ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 12, 2018

ताणतणावाचे बळी

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना अचानक आलेला ब्रेन स्ट्रोक आणि माजी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांचे ध्यानीमनी नसताना झालेले निधन या दोन्ही घटनांनी गोमंतकीय समाजमानस हादरलेले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे असेच अचानक उद्भवलेले गंभीर आजारपणही गोमंतकीय जनतेला हादरवून गेले होते. आता अमेरिकेेतील प्रगत उपचारांनंतर यातून ते हळूहळू बाहेर पडतील आणि या महिन्याअखेर गोव्यात परततील अशी अपेक्षा आहे. शांताराम नाईकांना तर ... Read More »

लोकप्रतिनिधींच्या हाती लोकांची इभ्रत!

देवेश कु.कडकडे (डिचोली) माझे वडील स्व. कुसुमाकर कडकडे १९६३ साली डिचोली मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी निवडणुकीतील एक आठवण सांगितली होती. त्याना पक्षाने निवडणूक खर्चासाठी दोन हजार रुपये दिले होते. त्यातील बाराशे रुपये खर्च होऊन उर्वरित आठशे रुपये त्यांनी मगो पक्षाकडे परत केले होते. गेल्या दोन दशकांपासून राजकारणात उबग येण्यासारख्या घटना घडत आहेत. विविध पक्षांच्या अजब कारनाम्यांमुळे जनता हवालदिल झाली ... Read More »

कळंगुट समुद्रात अकोल्याचे ५ पर्यटक बुडाले

>> तिघांचा बुडून मृत्यू, दोघे बेपत्ता >> मृतांत एक पोलीस कॉन्स्टेबल कळंगुट येथील समुद्र किनार्‍यावर काल सकाळी ६ च्या सुमारास अकोला, महाराष्ट्र येथील पाच पर्यटक युवक बुडाले. त्यातील तिघांचा बुडून मृत्यू झाला असून दोघेजण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृतदेह मिळाले असून दोघांचा शोध सुरू आहे. मृतांपैकी प्रीतेश नंदगवळी हा महाराष्ट्र पोलीस खात्यात शिपाई म्हणून कार्यरत होता. ... Read More »

१०० किलो केटामाईन पिसुर्ले-सत्तरीत जप्त

पिसुर्ले, सत्तरी येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका आस्थापनांवर छापा टाकून ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे १०० किलो वजनाचे केटामाईन जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत चार कोटी रुपये आहे. या प्रकरणी चौकशीसाठी ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत. इंटेलिजन्स महसूल संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी काल दुपारी ही कारवाई केली. दुपारी ३ वाजता सुरू असलेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ़पिसुर्ले औद्योगिक ... Read More »

महामार्गाच्या संथ कामामुळे गडकरी नाराज

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या प्रगतीचा आढावा घेताना गोव्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली. दक्षिण गोव्यातील तारांकित हॉटेलमध्ये महामार्गांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी कालपासून परिषद सुरू झाली. गोव्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या मंदगतीने कामाबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरले. महामार्गाच्या कामाला गती देण्याची सूचना त्यांनी केली आहे. मुरगाव, पर्वरी येथे महामार्गाच्या ... Read More »

प्रशासन ठप्प झालेले नाही : विजय

अनारोग्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे विदेशात, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर व नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे राज्याबाहेर असले तरी राज्य सरकारने प्रशासन ठप्प होऊ दिलेले नाही, असे नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. एका मागोमाग एक असे मुख्यमंत्र्यांसह दोन-तीन मंत्री एकाच वेळी आजारी पडण्याची विचित्र अशी परिस्थिती राज्यात पहिल्यांदाच निर्माण झालेली आहे. आणिबाणीसारखी ही स्थिती ... Read More »

राज्यभरातील ५१०० पैकी २६०० आस्थापनांकडून पीएफ निधी जमा

>> नवे आयुक्त अश्‍विनीकुमार गुप्ता यांची माहिती राज्यातील ५१०० आस्थापनांनी येथील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे नोंदणी केलेली असली तरी त्यातील केवळ २६०० आस्थापनेच आपल्या कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी न चुकता जमा करीत आहेत तर अन्य आस्थापने केवळ अधुनमधूनच हा निधी जमा करीत असल्याचे आढळून आले आहे, असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे नवे गोवा आयुक्त अश्‍विनीकुमार गुप्ता यांनी काल येथे ... Read More »

खाण अवलंबितांचे पणजीत बेमुदत धरणे आंदोलन

गोवा मायनिंग पीपल फ्रंटच्या झेंड्याखाली खाण अवलंबितांनी राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलनाला कालपासून सुरुवात केली आहे. खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा निघेपर्यंत धरणे धरण्यात येणार आहे, अशी माहिती फ्रंटचे निमंत्रक पुती गावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सरकारने अध्यादेश जारी करून खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा न काढल्यास पणजी येथे आझाद मैदानावर ११ जूनपासून बेमुदत ... Read More »

युकी भांब्रीला ८४वे स्थान

पुरुष एकेरीतील भारताचा आघाडीचा टेनिसपटू युकी भांब्री याने काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत नऊ स्थानांची प्रगती साधताना ८४वा क्रमांक मिळविला आहे. प्रज्ञेश गुणेश्‍वरन यानेदेखील १४ क्रमांकांची उडी घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम १६९व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. युकीला फ्रेंच ओपनच्या पहिल्याच फेरीत पराजित व्हावे लागले होते. परंतु, या स्पर्धेपूर्वीच्या सरबिटोन चॅलेंजर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंतची मारलेली मजल त्याला ३० गुण मिळवून ... Read More »

जयरामवर मदार

Read More »