ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 6, 2018

राजकीय शेर्मांव

दिल्लीचे आर्चबिशप अनिल कुटो यांनी गेल्या महिन्यात, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा भाजपचे सरकार येण्याची शक्यता असल्याने देश संकटात असल्याचे सूचित करीत ‘देशासाठी प्रार्थना करा’ असा संदेश आपल्या अनुयायांना पत्राद्वारे दिला होता. आता गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी आपल्या वार्षिक ‘पॅस्टोरल’ पत्रामध्ये त्यावर कडी करत देशाचे संविधान धोक्यात आहे, देशात ‘मोनोकल्चरलीझम’ निर्माण झाला आहे, मानवाधिकारांचे हनन चालले आहे, ... Read More »

पर्यावरणविचार अनुसरणार का?

ऍड. असीम सरोद जागतिक पर्यावरण दिन काल साजरा झाला. या दिवसाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाविषयी प्रबोधन आणि जाणीवजागृती केली जाते. हे करत असताना पर्यावरणासंबंधीच्या कायद्यांची सर्रास होत असेली पायमल्ली याकडे अधिक गांभीर्याने पाहिले पाहिजे. त्यासाठी मुळात पर्यावरणविज्ञान आणि पर्यावरण विचार समजून घेतला पाहिजे. भारतात मुळातच पर्यावरण संरक्षण कायदा हा सातत्याने दुर्लक्षिला गेलेला विषय आहे. या कायद्याला आजवर कधीच प्राधान्य दिले गेले ... Read More »

वीजमंत्री पांडुरंग मडकईकरांना ब्रेन स्ट्रोक

>> मुंबईतील इस्पितळात शस्त्रक्रिया; धोका टळला वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना ‘ब्रेन स्ट्रोक’ आल्यामुळे मुंबई येथील कोकिलाबेन इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मडकईकर सोमवारी (दि. ४) दुपारी मुंबईला गेले होते. तेथेच सोमवारी उशिरा रात्रौ त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून धोका टळला आहे, असे त्यांची विचारपूस करण्यासाठी मुंबईल गेलेले आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी ... Read More »

पंतप्रधान मोदीच गोव्यातील खाणींचा प्रश्‍न सोडवतील ः विश्‍वजित राणे

गोव्याचा खाण प्रश्‍न केवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेच सोडवू शकतात व ते तो सोडवतील असा विश्‍वास आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल त्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना व्यक्त केला. मोदी यांना गोव्याच्या खाण प्रश्‍नाची चांगली माहिती आहे. ते राज्यातील बंद पडलेल्या खाणींचा प्रश्‍न सोडवतील. गोव्यातील कॉंग्रेस नेत्यांनी जनगणमन करीत फिरण्याऐवजी नवी दिल्लीत जाऊन कॉंग्रेस अध्यक्षाची भेट घ्यावी व गोव्यातील खाण ... Read More »

६० पदांची भरती प्रक्रिया झाली रद्द

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील १० महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवरील कनिष्ठ कारकून व डेटा एन्ट्रीपदाच्या पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. महसूल खात्यामधील नियमित विविध पदांच्या भरतीसाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री रोहन खंवटे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसने उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील ४० कंत्राटी कर्मचार्‍यांच्या रोजगार प्रश्‍नी महसूल मंत्री खंवटे, ... Read More »

..तोपर्यंत एससी-एसटी कर्मचार्‍यांना पदोन्नतीत आरक्षण दिले जावे

>> सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांना सरकारी नोकरीत पदोन्नतीत आरक्षणप्रश्‍नी सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर काल सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना दिलासा देणारा निवाडा दिला. घटनापीठाचा अंतिम निर्णय होईपर्यंत एससी व एसटीच्या सरकारी कर्मचार्‍यांना कायद्यानुसार पदोन्नतीत आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काल एका आदेशाद्वारे मान्यता दिली. याप्रकरणी देशातील विविध न्यायालयांनी दिलेल्या आदेशांमुळे या कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया ठप्प ... Read More »

अल्पसंख्यकांत असुरक्षिततेची भावना वाढतेय ः आर्चबिशप

मानवाधिकारांवर हल्ले, लोकशाही कमकुवत बनू लागल्याने नागरिकांत असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. भारतीय घटनेत फेरफार होण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी भीती गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी वार्षिक डायोसेशन संदेशात व्यक्त केली आहे. आर्चबिशप फेर्रांव यांच्या संदेशाचे राष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटू लागले आहेत. आर्चबिशप यांनी आपल्या संदेशात जगातील व देशातील एकंदर परिस्थितीबाबत महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले आहे. विकासाच्या नावाखाली लोकांची ... Read More »

गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची सज्जता

येत्या ८ ते १० जून दरम्यान येथे होणार्‍या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची तयारी जोरात चालू आहे, असे विन्सन वर्ल्डतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्रीपाद शेटये, संजय शेटये व ज्ञानेश मोघे यांनी काल सांगितले. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. समारोपाचे अनुक्रमे विशेष अतिथी व प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता जॉन अब्राहम व केंद्रीय मंत्री ... Read More »

चेकिनाटो, थिएम उपांत्य फेरीत

>> नोवाक जोकोविच, आलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव इटलीच्या बिगरमानांकित मार्को चेकिनाटो याने १२ ग्रँडस्लॅम विजेत्या व विसाव्या मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा ६-३, ७-६ (७-४), १-६, ७-६ (१३-११) असा पराभव करत फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेपूर्वी ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकही विजय मिळविण्यात अपयशी ठरलेल्या चेकिनाटो याने ३ तास २६ मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत जोकोविचच्या अनुभवाला पाणी पाजले. दुसरीकडे सातव्या ... Read More »

अफगाणिस्तानने जिंकली टी-२० मालिका

अफगाणिस्तानने दुसर्‍या टी-२० सामन्यात बांगलादेशचा ६ गडी व ७ चेंडू राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १३४ धावा केल्या. अफगाण संघाने विजयी लक्ष्य १८.५ षटकांत गाठले. राशिद खानने आपल्या चार षटकांत केवळ १२ धावा मोजून ४ गडी बाद केल्यानंतर गोलंदाजीत दोन बळी घेतलेल्या अष्टपैलू मोहम्मद नबी याने केवळ १५ चेंडूंत नाबाद ... Read More »