ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 19, 2018

विफल युद्धविराम

रमझानच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोर्‍यात केंद्र सरकारने लागू केलेली शस्त्रसंधी किंवा युद्धविराम अखेर ईद आटोपताच मागे घेण्यात आला. म्हणजे पुन्हा एकवार दहशतवाद्यांविरुद्ध लष्कर आपले ‘ऑपरेशन ऑल आऊट’ सुरू करील. रमझानच्या काळात युद्धविराम असावा या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या आग्रहाला केंद्र सरकार राजी झाले तेव्हाच यातून काहीही निष्पन्न होणारे नाही हे दिसत होते, कारण मुळात केंद्र सरकारचा हा युद्धविराम लष्कर ... Read More »

जाहिरातींमधील स्त्रीदर्शन

देवेश कु. कडकडे (डिचोली) उद्योग जगात जाहिरातींच्या माध्यमातून स्त्रियांची कामुक प्रतिमा प्रस्तुत करून आपल्या नैतिक मूल्यांना पायदळी तुडवून मोठा नफा कमावला जातो. स्त्री देहाचे प्रदर्शन करून, त्याचे बाजारूकरण करून या जाहिरात संस्था आपले आणि ग्राहकांचे हित साधत आहेत. एका बाजूला स्त्रीसौंदर्याचे विकृत स्वरुप तर दुसर्‍या बाजूला मनुष्याच्या उच्चस्तरीय क्षमतांना कुंठीत करून ग्राहकाला जाळ्यात अडकवण्याचे कारस्थान रचले जात आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा ... Read More »

मये कस्टोडियन मालमत्ताप्रश्‍न सोडवण्यास प्राधान्य देणार ः मुख्यमंत्री

मये येथील स्थलांतरित (कस्टोडियन) मालमत्तेचा प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आझाद मैदानावर काल आयोजित गोवा क्रांतिदिन सोहळ्यात बोलताना दिले. गोवा प्लॅस्टिक मुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, आपल्या आजारपणामुळे प्लॅस्टिक मुक्तीच्या उपक्रमाला विलंब झाला आहे. यापुढे प्लॅस्टिक आणि कचरा विल्हेवाटीच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी दमदार पाऊल उचलण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी ... Read More »

अमेरिकेतील ‘हवाई’ राज्याशी सामंजस्य करारास गोवा मंत्रिमंडळाची मान्यता

अमेरिकेतील हवाई या बंदर राज्याबरोबर व्यापार, पर्यटन, उद्योगासह अन्य विविध क्षेत्रांतील देवाणघेवाणीसाठी सामंजस्य करार करण्यास गोवा मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. तसेच वयोवृद्ध व पूर्णपणे दिव्यांग असलेल्या तीन कैद्यांची सुटका करण्यासही मंत्रिमंडळाने काल मान्यता दिल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. हवाई या राज्याबरोबरील करारात व्यापार, पर्यटन, क्रीडा, विज्ञान, फार्मास्युटिकल, काजू फेणी उद्योग, ... Read More »

पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पातील नव्या योजना तपशीलवार मांडणार

येत्या जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनात आपण अर्थसंकल्पातील नव्या योजना तपशीलवारपणे सादर करणार असून त्यासंबंधीची तयारी सध्या सुरू केली आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी काल पत्रकार परिषदेत सांगितले. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आपण आजारी पडल्याने आपणाला अर्थसंकल्प तपशीलवारपणे मांडता आला नव्हता. यावेळी आपण आपल्या सगळ्या कल्पना व योजना मांडणार असल्याचे ते म्हणाले. साधनसुविधाविषयक काही कामे अडून पडलेली आहेत. तर काही रेंगाळलेली ... Read More »

पणजीचा पार्किंग मास्टर प्लॅन सूचनांसाठी लवकरच खुला

पणजी स्मार्ट सिटी योजनेखाली तयार करण्यात आलेला पणजी शहराच्या वाहतूक व्यवस्थेसह पार्किंग मास्टर प्लॅन येत्या २५ जून रोजी नागरिकांच्या सूचनांसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे संचालक तथा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. शहरातील व्यापारी व नागरिकांना ‘सिटी कार्ड’ वितरित केली जाणार आहेत. या कार्डासाठी कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार ... Read More »

उत्तरेतील किनार्‍यांवर पोलीस गस्त सुरू

राज्यातील समुद्र किनार्‍यांवर पर्यटकांच्या बुडण्याच्या घटनांची पोलीस खात्याने गंभीर दखल घेतली आहे. उत्तर गोव्यातील समुद्र किनार्‍यांवर पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांना धोक्याबाबत सावध करण्यासाठी पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. उत्तर गोव्यातील बागा, शिकेरी, कळंगुट या समुद्र किनार्‍यांवर पाच पर्यटकांचा बुडून नुकताच मृत्यू झाला. उत्तर गोव्यातील मिरामार, बागा, शिकेरी, कळंगुट, कांदोळी, हरमल व इतर किनार्‍यावर गस्तीला सुरुवात करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ... Read More »

राज्याला पावसाने झोडपले

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पावसाने गोव्यात जोरदार हजेरी लावली. काल दिवसभर राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे राजधानी पणजीसह मडगाव, वास्को, म्हापसा, फोंडा आदी विविध शहरांबरोबरच ग्रामीण भागांतील जनजीवनही विस्कळीत झाले. सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच ऑफिस व अन्य ठिकाणी कामानिमित्त जाणार्‍या लोकांची बरीच धांदल उडाली. राज्यात पुढील पाच-सहा दिवस असाच पाऊस कोसळण्याची शक्यता ... Read More »

बेल्जियमची दुबळ्या पनामावर एकतर्फी मात

रोमेलू लकाकूने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर ‘ग’ गटातील पहिल्या सामन्यात बेल्जियमने पदार्पणातील दुबळ्या पनामा संघावर ३-० एकतर्फी मात करीत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आपली विजयी सलामी दिली. पनामा हा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील हा पहिलाच सामना होता. सोची येथील फ्रीश्त स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात बेल्जियमने खेळावर पूर्णपणे वर्चस्व राखले होते. पहिल्या सत्रात पनामाने बेल्जियमची आक्रमके रोखण्यात यश मिळविले होते. त्यामुळे पहिले ... Read More »

स्वीडनकडून दक्षिण कोरिया पराभूत

स्वीडनचा कर्णधार आंद्रेस ग्रॅन्कविस्टने दुसर्‍या सत्रात पेनल्टीवर नोंदविलेल्या गोलमुळे स्वीडनने दक्षिण कोरियावर १-० असा निसटता पराभव करीत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल विजयी सलामी दिली. पूर्वाधात दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. दोन्ही संघांनी या सत्रात गोल नोंदविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. दुसर्‍या सत्रात ६५व्या मिनिटाला स्वीडनने केलेल्या एका धोकादायक चालीवर डी कक्षेत व्हिक्टर क्लासॉनला दक्षिण कोरियाच्या ... Read More »