ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 13, 2018

दिलजमाई

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यात काल सिंगापूरमध्ये झालेल्या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. जवळजवळ तिसर्‍या महायुद्धाकडे जगाला घेऊन जाण्याची चिन्हे उभय नेत्यांमध्ये उफाळलेल्या वाक्‌युद्धातून आणि धमक्यांतून दिसू लागली होती, ती या भेटीतून आता निवळली आहेत असे म्हणायला हरकत नसावी. उभय देशांमध्ये चार मुद्द्यांवर एकमत झाले असे कालच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त ... Read More »

अस्मितेच्या राजकारणातील पुढचा टप्पा

ऍड. असीम सरोदे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात चर्चेत असणारे संभाजी भिडे गुरुजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रायगडावर ३२ मण सोन्याचे सिंहासन तयार करण्याचा संकल्प सोडला असून त्यासाठी ते त्यांच्या धारकर्‍यांना आवाहन करत आहेत. खरे पाहता, सुवर्ण सिंहासन करण्याचा विचार हा अस्मितेच्या राजकारणातील पुढचा टप्पा आहे. खरे तर शिवरायांचे विचार कृतीत येणे अधिक महत्त्वाचे आहे. मनोहर उर्ङ्ग संभाजी भिडे गुरुजी हे ... Read More »

पर्रीकर परतणार!

>> १५ जूनपर्यंत येण्याची काब्रालना खात्री स्वादुपिंडाच्या आजारामुळे गेल्या मार्च महिन्यापासून अमेरिकेत उपचार घेणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे चालू आठवड्यात गोव्यात परतण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी काल स्पष्ट केले. पर्रीकर यांची गोव्यात परतण्याची तारीख निश्‍चित झालेली नसली तरी आमदार नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत माहिती देताना पर्रीकर हे १५ जून रोजी गोव्यात परतणार असल्याचे सांगितले. मनोहर पर्रीकर ... Read More »

खाणप्रश्‍नी न्यायालयाद्वारे तोडगा काढणार : गडकरी

>> तिसर्‍या मांडवी पुलाचा नदीतील अंतिम स्लॅब जोडला गोव्यातील खाणबंदी प्रश्‍नावर न्यायालयातून योग्य तोडगा काढण्यात येणार आहे. आपण पंतप्रधान कार्यालयाशी खाणबंदी प्रश्‍नी चर्चा केली आहे. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात खाण प्रश्‍नी याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती केंद्रीय महामार्ग, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. तत्पूर्वी, गडकरी यांच्या हस्ते मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाचा नदीतील शेवटचा भाग जोडण्यात ... Read More »

खाणप्रश्‍नी सुप्रिम कोर्टात लवकरच हस्तक्षेप याचिका

>> नीलेश काब्राल यांची माहिती राज्यातील खाण उद्योग सुरू करण्यासाठी भाजप सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका नव्हे तर हस्तक्षेप याचिका सादर करणार असल्याचे काल आमदार नीलेश काब्राल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यासाठी नेमके काय करण्याचा सरकारचा विचार आहे, असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, सरकार यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. मात्र, ... Read More »

अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणासाठी किम तयार

>> सिंगापूरमध्ये ट्रम्प – किम ऐतिहासिक भेट अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्यातील बहुप्रतिक्षित ऐतिहासिक भेट अखेर काल झाली. सिंगापूरमधील कॅम्पेला हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांत तब्बल ५० मिनिटे झालेल्या चर्चेत उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने संपूर्ण अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाची तयारी दर्शवली आहे. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी एका करारावर स्वाक्षर्‍या केल्या असून त्यात अमेरिका आणि उत्तर कोरियात मैत्रीचा नवा अध्याय ... Read More »

उत्तर गोव्यातील ८० जुन्या पुलांचा आढावा ः सुदिन

सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्यातील पोर्तुगीजकालीन जुन्या पुलांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले असून उत्तर गोव्यातील सुमारे ८० जुन्या पुलांचा आढावा घेण्यात आला आहे. जुन्या पुलांच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. गतवर्षी सावर्डे येथे एक जुना पूल कोसळून मोठा अपघात झाला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्यातील ... Read More »

पूनम यादव तृतीय

>> आयसीसी टी-२० क्रमवारी नुकत्याच संपलेल्या महिलांच्या आशिया चषक टी-२० स्पर्धेतील सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरलेल्या भारताच्या पूनम यादवने काल मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. पूनमने या मालिकेत ९.१४च्या सरासरीने ७ बळी घेतले होते. मेगन शूट पहिल्या व ली कास्पेरेक दुसर्‍या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या अनाम अमिनने पाचवा क्रमांक राखला आहे. हेयली मॅथ्यूज चौथ्या ... Read More »

यजमान नेदरलँड्‌सचा निसटता विजय

यज’ान नेदरलँड्‌सने तिरंगी ’ालिकेतील काल ’ंगळवारी झालेल्या पहिल्या सा’न्यात आयर्लंडचा ४ धावांनी पराभव केला. प्रथ’ फलंदाजी करताना नेदरलँड्‌सने निर्धारित २० षटकांत सर्वबाद १४४ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर आयर्लंडचा डाव १४० धावांत रोखला. आयर्लंडचा कर्णधार गॅरी विल्सन याने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. कर्णधार पीटर सिलार (२८ चेंडूंत ३५), मॅक्स ओडोड (१४ चेंडूंत २०), बास डी लिड (३५ चेंडूंत ... Read More »

पाकिस्तान विजयी

कर्णधार सर्फराज अहमद याच्या ४९ चेंडूंतील नाबाद ८९ धावा व अनुभवी शोएब मलिकने २७ चेंडूंत कुटलेल्या ५३ धावांवर आरुढ होत पाकिस्तानने काल मंगळवारी झालेल्या टी-२० सामन्यात स्कॉटलंडचा ४८ धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तानने २० षटकांत ४ बाद २०४ अशी मजल मारून स्कॉटलंडला ६ बाद १५६ धावांवर रोखले. फकर झमन व अहमद शहजाद यांनी पाकला ... Read More »