ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: July 2018

सुरळीत वीज

राज्यातील वीजपुरवठ्याची स्थिती यावर्षी कधी नव्हे एवढी वाईट बनलेली दिसते आहे. खेड्यापाड्यांतच नव्हे, तर अगदी प्रमुख शहरांमध्येही विजेच्या सततच्या लपंडावाने नागरिक हैराण झाले आहेत. नुकतेच या विषयावर विधानसभेत पडसाद उमटले आणि पुढील वर्षापर्यंत ही परिस्थिती सुधारण्यात येईल असे आश्वासन सरकारने दिले आहे. हे आश्वासन देतानाच काही गोष्टी समोर आणल्या गेल्या. राज्यातील साठ टक्के वीज ग्राहक आपल्या वीज जोडणीवेळी नमूद केलेल्या ... Read More »

पंतप्रधानपदाचा प्रश्न मोकळा, कॉंग्रेसचा सापळा

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) एखाद्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देऊन सरकार चालविण्यात मात्र असहकार करायचा हे कॉंग्रेसचे जुनेच धोरण आहे आणि त्या धोरणाचा सूत्रपात इतर कुणी नव्हे तर पक्षाच्या सर्वांत शक्तिशाली नेत्या म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या स्व. इंदिराजींनीच केला आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाची संयुक्त उमेदवारी आणि कोणत्याही स्थितीत मोदींचा पराभव यापैकी कशाला प्राधान्य द्यायचे ... Read More »

तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे ९४ वर्षीय अध्यक्ष एम. करूणानिधी मूत्रसंसर्ग, रक्तदाब व अन्य कारणांमुळे चेन्नईतील कावेरी इस्पितळात उपचार घेत असून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काल सदर इस्पितळात जाऊन त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांकडे त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. करूणानिधी यांची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी डॉक्टरांनी नायडू यांना सांगितले. यावेळी करूणानिधी यांचे कुटुंबियही उपस्थित होते. तसेच तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हेही उपस्थित होते. Read More »

उद्योगपतींचाही योग्य सन्मान व्हायला हवा : पंतप्रधान

देशाच्या विकासात जसे शेतकर्‍यांचे योगदान आहे तसेच उद्योगपतींचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे उद्योगपतींनाही योग्य तो सन्मान मिळायला हवा असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे काल केले. त्यांच्या हस्ते येथील विविध प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. देशाच्या जडणघडणीत बँक कर्मचारी, औद्योगिक कामगार, मजूर, सरकारी कर्मचारी आदींचे भरीव योगदान मिळत असते. त्याचप्रमाणे उद्योगपतींचेही योगदान या कामी महत्वाचे असते. ... Read More »

महामंडळ, स्वायत्त-संस्था संघटनांची सरकारला वेतन आयोगप्रश्‍नी मुदत

गोवा सरकारी कर्मचारी संघटनेशी संलग्न महामंडळ आणि स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्‍यांच्या बैठकीत सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारला पंधरा दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाटो-पणजी येथे सरकारी कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात सरकारच्या विविध महामंडळ आणि स्वायत्त मंडळांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांची बैठक शनिवारी घेण्यात आली. सरकारने महामंडळ आणि स्वायत्त संस्थांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत परिपत्रक पाठवून आवश्यक माहिती देण्याची सूचना ... Read More »

राज्यातील अपघातप्रवण क्षेत्रांची संख्या ८८

राज्यभरात सुमारे ८८ अपघातप्रवण क्षेत्रे आहेत. या अपघात प्रवण क्षेत्रांची सुधारणा करण्यासाठी उपाय योजना केली जात आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे. ताळगावच्या आमदार जेनिफोर मोन्सेरात यांनी राज्यातील अपघातप्रवण क्षेत्राबाबत प्रश्‍न विचारला होता. कांपाल पणजी येथे बांदोडकर रस्त्यावर बालभवन जवळील बालगणेश मंदिराजवळ अपघातप्रवण क्षेत्र आहे. या ठिकाणी वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवून ... Read More »

संयुक्त व्याघ्र प्रकल्प प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती

राज्यातील म्हादई अभयारण्य, नेत्रावळी अभयारण्य, भगवान महावीर अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि खोतीगाव अभयारण्यातील लोकवस्ती नसलेल्या, कमी लोकवस्तीचा समावेश असलेल्या भागात संयुक्त व्याघ्र प्रकल्प करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. देशात २०१४ मध्ये व्याघ्र गणनेचा अहवाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाने ३१ मार्च २०१६ रोजी गोव्यात व्याघ्र राखीव क्षेत्र उभारण्याची सूचना केली आहे. गोव्याचे वनक्षेत्र हे कर्नाटकातील काळी व्याघ्र प्रकल्प आणि अन्य ... Read More »

शहर-ग्राम नियोजन दुरुस्ती विधेयकावर आज विधानसभेत चर्चा

नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी विधानसभेत सादर केलेल्या गोवा शहर व ग्राम नियोजन (दुरुस्ती) विधेयक २०१८ या विधेयकावर आज विधानसभेत चर्चा केली जाणार आहे. कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगर नियोजन खात्याच्या दुरुस्ती विधेयकाला कॉंग्रेस पक्षाचा विरोध असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कॉंग्रेस आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, गोवा राज्य उच्च शिक्षण ... Read More »

पोलादपूर बस अपघातातील ३० मृतदेह काढण्यात यश

पोलादपूर ते महाबळेश्‍वरदरम्यान असलेल्या आंबेनळी घाटातील अपघातात सापडलेल्या बसमधील ३० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात मदतकार्य करणार्‍या पथकास यश आले आहे. दापोली कृषी विद्यापीठाचे ३३ कर्मचारी सदर दुर्दैवी बसमधून महाबळेश्‍वर येथे जाण्यास शनिवारी निघाले असताना हा अपघात झाला होता. गिर्यारोहक व एनडीआरएफ कर्मचार्‍यांचे बसमधील मृतदेह शोधण्याचे काम काल थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मृत व्यक्तींच्या निकटवर्तियांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत ... Read More »

राज्यात पावसाच्या प्रमाणात ५% घट

>> एकूण पाऊस ७६.४२ इंच; सर्वाधिक पाऊस वाळपईत राज्यात मागील आठ दिवसांपासून मोसमी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सरासरी पावसाचे प्रमाण ५ टक्क्यांनी कमी झाले आहे. राज्यात आत्तापर्यंत ७२.२५ इंच पावसाची नोंद झाली आहे. अंदाजानुसार आत्तापर्यंत सरासरी पाऊस ७६.४२ इंच एवढा पडायला हवा होता. राज्यात दक्षिण – पश्‍चिम मोसमी पाऊस कमजोर झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी ... Read More »