ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: July 2, 2018

मतलबी मैत्री

अमेरिका आणि भारत यांच्यात परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री स्तरावर होणारी २ बाय २ बोलणी पुन्हा एकवार लांबणीवर पडली आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉंपिओ हे डोनाल्ड ट्रम्प व किम जोंग उन यांच्यात सिंगापूरला झालेल्या आण्विक निरस्त्रीकरणाच्या समझोत्यासंदर्भात उत्तर कोरियाच्या भेटीवर जाणार असल्याने ही बोलणी पुढे ढकलली गेल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे. मात्र, अमेरिकेच्या नव्या राजवटीतील बदललेल्या व्यापारी धोरणांमुळे भारत – अमेरिकेदरम्यान निर्माण ... Read More »

विरोधी ऐक्याचा खळखळाट

ल. त्र्यं. जोशी  (नागपूर) शरद पवारांचे ताजे वक्तव्य खूप बोलके ठरते. त्यातून मोदीविरोधी एकच आघाडी हा मुद्दा जवळपास निकालात निघाला आहे. आता जागावाटपावर डोकेफोड होईल, आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण यावर तर रणकंदन माजण्याचीच शक्यता अधिक आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही स्थितीत ‘मोदी हटाव’ची हाळी देऊन एकत्रित होऊ पाहणार्‍या विरोधी पक्षांचा सुरुवातीचा उत्साह आणि निर्धार पातळ होण्याची प्रक्रिया सुरु ... Read More »

सदानंद रेगे यांची ‘अक्षरवेल’

 डॉ. सोमनाथ कोमरपंत प्रा. सदानंद रेगे यांची ‘अक्षरवेल’ ही कविता त्यांच्या कवितेविषयीच्या धारणा व्यक्त करणारी आहे. कविता ही आत्मनिष्ठ मनाची अभिव्यक्ती. तिच्यातून कवीच बोलत असतो. ही कविता आत्मसंवादाची सीमारेषा ओलांडून जनसंवाद साधते. प्रा. सदानंद रेगे हे कवी, कथाकार आणि अनुवादक म्हणून मराठी साहित्यविश्‍वात ओळखले जातात. त्यांचा जन्म २१ जून १९२३ रोजी राजापूर येथे आजोळी झाला. १९४० मध्ये मुंबईतील छबिलदास हायस्कूलमधून ... Read More »

सुरक्षा यंत्रणा ‘वॉटरटाईट’ करताना…

– कर्नल अरविंद जोगळेकर (नि.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती अलीकडेच समोर आली. काही दहशतवादी तसंच नक्षलवादी संघटना मोदींवर हल्ल्याच्या तयारीत असल्याचं उघड झालं. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचं कवच आणखी भक्कम करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानिमित्तानं व्हीव्हीआयपींची विविध टप्प्यांवरील सुरक्षाव्यवस्था, त्याची तयारी, त्याचबरोबर अशी व्यवस्था झुगारण्याचे दुष्परिणाम या बाबींवर टाकलेला हा दृष्टिक्षेप… अलीकडच्या काळात असुरक्षितता मोठ्या ... Read More »

चांदरमधील घरफोडीत लाखोंचा ऐवज लुटला

>> वृध्द दांपत्याला केली जबर मारहाण : दोघाही चोरट्यांना अटक गिरदोली-चांदर येथे ज्योकीम इस्तिबेरो (७५) यांच्या घरांत काल रविवारी पहाटे चार वाजता बुरखा घातलेल्या सशस्त्र दोघा अज्ञातांनी घुसून ज्योकीम व त्यांच्या पत्नीला जबर मरहाण करून रोख व दागिने मिळून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. या मारहाणीत ज्योकीम इस्तिबेरो व त्यांची पत्नी मारिया इस्तिबेरो (६८) दोघेही जखमी झाले असून, त्याना ऑस्पिसियु ... Read More »

दिल्लीत एकाच कुटुंबातील ११जण सापडले मृतावस्थेत

उत्तर दिल्लीच्या बुरारी येथे एका घरात एकाच व्यावसायिक कुटुंबातील ११ जण संशयास्पदरित्या मृतावस्थेत सापडले असून त्यात ७ महिलांचा व दोन १५ वर्षीय मुलांचा समावेश आहे. मृतावस्थेत सापडलेल्यापैकी १० जणांनी छताच्या लोखंडी गजांना गळफास लावल्याचे आढळून आले. तर एक ७७ वर्षीय वृध्द महिला घराच्या दुसर्‍या खोलीत जमिनीवर पडलेली आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी दूध घेऊन येणारे वाहन ७ वा. आल्यानंतर हा प्रकार ... Read More »

राज्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ

राज्यात जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे प्रमुख धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. दक्षिण साळावली धरण ५० टक्के भरले आहे. पंचवाडीचे धरण ७९ टक्के, चापोली धरण ६५ टक्के, आमठणे धरण ५२ टक्के तर अंजुणे धरण २३ टक्के भरले आहे. या पूर्वी जून महिन्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरणामधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. साळावली धरणामध्ये ... Read More »

उत्तराखंडमध्ये भीषण बस अपघातात ४८ प्रवासी ठार

उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यात काल झालेल्या एका भीषण दुर्घटनेत बस २०० मीटर खोल दरीत कोसळून ४८ जण मरण पावले असून अन्य ११ जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये एकूण ५८ प्रवासी होते अशी माहिती पोलीस अधीक्षक जगत राम जोशी यांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राज्यपाल के. के. पॉल व मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच दुर्घटनेच्या दंडाधिकार्‍यांमार्फत चौकशीचे ... Read More »

हॉस्पिसियू आणि संबंधितांच्या भांडणात डायलिसिस रुग्णांचे हाल

हॉस्पिसियूचे वरीष्ठ आणि सध्या डायलिसिस युनिट चालविणारे डॉक्टर यांच्यातील भांडणात मडगावच्या हॉस्पिसियुत डायलिसिसचे उपचार घेणार्‍या रुग्णांचे हाल होत आहेत. हॉस्पिसियुच्या जुन्या इमारतीतील दुसर्‍या मजल्यावर गेल्या १५ वर्षांपासून डॉ. व्यंकटेश रेड्डी हे डायलिसिस युनिट चालवितात व शेंकडो रुग्णांनी तेथे सेवेचा लाभ घेतला. पण आताच आगीचा प्रकार, जनरेटने पुन्हा सुरू करणे व सरकारकडून पोलिस दबावाखाली बंद करणे असल्या प्रकारामुळे उपचार घेणारे रुग्ण ... Read More »

लोकसभेसाठी तूर्त विचार नाही : गिरीश

सध्यातरी आपण लोकसभा निवडणुकीचा विचार केलेला नसून आपला सगळा भर या घडीला गोव्यात कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यावर असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी सांगितले. लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय नंतर घेणार असल्याचे ते म्हणाले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यानी यावेळी माघार घेत लोकसभा उमेदवारीसाठी दावा न करण्याचा निर्णय घेतला आहे. Read More »