ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 15, 2018

ड्रामेबाजी

गेले कित्येक महिने प्रसारमाध्यमांतून न झळकलेली आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि मंडळी गेल्या सोमवारपासून केजरीवाल यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या निवासस्थानी आरंभलेल्या बेमुदत धरण्यामुळे एकदाची चर्चेत आली आहे. आपल्या सरकारमधील मंत्र्यांना प्रशासनातील आयएएस अधिकारी सहकार्य करीत नाहीत, मंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकांना हजर राहात नाहीत, मंत्र्यांचे फोन घेत नाहीत, त्यामुळे नायब राज्यपालांनी त्याकडे लक्ष द्यावे असे एकंदर केजरीवाल यांचे म्हणणे आहे. ... Read More »

स्व. शांताराम नाईक ः कॉंग्रेसचा आधारवड हरपला

शंभू भाऊ बांदेकर गोव्याचे, देशाचे अनेक प्रश्न संसदेत मांडून श्री. शांताराम नाईक त्यांचा सातत्याने पाठपुरावा करीत राहिले. राज्यसभा खासदार म्हणून दोनवेळा झालेली त्यांची निवड ही त्यांच्या त्या कार्याची पोचपावतीच होती. लोकसभेत सर्वाधिक विधेयके त्यांच्या नावावर होती ही देखील त्यांच्या कार्याची पावतीच म्हणता येईल. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष स्व. पुरुषोत्तम ऊर्फ भाऊ काकोडकर, स्व. श्रीमती सुलोचना काटकर, श्रीमती निर्मला सावंत ... Read More »

पर्रीकर अमेरिकेतून परतले

>> आज मंत्रिमंडळातील सहकार्‍यांशी चर्चा शक्य >> भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण अमेरिकेतून तेरा आठवड्यांच्या उपचारानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल दाबोळी विमानतळावर संध्याकाळी सहा वाजता एअर इंडियाच्या विमानातून मुंबईहून आगमन झाले. अमेरिकेतून दाबोळीपर्यंतच्या प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय, वैद्यकीय पथक आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी होते. दरम्यान, पर्रीकर आज शुक्रवारी मंत्रिमंडळातील सहकार्‍यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी काल दिली. ... Read More »

साळजीणीत दरड हटवण्याचे काम रोखल्याने तणाव

चार दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर दरड कोसळून साळजीणी गावाचा तुटलेला संपर्क पूर्ववत करण्यासाठी दरड हटविण्याचे सुरू असलेले काम काल वन खात्याने हरकत घेत बंद केल्याने साळजीणी गावात वातावरण तंग बनले आहे. दरम्यान, या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी आज उपवनपाल भेट देणार असल्याची माहिती स्थानिक आमदार तथा वनविकास महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद गावकर यांनी दिली. वैले तुडव – साळजीणी हे गाव वन ... Read More »

मोसमी पावसाची दडी

राज्यात मोसमी पावसाचा जोर मंदावला असून गेले दोन दिवस पावसाने दडी मारल्याने उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात मागील चोवीस तासांत किरकोळ पावसाची नोंद झाली आहे. आगामी दोन दिवस तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. राज्यात पश्‍चिम मान्सूनचे जोरदार आगमन झाले होते. राज्यात तीन दिवस जोरदार पाऊस पडला. या जोरदार पावसामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने ... Read More »

प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी माधव कामत समितीच्या शिफारशी स्वीकारा

>> माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो राज्यातील सरकारी प्राथमिक विद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी माधव कामत समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी पत्रकार परिषदेत काल केली. राज्य सरकारने २००६ मध्ये प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी माधव कामत यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती केली होती. या समितीने शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. मागील दहा वर्षांत या ... Read More »

पिसुर्लेतील विजय इंडस्ट्रीजला कारणे दाखवा नोटीस बजावणार

>> कॅटामाईन अमलीपदार्थ जप्ती प्रकरण गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील विजय इंडस्ट्रीज या आस्थापनातून कॅटामाईन या बंदी असलेल्या अमली पदार्थ जप्त प्रकरणी संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या सूत्रांनी काल दिली. मंडळाचे अध्यक्ष ग्लेन टिकलो यांनी सदर आस्थापनाच्या मालकाला कारणे दाखवा नोटीस पाठविण्याची सूचना संबंधित अधिकार्‍यांना केली आहे, अशी माहिती ... Read More »

फुटबॉलच्या महाकुंभास प्रारंभ

>> रशियाची सलामी; सौदी अरेबियाचा धुव्वा डेनिस चेरीसहेवने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर यजमान रशियाने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या शुभारंभी सामन्यात सौदी अरेबियाचा ५-० असा धुव्वा उडवित शानदार विजयी सलामी दिली. काल मॉस्कोच्या लुज्निकी स्टेडिअवरील सामन्याने फुटबॉलचा महाकुंभ मानल्या जाणार्‍या विश्वचषक-२०१८ स्पर्धेस शानदार कार्यक्रमाने सुरुवात झाली. सुमारे ८० हजार फुटबॉल चाहत्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत कालच्या शुभारंभी सामन्यात यजमान रशियन संघाने आक्रमक खेळ ... Read More »

भारताचे पहिल्याच दिवशी वर्चस्व

>> अफगाणिस्तान विरूद्धची ऐतिहासिक कसोटी;  ६ बाद ३४७; धवन, मुरलीची शतके ऐतिहासिक कसोटीत भारत पहिल्याच दिवशी वरचढ बेंगळुरू सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांच्या दमादर शतकांच्या जोरावर भारताने  ६ गडी गमावत ३४७ अशी धावसंख्या उभारीत अफगाणिस्ताविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी वर्चस्व प्रास्तापित केले आहे. या सामन्याद्वारे अफगाणिस्ताने आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये आपले पदार्पण केले आहे. काल नाणेफेक जिंकून भारताचा प्रभारी ... Read More »