ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 18, 2018

जरा सबूर

अमेरिकेतील प्रदीर्घ वैद्यकीय उपचारांअंती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गोव्यात आगमन झाले आणि लगेच त्यांनी स्वतःला आपल्या स्वभावानुरूप राज्याच्या कामकाजाला जुंपूनही घेतले. अमेरिकेहून कित्येक तासांचा हवाई प्रवास करून दाबोळी विमानतळावर उतरलेले पर्रीकर स्वतःच्या पायांनी तरातरा चालत गाडीत जाऊन आपल्या नेहमीच्या शैलीत पुढच्या आसनावर बसताना गोव्याच्या जनतेने दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पाहिले तेव्हा तिच्या मनातील शंका-कुशंकांचे काहुर दूर झाले, किंबहुना तसा संदेश जनतेमध्ये जावा ... Read More »

पंतप्रधानपदाची उमेदवारी खुली ठेवण्याचा प्रयत्न

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) विरोधी आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव निवडणुकीआधी जाहीर होणार नाही यासाठी पवारसाहेब पुरेपूर प्रयत्न करतील. त्याची सुरुवात त्यांनी पुण्यातून केली आहे. कॉंग्रेसेतर विरोधकांना किती जागा मिळतात हे उघड झाल्यानंतर ते आपले नाव समोर आणण्याच्या हालचाली सुरु करतील. गेल्या आठवड्यामध्ये ‘पवारांचे पंतप्रधानपदः इजा, बिजा, तिजा’ हा माझा लेख नवप्रभेच्या याच पानावर प्रसिद्ध झाला होता. पंतप्रधानपद त्यांना हुलकावणीच देत ... Read More »

प्रदिर्घ कालावधीनंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. गेल्या गुरुवारी पर्रीकर यांचे अमेरिकेहून गोव्यात आगमन झाले होते. शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठक घेण्याची त्यांनी तयारीही केली होती. मात्र, शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठक होऊ शकली नव्हती. आज सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजता पर्वरी येथील सचिवालयात मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. गेल्या सव्वातीन महिन्यांपासून मंत्रिमंडळ बैठका झाल्या नसल्याने कामे तुंबून पडलेली असून ती हातावेगळी करण्याची जबाबदारी पर्रीकर ... Read More »

आम आदमी पक्षाच्या हजारो समर्थकांनी दिल्ली सरकारच्या सेवेतील आयएएस अधिकार्‍यांच्या कृती विरोधात काल संध्याकाळी काढलेला मोर्चा संसद मार्गाजवळ पोलिसांनी रोखला त्यावेळी. या मोर्चा दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. Read More »

चार मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील विषय मांडला पंतप्रधानांकडे

दिल्ली सरकारच्या सेवेतील आयएएस अधिकार्‍यांच्या संपाच्या विषयावरून काल प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह चार मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून त्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी व केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन यांचा यात समावेश आहे. दरम्यान याच विषयावरून काल संध्याकाळी ‘आप’च्या हजारो समर्थकांनी दिल्ली निषेध मोर्चा काढला. ... Read More »

पावसाने पुन्हा धरला जोर

>> पुढील तीन दिवस जोरदार पाऊस शक्य राज्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा जोर धरू लागला आहे. आगामी तीन ते चार दिवस काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. राज्यात आत्तापर्यंत १९ इंच पावसाची नोंद झाली आहे. काणकोणमध्ये सर्वांत जास्त २४.२ इंच तर म्हापसा येथे सर्वांत कमी १२.७ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाने जोरदार ... Read More »

सारमानस फेरी धक्क्याजवळ काल फेरीबोटीतून बाहेर येण्याच्या प्रयत्नात एक कार अशी पाण्यात गेली त्यावेळी. प्रसंगावधान राखून कारचालकाने बाहेर उडी घेत आपला बचाव केला. Read More »

बेरोजगारांना नोकरी मिळेपर्यंत बेरोजगारी भत्ता द्यावा : लुईझिन

Read More »

कदंब बायपासवरील भीषण अपघातात पर्यटक ठार

>> एक गंभीर : बेफाम वेगामुळे अपघात पणजी ते ओल्ड गोवा या बगलमार्गावर काल दुपारी २.३० च्या सुमारास आयआरबी पोलीस वसाहतीजवळ रायचूर कर्नाटकातील पर्यटकांच्या भरधाव कारगाडीने लोखंडी संरक्षक कठड्याला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारगाडीतील एक पर्यटक ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. रायचूर कर्नाटक येथील पाच युवक कारगाडी घेऊन गोव्यात फिरायला आले होते. पणजी ते ओल्ड ... Read More »

मये तलावाजवळ तारांकीत हॉटेलसाठी इच्छाप्रस्ताव

गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) ‘बांधा, वापरा आणि परत करा’ या तत्त्वावर मये येथील १ लाख ६७ हजार चौरस मीटर जागेत थीम पार्कसह तीन तारांकित किंवा उच्च गटातील हॉटेल उभारण्यासाठी व्यावसायिक, यांच्याकडून इच्छा प्रस्ताव मागविले आहेत. मये येथील प्रसिद्ध तलावाजवळ महामंडळाची १ लाख ६७ हजार चौरस मीटर जमीन आहे. मये तलावाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. मये तलावाला देशी व विदेशी ... Read More »