ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 16, 2018

व्यक्ती जाते, विचार नव्हे

काश्मीरमधील ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची त्यांच्या दोन सुरक्षा रक्षकांसह झालेली निर्घृण हत्या अत्यंत निषेधार्ह आहे. बुखारी हे काही काश्मिरी फुटिरतावादाला ठामपणे विरोध करणारे पत्रकार नव्हते. फक्त त्यांची लेखणी काहीशी संतुलित राखण्याचा ते प्रयत्न करीत आणि तोच त्यांचा गुन्हा ठरला. मोटारसायकलवरून आलेल्या तिघांंनी ते आपल्या ‘रायझिंग कश्मीर’ च्या कार्यालयाबाहेर पडत असताना त्यांच्यावर निर्दयपणे गोळ्या झाडल्या. आपल्या मृत्यूच्या काही तास आधी ... Read More »

इतिहासाचा आभास की आभासी इतिहास?

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन आणि ट्रम्प यांच्यात सिंगापूर भेटीत झालेल्या वाटाघाटी सफल झाल्या आहेत असे सध्या तरी वाटत आहे. युद्धाचा धोका शमवण्यात यश आल्यामुळे जगभरातून याबाबत अमेरिकेचे कौतुकही होत आहे. शांततेचे नोबेल पारितोषक मिळवण्याच्या दृष्टीने ट्रम्प यांनी टाकलेले हे पहिले यशस्वी पाऊल आहे असे मानायला हरकत नाही. पण किम जोंग उन हे पार्‍यासारखे अस्थिर ... Read More »

पर्रीकरांकडून धडाक्यात कामकाज सुरू

>> सोमवारी घेणार मंत्रिमंडळ बैठक >> कुलदेवता-ग्रामदेवतेचे घेतले दर्शन सुमारे १४ आठवडे अमेरिकेत उपचार घेऊन नुकतेच गोव्यात परतलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पर्वरी येथील राज्य सचिवालयातील आपल्या कार्यालयात जाऊन धडाक्यात कामाला सुरुवात केली. गेले तीन महिने न झालेली राज्य मंत्रिमंडळाची बैठकही सोमवार दि. २५ जून रोजी घेण्याचे त्यांनी निश्‍चित केले. वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतल्यानंतर संध्याकाळी उशिरा त्यांनी राज्यपाल डॉ. ... Read More »

वीज घोटाळा : मावीन गुदिन्हो सुनावणीवेळी कोर्टात उपस्थित

राज्यातील २००१ मधील कथित वीज घोटाळा प्रकरणी विद्यमान पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात काल उपस्थिती लावली. ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांनी या खटल्यासर्ंद्भात दाखल केलेल्या एका अर्जावर मंत्री गुदिन्हो यांच्या वकिलांनी बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतल्याने पुढील सुनावणी २८ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. गुदिन्हो यांच्या वकिलांनी प्रतिउत्तराची प्रत दोन दिवस अगोदर ऍड. रॉड्रिग्स यांना ... Read More »

खाण प्रश्‍नावर मुख्यमंत्री मंगळवारपर्यंत बैठक घेणार

राज्यातील खाण प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या सोमवारी अथवा मंगळवारी बैठक घेणार आहेत, अशी माहिती काल खाणपट्ट्यातील एक आमदार दीपक पावस्कर यांनी दिली. पावस्कर यांनी काल दुपारी ३.३० वा. पर्रीकर यांची भेट घेतली व राज्यातील खाण व्यवसाय बंद असल्याने खाण अवलंबितांची स्थिती बिकट झालेली आहे. तसेच या लोकांनी पणजीत धरणे आंदोलनही सुरू केले असल्याची माहिती पर्रीकर यांना ... Read More »

खारेबांध येथे अज्ञातांनी कारसह १३ दुचाक्या पेटवल्या

मडगाव शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती सध्या पुन्हा डोके वर काढू लागली असून काल रात्री खारेबांध येथे अज्ञातांनी १३ दुचाक्या व एका कारला आग लावल्याने सुमारे आठ लाख रुपयांची हानी झाली. गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, काल आमदार दिगंबर कामत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. किसन च्यारी यांच्या गॅरेजजवळ ७ दुचाक्या तर टॅक्सेरा इमारती समोर ६ ... Read More »

गिमेझिनच्या हेडरमुळे उरुग्वेची विजयी सलामी

जोस गिमेझिनने सामन्याच्या अंतिम क्षणात नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर उरुग्वेने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल इजिप्तवर १-० अशी निसटती मात करीत शानदार विजयी सलामी दिली. इजिप्तला त्यांचा स्टार स्ट्रायकर महंमद सलाहची उणीव जाणावली. सलाह दुखापतीमुळे या सलामीच्या सामन्यात खेळाडू शकला नाही. सलाहला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत खांद्याला दुखापत झाली होती. या विजयामुळे जागतिक १४व्या स्थानावरील उरुग्वेने आपल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ... Read More »

स्वयंगोलाने केला मोरोक्कोचा घात

सामन्याच्या अतिरिक्त वेळेत मोरोक्कोच्या अझिज बौहादोजने इंज्युरी वेळेत नोंदविलेल्या स्वयंगोलामुळे इराणने आपल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात विजयश्रीने केली. अझिजचा स्वयंगोल मोरोक्कोचा घात करून गेला. इराणचा हा १९९८नंतर विश्वचषक स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला. त्यामुळे त्यांच्यासाठी हे ३ गुण महत्त्वाचे ठरणार आहेत. पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत राहिले होते. या सामन्यात मोरोक्कोन संघाने खेळावर वर्चस्व राखले होते. परंतु स्वयंगोलामुळे ... Read More »

अरविंद नेवगी ः ‘संस्कारदीप’!

अशोक ज. तिळवी (कार्याध्यक्ष, गोवा प्रदेश साने गुरूजी कथामाला) साने गुरूजी कथामालेचे अरविंद नेवगी सर म्हणून सारा गोवा ज्यांना ओळखतो, एवढेच नव्हे तर अर्ध्याअधिक महाराष्ट्रातील साने गुरूजी परिवार त्यांना कथामालेचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणूनही ओळखतो. गोवा प्रदेश साने गुरूजी कथामालेच्या इतिहासाची काही पाने निश्‍चितपणे ज्यांच्या अमोल कार्याने भरलेली आहेत त्या अरविंद नेवगींचा हा परिचय अनेकांना मार्गदर्शक ठरेल. श्री. अरविंद नेवगी ... Read More »

एक अविस्मरणीय दिवस

– श्रुती पार्सेकर (नानोडा डिचोली) आजीआजोबांसोबत केक कापला. त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या मायेच्या स्पर्शाने मला अगदी भरून आले. हा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरला. वृद्धत्व म्हणजे जणू दुसरे बालपणच… ते सुखाचे आणि समाधानाचे व्हावे, आयुष्याची संध्याकाळ रमणीय व्हावी या सद्हेतूने या संस्थेची स्थापना झाली. यंदाचा जून महिना माझ्यासाठी खूप आठवणींना उजाळा घेऊन आला होता. मला ११ जूनला पंचवीस वर्ष ... Read More »