ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 5, 2018

माफी मागा!

वीज खात्याने ‘देखभाली’ च्या नावाखाली राजधानी पणजी शहरासह तिसवाडी तालुक्याचा वीजपुरवठा रविवारी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा बंद ठेवला. हे पुरे झाले नाही म्हणून की काय रविवारी रात्रभर वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. एकीकडे मोसमी पावसाचे राज्यात आगमन होत असताना एकाएकी वीज खात्याला ही ‘देखभाल’ कशी आणि का आठवली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. थिवी वीज केंद्रातून कदंबा पठारावरील वीज उपकेंद्रात बायंगिणी ... Read More »

इंधनाच्या झळा, आवळती सामान्यांचा गळा…

शंभू भाऊ बांदेकर पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की सार्वत्रिक महागाईत वाढ होत जाते आणि याचे जास्तीत जास्त दुष्परिणाम सामान्य जनतेवर होतात. सर्वांत जास्त झळ त्यांना पोचते. यातून मग अन्न, वस्त्र, निवारा आणि इंधन यांचा चौकोन चारी बाजूंनी अपूर्ण राहतो व आम आदमीची सर्व बाजूंनी नाकेबंदी होते. आपल्याच देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील माणसांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या जगण्यासाठीच्या मूलभूत गरजा ... Read More »

बिल्डरसाठी तिसवाडीची जनता २० तास अंधारात

>> ‘देखभाली’च्या नावाखाली वीज खात्याच्या पायघड्या >> कॉंग्रेसचा अधिकार्‍यांना घेराव पावसाळापूर्व देखभालीच्या नावाखाली रविवारी दिवसभर राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्यातील वीज पुरवठा खंडित ठेवण्याची वीज खात्याची कृती प्रत्यक्षात कदंब पठारावरील बड्या बिल्डरांच्या भूखंडांवरून जाणारी उच्च दाबाची वीजवाहिनी हटवण्यासाठी होती असे चौकशीत स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसने काल यासंदर्भात वीज खात्याच्या उच्च अधिकार्‍यांना घेराव घातला. रविवारचा संपूर्ण दिवस व रात्र उन्हाळ्याच्या उष्म्यात वीजेशिवाय ... Read More »

गृहपाठाच्या निर्णयाची कार्यवाही करणार

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशानंतरच प्राथमिक विद्यालयातील पहिला व दुसरीच्या मुलांना गृहपाठ न देण्याच्या निर्णयाची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी काल दिली. मद्रास उच्च न्यायालयाने प्राथमिक स्तरावरील पहिली व दुसरीच्या मुलांना गृहपाठ न देण्याबाबत आणि दप्तराचे ओझेे कमी करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने न्यायालयाच्या ... Read More »

कुर्डी सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवशीच वर्गांवर बहिष्कार

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच पहिल्याच दिवशी सांगे तालुक्यातील वाडे-कुर्डी येथील वसाहत क्र. एक मधील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या सुमारे ८० विद्यार्थ्यांनी शिक्षक नसल्याकारणाने वर्गावर बहिष्कार घालून नाराजी व्यक्त केली. वाडे-कुर्डीच्या प्राथमिक शाळेत सध्या ८०च्या वर विद्यार्थी आहेत. शिक्षक मात्र एकच आहे. गत शैक्षणिक वर्ष संपण्याअगोदर पालकांनी सांगेच्या भागशिक्षणाधिकारी कार्यालयात येवून शैक्षणिक वर्ष अर्धवट असताना शिक्षकाची बदली रद्द करावी म्हणून ... Read More »

डसोझांच्याही विदेशवारीने प्रशासन कोलमडेल ः कॉंग्रेस

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेत काही महिन्यांपासून असताना आता पर्रीकरांनीच नेमलेल्या त्रिसदस्यीय मंत्री समितीतील मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे सुद्धा विदेशात (पोर्तुगाल) गेल्याने प्रशासनावर मोठा परिणाम होणार आहे, असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल सांगितले. हे सर्व म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचेही ते म्हणाले. डिसोझा एका महिन्यासाठी पोर्तुगालला गेले असून आपल्या खात्यांचा ताबा त्यांनी विदेशात असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे दिल्याने ... Read More »

मेरशी टोळीयुद्धातील ७ जण फरारी

मेरशी येथील शनिवारच्या टोळी युद्धातील दोन्ही गटातील मिळून ७ जण फरारी आहेत. दरम्यान, या प्रकरणी ओल्ड गोवा पोलिसांनी अटक केलेल्या ८ जणांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील न्यायालयाने काल दिला. मेरशी टोळीतील ५ संशयित आरोपी आणि चिंबल टोळीतील २ संशयित आरोपी फरारी आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. मेरशी, चिंबल भागात पुन्हा गुंडगिरीला सुरुवात झाल्याने ... Read More »

दाबोळीत २८ लाखांचे सोने विमान प्रवाशाकडून जप्त

गोवा कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावर काल केलेल्या कारवाईत एअर इंडिया विमानातून (एआय-९९४) २८ लाख रुपये किंमतीचे ९९५ ग्राम सोने जप्त केले. संबंधित प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. प्राप्त माहितीनुसार दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया एआय ९९४ या विमानात जाऊन कस्टम विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईवेळी एका सीटवर दोन चांदीच्या रंगाच्या लहान पिशव्या नजरेस पडल्या. त्या पिशव्यांत त्यांना चॉकलेटी रंगाची सोन्याची पावडर सापडली. ... Read More »

भारताचा केनियावर ३ गोलांनी विजय

>> अंतिम फेरीत प्रवेश >> शतकी सामन्यात सुनील छेत्रीचे दोन गोल >> पुढील सामना न्यूझीलंडशी चार देशांच्या इंटरकॉंटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील काल सोमवारी झालेल्या सामन्यात भारताने केनियाचा ३-० असा पराभव केला. आपला ऐतिहासिक शतकी सामना खेळणार्‍या टीम इंडियाचा कर्णधार सुनील छेत्रीने या सामन्यात दोन गोल (६८वे मिनिट व ९०+ २ मिनिट) नोंदविले. जेजे लालपेखलुआ याने ७१व्या मिनिटाला गोलजाळीचा वेध घेतला. ... Read More »

भारतीय महिलांनी थायलंडला तुडवले

>> ६६ धावांनी केली मात >> हरमनप्रीत कौर सामनावीर महिलांच्या आशिया चषक टी-२० स्पर्धेत काल सोमवारी भारताने थायलंडचा ६६ धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. भारताने रविवारी मलेशियाला हरवून विजयी सलामी दिली होती. प्रथम फलंदाजी करताना १३२ धावा केलेल्या भारताने थायलंडचा डाव ८ बाद ६६ धावांवर रोखला. भारताने काल सलामीवीर मिताली राजला विश्रांती दिली. मोना ... Read More »