ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 11, 2018

संवादाला संधी

रमझानच्या निमित्ताने काश्मीरमध्ये युद्धविराम पुकारण्याचा निर्णय जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या आग्रहावरून केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला, परंतु या विरामकाळात लष्कर आणि निमलष्करी दलांवर सातत्याने सुरू असलेले ग्रेनेड हल्ले पाहिले, तर या युद्धविरामाची फलनिष्पत्ती काय असा प्रश्न उभा राहतो. यापूर्वीच्या आत्मघाती हल्ल्यांऐवजी अशा प्रकारचे पळपुटे हल्ले चढवण्यामागील या दहशतवादी शक्तींचा उद्देश स्पष्ट आहे. लष्कराशी समोरासमोर लढत देण्याची हिंमत नाही, ... Read More »

पवारांचे पंतप्रधानपदः इजा, बिजा, तिजा!

ल. त्र्यं. जोशी  (नागपूर ) पंतप्रधानपद त्यांना हुलकावणीच देत आले आहे, पण म्हणून त्यांनी त्या पदाची आकांक्षा सोडली आहे असे म्हणता येणार नाही. जाहीरपणे ते काहीही म्हणत असले तरीही. कारण त्यांना हे पक्के ठाऊक आहे की, नियती ते पद कुणाला, केव्हा देईल याचा अजिबात भरवसा नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांचा मी भारताचे ‘निसटते’ पंतप्रधान असा ... Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज – उद्या गोवा भेटीवर

>> खाणबंदी प्रश्‍नावर चर्चेची शक्यता केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या दक्षिण गोव्यातील एका तारांकित हॉटेलमध्ये ११ व १२ जून होत असलेल्या दोन दिवसीय परिषदेनिमित्त केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे गोव्यात वास्तव्य असणार आहे. या काळात ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर, भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन राज्यातील खाण बंदीचा प्रश्‍न त्यांच्यासमोर पुन्हा ... Read More »

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची उद्या १२ जून रोजी सिंगापूर येथे ऐतिहासिक भेट होणार आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भेटीसाठी किम जोंग उन काल चिनी विमानाने सिंगापूरला पोहोचले. Read More »

मोसमी पावसाचा जोर कायम

राज्यात मोसमी पावसाचा जोर कायम असून काल डिचोली, काणकोण, सत्तरी, पेडणे तालुक्याला झोडपून काढले. कावरे-पिर्लात पूरसदृश्य स्थिती होती. तर पडझडीमुळे सुर्ला-बेळगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. डिचोलीतही अनेक ठिकाणी पडझड झाल्याचे वृत्त आहे. अग्निशामक दलाच्या मुख्यालयात दिवसभरात सुमारे ५० ते ५५ झाडे व इतर पडझडीच्या घटनांची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत केपे, सांगे, ओल्ड गोवा येथे सर्वाधिक १२ ... Read More »

आठ दिवस उलटले तरी पाठ्यपुस्तके अनुपलब्ध

>> शिक्षण खात्याचा यंदाही घोळ यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन आठ दिवस उलटले तरी शिक्षण खात्याला मुलांना आवश्यक पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यात यश प्राप्त झालेले नाही. शैक्षणिक वर्ष सुरू होताना ठेकेदारांकडून केवळ पन्नास टक्के पुस्तके उपलब्ध झाली होती. राज्यातील विद्यालये पाठ्य पुस्तकांच्या प्रतीक्षेत आहेत. आत्तापर्यंत काही शाळांतील मुलांना एक – दोन पुस्तके मिळालेली आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत शिक्षण खात्यातर्फे पहिली ... Read More »

पंचायत क्षेत्रांतील शौचालयांच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात

राज्यातील पंचायत क्षेत्रांतील शौचालयांच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून अहवाल लवकरच तयार केला जाणार आहे, अशी माहिती पंचायत संचालक अजित पंचवाडकर यांनी दिली. पंचायत क्षेत्रातील ५ विभागांच्या सर्वेक्षणानुसार सुमारे २४ हजार शौचालयांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घरात शौचालय उपलब्ध करून उघड्यावरील शौच बंद करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. विविध राज्यांत नवीन शौचालये उभारून उघड्यावरील शौचमुक्त गाव ... Read More »

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांचा सन्मान

>> ११ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप विन्सनवर्ल्ड आयोजित व आयएफबी प्रस्तुत ११ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची सांगता ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाने झाली. कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात झालेल्या समारोप सोहळ्याला केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पारंपरिक दिवज प्रज्वलित करून सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. या सोहळ्यात सविता दामोदर ... Read More »

नदालने ११व्यांदा जिंकली फ्रेंच ओपन

क्ले कोर्टचा बादशहा राफेल नदाल याने लालमातीवरील आपले श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध करताना काल रविवारी डॉमनिक थिएम याचा ६-४, ६-३, ६-२ असा फडशा पाडत तब्बल ११व्या फ्रेंच ओपन विजेतेपदाला गवसणी घातली. आपल्या १७व्या ग्रँडस्लॅम अजिंक्यपदासह नदालने रोलंड गॅरोवरील आपल्या जय-पराजयाचा रेकॉर्ड ८६-२ असा सुधारला. ३२ वर्षीय नदालला फेडररचा वीस ग्रँडस्लॅम विजेतेपदांशी बरोबरी साधण्यासाठी अजून तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकाव्या लागणार आहेत. ... Read More »

विंडीजचा लंकेवर एका डावाने विजय

वेस्ट इंडीजने श्रीलंकेचा एक डाव व २२६ धावांनी पराभव करत पहिला कसोटी सामना जिंकला. यासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विजयासाठी ४५३ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव २२६ धावांत आटोपला. चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने ३ बाद १७६ अशी मजल मारली होती. कुशल मेंडीस ९४ धावा करून नाबाद होता. त्यामुळे लंकेच्या संघाकडून प्रतिकाराची अपेक्षा होती. परंतु, शतक पूर्ण ... Read More »