ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 20, 2018

काश्मीर वार्‍यावर?

भारतीय जनता पक्षाने अखेर काश्मीरमधील पीडीपी प्रणित सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने तेथील संयुक्त सरकार काल कोसळले. मुळात भाजप आणि पीडीपी ही दोन विरुद्ध टोके असल्याने कधी तरी हे घडणार ही अटकळ होतीच, परंतु असा आकस्मिकपणे पाठिंबा काढून घेऊन भाजपने पीडीपीवर वरचढ होत त्याचे श्रेय उपटण्याची राजकीय चतुराई दाखविली आहे. काश्मीरमध्ये रमझाननिमित्त लागू केलेला युद्धविराम वाढत्या हिंसाचारामुळे मागे घेताना पीडीपीला विश्वासात ... Read More »

जळगाव प्रकरणाच्या निमित्ताने…

ऍड. असीम सरोदे जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावातील विहिरीत पोहल्याच्या कारणावरून दोन दलित मुलांची धिंड काढण्यात आल्याचे प्रकरण घडले. सदर प्रकरणातील सत्य समोर आल्यानंतर त्याला प्रसार माध्यमांनी आणि राजकीय नेत्यांनी दिलेला जातीय रंग कसा चुकीचा होता हे समोर आले आहे. तथापि, या घटनेत लहान मुलांच्या हक्कांचे उल्लंघन झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाकडी गावात विहिरीत पोहोचल्याच्या ... Read More »

काश्मीरात भाजपने काढला पीडीपीचा पाठिंबा

>> राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राज्यपालांनी केली शिफारस अखेर भारतीय जनता पक्षाने काश्मीरमधील मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमॉक्रेटिक फ्रंट तथा पीडीपी सरकारचा पाठिंबा काल काढून घेतला. भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी पत्रकार परिषदेत याविषयी घोषणा करताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी याप्रकरणी सल्लामसलतीनंतर हा निर्णय घेण्यात आला. तर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पदाचा राजीनामा ... Read More »

पिसुर्लेतील कॅटमाईन ड्रग्सप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे ः कॉंग्रेस

भाजपच्या पदाधिकार्‍याच्या पिसुर्लेतील फॅक्टरीतून जे कॅटामाईन ड्रग्स हस्तगत करण्यात आले होते त्यासंबंधी बाळगलेले मौन आता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोडावे, अशी मागणी काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. त्याचबरोबर भाजपच्या ज्या पदाधिकार्‍याच्या फॅक्टरीतून हे ड्रग्स हस्तगत करण्यात आले होते तो पदाधिकारी अमली पदार्थ व्यवहारात नाही असे जाहीर करण्याचे आव्हानही चोडणकर यांनी पर्रीकर यांना दिले. राज्यातील खाणींचा प्रश्‍न सोडवण्यास ... Read More »

खाण पट्‌ट्यातील आमदारांबरोबर मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक

>> खाण बंदीवर करणार चर्चा ः पाऊसकर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उद्या गुरुवार दि. २१ जून रोजी दुपारी १२ वाजता पर्वरी येथे राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी खाण व्याप्त भागातील आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्याचे ऍडव्होकेट जनरल, खाण खात्याचे संचालक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी ... Read More »

कॅटामाईनप्रकरणी परब यांची मुंबईत सहा तास चौकशी

केंद्रीय दक्षता संचालनालयाने पिसुर्ले येथे कॅटामाईन अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आलेल्या विजय इंडस्ट्रीजचे मालक तथा भाजपचे कार्यकर्ते वासुदेव परब यांची मुंबई येथे सोमवारी सहा तास चौकशी केली. दरम्यान, आयडीसीने वासुदेव परब यांना कॅटामाईन अमलीपदार्थ प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने अमली पदार्थाचा व्यवसाय करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांत छापे ... Read More »

व्यवसायासाठी खासगी वाहन वापराविरोधात कारवाई सुरू

वाहतूक खात्याने व्यवसायासाठी वापर करण्यात येणार्‍या खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर कारवाईला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ६ चारचाकी आणि १५ दुचाकी मिळून २१ वाहनांचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिली. राज्यात मोठ्या प्रमाणात व्यवसायासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यात येत असल्याचे आढळून येत आहे. खासगी दुचाकी व चार चाकी वाहने पर्यटकांना बेकायदेशीपणे भाड्डेपट्टीवर ... Read More »

जपानचा ऐतिहासिक विजय; कोलंबियाला नमविले

जपानने त्याच्यापेक्षा रँकिंगने वरचढ असलेल्या कोलंबियाला (१६वे स्थान) पराभूत करीत धक्कादायक तथा ऐतिहासिक विजयाची नोंद केली. जपान सध्या जागितक ६१व्या स्थानावर आहे. त्याबरोबर जपान हा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात एखाद्या अमेरिकन देशाला पराभूत करणारा आशिया खंडातील पहिला संघ ठरला आहे. सामन्याच्या प्रारंभीच कोलंबियन संघाला १० खेळाडूंनिशी खेळावे लागल्याने ते सुरुवातीलाच बॅकफूटवर गेले होते. सामन्याच्या प्रारंभीच मिळालेल्या पेनल्टीमुळे जपानने आघाडी घेण्यात ... Read More »

सेनेगलचा पोलंडला धक्का

रशियात चालू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत काल आणखी एक धक्कादायक निकाल लागला. जपान पाठोपाठ सेनेगलनेही जागतिक ८व्या स्थानारवील पोलंडला पराभूत करत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. जागतिक २७व्या स्थानावरील सेनेगलने पोलंवर २-१ अशी मात करीत विजयी सलामी दिली. विशेष म्हणजे आफिक्रन एखाद्या संघाचा हा या यंदाच्या विश्वचषकातील पहिला विजय ठरला. स्पर्धेतील आणखी एक स्वयंगोल घातक ठरला. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. परंतु ... Read More »

केनमुळे इंग्लंडला पूर्ण गुण

कर्णधार हॅरी केनने नोंेदविलेल्या दोन गोलांमुळे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडने नवख्या ट्युनिशियाला २-१ असे पराभूत करण्यात यश मिळविले. या सामन्यात ट्युनेशियाने इंग्लंडला बरेच झुंजविले. ९० मिनिटांपर्यंत त्यांनी इंग्लंडला १-१ असे बरोबरीत रोखले होते. परंतु इंज्युरी वेळेत केनच्या हेडरने इंग्लंडला तारले. अन्यथा त्यांना १-१ असे बरोबरीत समाधान मानावे लागले असते. कर्णधार हॅरी केनने ११व्या मिनिटाला गोलरक्षकाकडून रिबाउंड होऊन परत आलेल्या चेंडूला ... Read More »