ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 7, 2018

कर्ज महाग

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून यावेळी प्रथमच भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या ‘रेपो’ दरात पंचवीस मूलांकांनी वाढ केली आहे. ‘रेपो’ दर म्हणजे ज्या व्याज दराखाली रिझर्व्ह बँक विविध व्यावसायिक बँकांना कर्ज देते तो दर. म्हणजेच हा दर आता वाढवल्याने या बँकांकडून कमी कर्ज उचलले जाईल, साहजिकच अर्थव्यवस्थेमध्ये कमी पैसा खेळता राहील आणि त्यामुळे वाढती महागाई आटोक्यात येईल अशा प्रकारचे ... Read More »

गिलगिट – बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानची खेळी

शैलेंद्र देवळाणकर पाकव्याप्त काश्मीरचा अविभाज्य भाग असणार्‍या गिलगिट-बाल्टिस्तानला सिंध, पंजाबप्रमाणे पाचवा प्रांत म्हणून दर्जा देण्याचा डाव पाकिस्तानने आखला आहे. त्यासाठी या या प्रदेशाचे स्वायत्त क्षेत्राचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. असे करण्याला पाकिस्तान विकासाचे लेबल लावत असला तरी यामागचे मुख्य कारण तेथील स्थानिकांचा आवाज पूर्णपणे दाबून इतर या प्रांतावर कब्जा करण्याचा आहे. गेल्या महिन्यात भारत-पाकिस्तान संबंधांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची घटना ... Read More »

आरबीआयने व्याजदर वाढविल्याने विविध कर्जे महागण्याची शक्यता

अखेर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सुमारे साडेचार वर्षांच्या कालावधीनंतर व्याज दरांमध्ये वाढ केल्याने त्याचा फटका प्रामुख्याने गृह खरेदी कर्ज घेण्याच्या विचारात असलेल्या तसेच सध्याच्या गृह कर्जदारांनाही बसणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने आरबीआय ज्या दराने बँकांना वित्त पुरवठा करत असते त्या व्याजाचे दर तथा रेपो रेट पाव टक्क्याने वाढवून ६.२५ टक्के एवढा केला आहे. तसेच ... Read More »

भाजपाध्यक्ष अमित शहा भेटले उद्धव ठाकरेंना

शिवसेना व भाजप यांच्यातील संबंधांमध्ये अलीकडील काळात बरीच कटुता निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत काल संध्याकाळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. उभय पक्षांदरम्यानचे मतभेद संपवून आगामी २०१९ लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्यात येईल असे अमित शहा यांनी स्पष्ट केले असल्याचे वृत्त दूरचित्रवाणी वाहिन्यांनी दिले आहे. मात्र त्याआधी ... Read More »

सत्तरीत गव्या रेड्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

कणकीरे-सत्तरी येथे गव्या रेड्याच्या हल्यात काल सकाळी १०.३० वा. जयंती आनंद गांवकर (वय ४४) हिचा मृत्यू झाला. काजू बागायतीत काजूची रोपे लावण्यासाठी गेली असता गव्या रेड्याने हल्ला केला. तिच्याबरोबर काजू रोपे लावण्यासाठी गेलेल्या गोमती गावडे हिने दिलेल्या माहितीनुसार जयंती आणि आपण सकाळी दहा वाजता काजूची रोपे लावण्यासाठी गावाजवळच असलेल्या बागायतीत गेलो होतो. ती पुढे आणि आपण मागे डोक्यावर काजुची रोपे ... Read More »

दीर्घ सेवावाढीवरील सरकारी अधिकार्‍यांना घरी पाठविण्याची ‘आप’ची मागणी

निवृत्तीनंतर सेवावाढ देण्यात आलेल्या व निवृत्तीनंतर ही सेवावाढ घेऊन कित्येक वर्षे सरकारी सेवेत असलेल्या आजोबा व पणजोबांना आता सरकारने घरी पाठवावे व नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी काल आम आदमी पार्टीने पत्रकार परिषदेत केली. पक्षनेते एल्विस गोम्स म्हणाले की, एका बाजूने सरकारने विविध सरकारी खात्यातील पदे भरण्याची प्रक्रिया बंद केली आहे आणि दुसर्‍या बाजूने निवृत्त होणार्‍या ... Read More »

मडकईकरांची प्रकृती स्थिर

मुंबईला गेले असताना ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे मुंबईतील कोकिळाबेन इस्पितळात शस्त्रक्रिया करण्यात आलेले गोव्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांची प्रकृती आता स्थिर असून अजूनही त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे, असे काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले. सोमवारी मध्यरात्री मडकईकर यांना मुंबईतील एका हॉटेलात वास्तव्यास असताना ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर कोकिळाबेन इस्पितळात त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ७२ तास त्यांना अतिदक्षता विभागात ... Read More »

दिव्यांगांना मानधन देण्यात गोवा प्रथम

>> मात्र साधनसुविधा देण्यात मागे ः केंद्रीय दिव्यांग आयुक्त गोवा राज्य दिव्यांगांना मानधन देण्यात देशपातळीवर प्रथम स्थानावर आहे. मात्र, दिव्यांगांना आवश्यक साधन सुविधा उपलब्ध करण्याबाबत मागे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय दिव्यांग मुख्य आयुक्त डॉ. कमलेश कुमार पांडे यांनी पत्रकार परिषदेत काल केले. केंद्रीय दिव्यांग मुख्य आयुक्त डॉ. पांडे यांनी समाज कल्याण खात्याचे सचिव, समाज कल्याण खात्याचे संचालक, तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी ... Read More »

डेंग्यू पसरल्याचा संशय आरोग्य खात्यातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

Read More »

मुगुरुझा, हालेप उपांत्य फेरीत

>> शारापोव्हा, कर्बरचे आव्हान संपुष्टात गतविजेत्या गार्बिन मुगुरुझा आणि जागतिक अग्रमानांकित रुमानियनाची सिमोना हालेप यांच्या फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची उपांत्य लढत होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मुगुरुझाने अन्य एक गतविजेत्या रशियन सेंसेशन मारिया शारापोव्हाचा तर हालेपने जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या पहिला उपांत्यपूर्व सामना दोन माजी ... Read More »