोषींना मृत्यूदंडाची पंजाब सरकारची शिफारस

अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी दोषी ठरलेल्या गुन्हेगारांना मृत्यूदंड ठोठावण्याची शिफारस काल पंजाब सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत संमत केली. ही शिफारस केंद्र सरकारला पाठवण्यात आली असल्याची माहिती काल राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यानी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती तसेच नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात टीका व आंदोलने झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब विधानसभेसाठी गेल्या वर्षी निवडणूका होण्याआधी कॉंग्रेसने ... Read More »

ड्रग्स माफियांवर कारवाईसाठी पत्रकार, नागरिकांचे सहकार्य हवे

>> मटका देशभरात चालतो ः आजगावकर गोव्यातील अमली पदार्थांचा व्यवहार हा एक गंभीर विषय असून अमली पदार्थ माफियांवर कारवाई करण्यासाठी सरकारला पोलीस, पत्रकार व गोव्यातील जनतेचे सहकार्य हवे आहे, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. विरोधकांनी कोणता मंत्री ड्रग्स माफियांना सहकार्य करतो ते सांगण्याचे आव्हान देतानाच मटका संपूर्ण देशात चालत असल्याचा दावाही त्यांनी केला. राज्यात जो अमली ... Read More »

प्रत्येकी २३६ कोटींचा जीएसटी पहिल्या तीन महिन्यांत जमा

राज्यात जीएसटीअर्तंगत २०१८ – १९ या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यात प्रत्येकी २३६ कोटी रुपयांचा कररुपी महसूल मिळाला आहे. राज्यातील घटणार्‍या जीएसटी कराचा अभ्यास करण्याची गरज आहे, अशी माहिती राज्य जीएसटी आयुक्त दीपक बांदेकर यांनी काल दिली. केंद्रीय जीएसटी आयुक्त आणि राज्य जीएसटी आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने जीएसटी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बांदेकर बोलत होते. या आर्थिक वर्षात प्रतिमहिना २६९ कोटी ... Read More »

राज्यातील ड्रग्स व्यवहाराला मिळतोय राजाश्रय ः सोपटे

>> राजकारण्यांना माफियांकडून हप्ते राज्यात फोफावलेल्या अमली पदार्थ व्यवहाराला राजाश्रय असून त्याशिवाय हा व्यवहार राज्यात चालू राहू शकत नाही, असा दावा आमदार दयानंद सोपटे यांनी काल पत्रकार परिषदेत केला. ड्रग्स माफियांकडून राजकारण्यांना हप्ते मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला. इच्छाशक्ती असल्यास राज्यातील नेते हा व्यवहार बंद करू शकतात, असे सोपटे म्हणाले. सरकारने राज्यभर फोफावत चाललेला हा अमली पदार्थांचा व्यवहार बंद पाडण्याची ... Read More »

‘रस्ता सुरक्षा’ विषय अभ्यासक्रमात येणार

राज्यातील विद्यार्थी वर्गात रस्ता सुरक्षेबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने या वर्षीपासून ‘रस्ता सुरक्षा’ हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ष्ट करण्याचा निर्णय राज्य रस्ता सुरक्षा मंडळाच्या पर्वरी येथे घेण्यात आलेल्या बैठकीत काल घेण्यात आला आहे. राज्यातील सरकारी व अनुदानित मिळून १०० शाळांतून रस्ता सुरक्षा अभ्यासक्रम प्रायोगिक तत्त्वावर शिकविण्यात येणार आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत खास अभ्यासक्रमातून मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती ... Read More »

अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाबाबत निर्णयाचे स्वागत

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीऐवजी सन्मानपूर्वक निवडण्याबाबतच्या गेल्या ८ एप्रिल रोजीच्या ठरावावर नुकतेच येथील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी दोन तृतियांश मताधिक्याने या ठरावाला मंजुरी मिळाली. या निर्णयाचे साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी स्वागत केले आहे. सदर ठरावाला सहमती मिळवण्यासाठी सर्व संबंधित साहित्य संस्था व महामंडळांशी चर्चा करण्यात आली. विदर्भ ... Read More »

शवचिकित्सा अहवालानुसार मृत्यू गळफास घेतल्याने!

>> दिल्लीतील प्रकरण ः नातेवाईकांच्या मते त्यांच्या हत्या उत्तर दिल्लीत बुरारी येथील एका घरात ११ जण संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळल्याप्रकरणातील ८ जणांच्या शवचिकित्सा अहवालात त्यांचा मृत्यू गळफासामुळे झाल्याचे म्हटले आहे. मृत्यूपूर्वी त्यांच्याकडून प्रतिकार किंवा झटापट झाल्याबाबत कोणतीही चिन्हे शवचिकित्सेत आढळली नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. मात्र मृतकांच्या निकटवर्तीयांनी याप्रकरणी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, सदर घरातील सर्वांनी मिळून ठरवून ... Read More »

ब्राझिल उपउपांत्य फेरीत

Read More »