ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 8, 2018

जमेना, पण करमेना!

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ वरील भेटीनंतरही उभय पक्षांमधील कटुता अद्याप हटू शकलेली नाही असे संकेत मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या आपल्या निर्णयापासून शिवसेना अद्याप मागे हटलेली नाही. शहा – ठाकरे भेटीत ‘सकारात्मक’ चर्चा झाली असे भाजपा नेते सांगत आहेत, याचा अर्थ एवढाच की भाजप आणि शिवसेना या महाराष्ट्रात ... Read More »

बरसती मृगधारा, मृद्गंध आला…

प्रकाश क्षीरसागर भर उन्हाळ्याने सृष्टी हैराण होते. वैशाख वणवा जिवाला जाळतच असतो. अशा वेळी मन आळवत असते मृगधून. वैज्ञानिक त्याला मान्सून म्हणतात. खरा पाऊस मृगाचाच. तोच पहिला पाऊस. तो झेलून घेतला की तन आणि मन कसं प्रसन्न होतं… दिवाळी झाली की थंडी ओसरू लागते आणि ऊन तापू लागते. शिशिराची पानगळ थांबून वसंताचे आगमन होते आणि चैत्रपालवी फुटून सृष्टी उत्साहित होत ... Read More »

देशाप्रती असलेली निष्ठा म्हणजेच देशभक्ती

>> रा. स्व. संघाच्या सोहळ्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची स्पष्टोक्ती अखेर कॉंग्रेससह अन्य विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या विरोधी प्रतिक्रियांची तमा न बाळगता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोहळ्याला ठरल्यानुसार उपस्थिती लावून आपल्या भाषणात प्राचीन भारतीय संस्कृतीपासून भारतीय स्वातंत्र्य लढ्यापर्यंतचे दाखले देत आपले विचार मांडले. देशाप्रती असलेली निष्ठा म्हणजेच देशभक्ती असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. असहिष्णुतेमुळे देशाची ओळख ... Read More »

क्रीडामंत्र्यांनी क्रीडापटूंची माफी मागावी

>> कॉंग्रेस ः राष्ट्रीय स्पर्धा आयोजनात अपयश आल्याचा दावा भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा निर्धारित वेळेत नोव्हेंबर २०१८ मध्ये आयोजित करण्यास अपयशी ठरल्याने सरकार आणि क्रीडा मंत्री मनोहर आजगावकर यांनी समस्त जनता आणि क्रीडापटूंची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली. इंडियन ऑलिंपिक असोसिएशनने ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नोव्हेंबर ... Read More »

पर्वरीतील अपघातात बेळगावचा युवक ठार

गिरी-तिस्क येथे काल झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार मृत्युमुखी पडला. पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला. मृत युवक खानापूर (बेळगाव) येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल सकाळी ११ वाजता गिरी तिस्कावरील रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या जीए-०८-के-२५८५ क्रमांकाच्या कारला मोटारसायकल क्र केए-२२, इएन -३३५९ वरून आलेल्या खानापूर (बेळगाव) येथील युवक जयवंत देसाई याने कारच्या मागील भागाला धडक दिली. त्यात तो युवक गंभीर ... Read More »

रेईशमागूस सामूहिक बलात्काराची योग्य पोलीस चौकशी नाही

>> पिळर्ण सिटीझन फोरमचा आरोप बेताळभाटी येथील समुद्र किनार्‍यावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आवाज उठवणारे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा मंत्री विजय सरदेसाई साळगाव मतदारसंघात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी गप्प का? असा प्रश्‍न पिळर्ण सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रकाश बांदोडकर यांनी पत्रकार परिषदेत काल उपस्थित केला. या प्रकरणात एका राजकारण्याच्या निकटवर्तीयाचा समावेश असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राजकीय दबावामुळे पोलिसांनी ... Read More »

गोवा डेअरी आवारात सत्यशोधक समितीतर्फे आमरण उपोषण

गोवा डेअरीच्या आवारात गुरुवारी सकाळपासून सत्यशोधक समितीतर्फे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. एकूण सहा मागण्यांसाठी सहा जणांनी उपोषणाला सुरुवात केलेली असून दिवसभर परिसरात वातावरण तंग बनल्याने पोलीस तसेच संयुक्त मामलेदारांनी मध्यस्थी करून स्थितीवर नियंत्रण ठेवले. संध्याकाळपर्यंत मागण्या पूर्ण करण्यात आल्या नसल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सत्यशोधक समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद सावर्डेकर, विकास प्रभू, शिवानंद बाक्रे, वैभव परब, ज्योतिबा ... Read More »

यंदा २२ सरकारी हायस्कूल्सचा दहावीत १०० टक्के निकाल

यंदा दहावी परीक्षेत राज्यातील सरकारी हायस्कूल्सची कामगिरी अतिशय स्पृहणीय ठरली असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ही हायस्कूल्स बहुतेक ग्रामीण भागांमधील आहेत. एकूण ७७ सरकारी हायस्कूल्सपैकी २२ हायस्कूल्सचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामुळे बहुसंख्येने ग्रामीण भागातील या शाळा असूनही कठोर मेहनत व दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यास काहीही अशक्य नसल्याचे या शाळांच्या कामगिरीवरून दिसून आले आहे. तसेच या शाळांकडे पाहण्याचा ... Read More »

मडकईकरांविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार

>> बेहिशेबी मालमत्ता वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ऍड. आयरिश रॉड्रीग्स यांनी गोवा लोकायुक्तांकडे काल तक्रार दाखल केली. ऍड. रॉड्रीग्स यांनी वीज मंत्री मडकईकर यांच्या कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची संबंधितांनी दखल न घेतल्याने ऍड. रॉड्रीग्स यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली आहे. ओल्ड गोवा येथे वीज मंत्री मडकईकर ... Read More »

भारताची श्रीलंकेवर ७ गड्यांनी मात

बांगलादेशविरुद्धच्या धक्कादायक पराभवातून स्वतःला सावरत भारताच्या महिला टीम इंंडियाने काल गुरुवारी श्रीलंकेचा ७ गडी व ७ चेंडू राखून पराभव केला. आशिया चषक टी-२० स्पर्धेतील हा सामना रॉयल सेलेंगर क्लब मैदानावर खेळविण्यात आला. श्रीलंकेचा डाव ७ बाद १०७ धावांवर रोखल्यानंतर भारताने १८.५ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा परंतु सलामीवीर यशोदा मेंडीस (२७) व हसिनी ... Read More »