ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 14, 2018

विशेष संपादकीय – स्वागत

जवळजवळ चार महिन्यांनंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची अमेरिकेतील वैद्यकीय उपचारांनंतर गोव्यात परतण्याची घटिका जवळ आली आहे. आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत ते गोव्यात पोहोचणार आहेत. आपल्या दुर्धर आजारातून पूर्णतः बरे होण्यास अद्याप थोडा कालावधी जावा लागणार असला तरीही त्यांचे सध्याचे गोव्यातील आगमन हे गोव्यामध्ये चैतन्य आणणारे असेल यात शंका नाही. आपल्या अनुपस्थितीमध्ये प्रशासन ठप्प होऊ नये यासाठी त्यांनी त्रिसदस्यीय मंत्रिसमिती ... Read More »

केटामाइन कनेक्शन

सत्तरीतील पिसुर्लेसारख्या आडवळणी गावी महसूल गुप्तचर खात्याच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून शंभर किलो केटामाइन हे अमली द्रव्य जप्त करण्याच्या घटनेने संपूर्ण गोव्यात खळबळ माजणे साहजिक आहे. केटामाइनची विक्री गोव्यातील काही औषधालयांमध्ये होत असल्याचे सांगून त्याविरुद्ध कारवाईचे आदेश आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी यापूर्वी दिलेले होते. मात्र, दैवदुर्विलास म्हणजे त्यांच्याच सत्तरीमध्ये अशा प्रकारचा कारखाना आता सापडला आहे. महसुल गुप्तचर खात्याची ही कारवाई केवळ ... Read More »

शांघाय सहकार्य संघटना आणि भारत

शैलेंद्र देवळाणकर नाटोला शह देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शांघाय सहकार्य संघटनेची बैठक चीनमधील किंगडोह येथे नुकतीच पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते.रशिया, चीन आणि मध्य आशियातील चार देशांनी स्थापन केलेल्या या संघटनेचे महत्त्व भारतासाठी मोठे आहे. देशाच्या परराष्ट्र धोरणांतर्गत काही वेगवान हालचाली घडताना दिसताहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गेल्या काही दिवसांतील परदेश दौरे वाढल्याचे दिसत आहे. ... Read More »

सर्वपक्षीय आणि सर्वस्तरीय जनतेमध्ये उत्सुकता आणि उत्साह

गोव्याचे मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षणमंत्री श्री. मनोहर पर्रीकर अमेरिकेतील अद्ययावत उपचारांनंतर आज रात्री उशिरा आपल्या प्रिय गोव्यात परतणार आहेत. त्यांच्या पुनरागमनाबाबत गोव्यात सर्वस्तरीय व सर्वपक्षीय जनतेमध्ये विलक्षण उत्सुकता व उत्साह असून सर्वत्र हाच चर्चेचा विषय बनला आहे. गोव्यात आज रात्री उशिरा परतल्यानंतर लागलीच उद्या शुक्रवार दि. १५ जून रोजी ते आपल्या मंत्रिमंडळ सदस्यांना भेटणार असून त्यांच्यासमवेत तातडीने बैठक घेणार ... Read More »

‘नागरी जाणिवा’ अभ्यासक्रम यंदापासून

>> कांता पाटणेकर यांची माहिती >> राज्यभरातील शंभर शाळांची निवड राज्यातील निवडक शंभर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांतून चालू शैक्षणिक वर्षापासून ‘नागरी जाणिवा’ हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे, अशी माहिती गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष कांता पाटणेकर यांनी काल दिली. तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सरकारी शाळांतून योग व मूल्य शिक्षण ... Read More »

मोदींचा फिटनेस फंडा : क्रिकेटर विराट कोहलीने फिटनेस चॅलेंजला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलाही व्हिडिओ शेअर केला असून सोशल मिडियावर तो गाजत आहे. सदर व्हिडिओत योगाभ्यास करताना मोदींची एक लक्षवेधी छबी. Read More »

कॅसिनोतील कर्मचार्‍याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करा : कॉंग्रेस

मंगळवारी रात्री मांडवी नदीतील एका कॅसिनो बोटीतून नदीत पडून एक बाउन्सर बुडून मृत्युमुखी पडण्याची जी घटना घडली त्याची चौकशी होण्याची गरज आहे, अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव र्यानी काल पत्रकार परिषदेत बोलताना केली. यापूर्वी एक पर्यटकही नदीत पडल्याने बुडून ठार झाला होता असे बुयांव र्यानी सांगितले. कॅसिनो मालर्कानी कॅसिनोत येणार्‍या लोकांच्या सुरक्षिततेकडे जे दुर्लक्ष केलेले आहे त्यात सरकारने लक्ष ... Read More »

मोपा विमानतळ परिसरातील वृक्षतोडीवरील स्थगिती कायम

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नियोजित मोपा विमानतळ परिसरातील वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली आहे. गोवा सरकारने राष्ट्रीय हरीत लवादाकडे दाद मागावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. मोपा विमानतळ परिसरातील हजारो झाडे तोडण्याच्या विरोधात एका स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने वृक्षतोडीला तात्पुरती स्थगिती दिली होती. खंडपीठात या याचिकेवर काल सुनावणी घेण्यात आली. सरकारने राष्ट्रीय हरीत लवादासमोर (एनजीटी) मोपा ... Read More »

सरकार अंगणवाडी, के. जी.च्या शिक्षकांना खाण प्रशिक्षण देणार

>> शिक्षण संचालक गजानन भट यांची माहिती शिक्षण खात्यातर्फे राज्यातील बालवाडी, अंगणवाडी, खासगी संस्थांच्या शिशूवाटिकांतील (के. जी.) शिक्षणामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शिक्षकांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी काल दिली. शिक्षण खात्यातर्फे दहावीचा उत्कृष्ट निकाल लागलेल्या सरकारी विद्यालयांच्या सन्मान सोहळ्यात शिक्षण संचालक भट बोलत होते. यावेळी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण ... Read More »

खाणप्रश्‍नी सरकारमध्ये एकमत नाही

>> कॉंग्रेसचे प्रवक्ते यतीश नाईक यांचा आरोप खाण प्रश्‍नी सरकारमध्ये एकमत नाही असा आरोप काल कॉंग्रेस प्रवक्ते यतीश नाईक पत्रकार परिषदेतून बोलताना केला. अशा परिस्थितीत सरकार तोडगा कसा काय काढेल, असा प्रश्‍न त्यांनी केला. सरकारातील घटक पक्षाचे एक नेते असलेले मंत्री विजय सरदेसाई हे गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढण्याची गरज असल्याचे म्हणतात. त्यासाठी गोवा सरकार केंद्राला साकडे ... Read More »