ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 4, 2018

विरोधी ऐक्य ः दिसायला ठीक, प्रत्यक्षात कठीण!

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) १९७१ च्या लोकसभा निवडणुकीतही सर्व विरोधकांनी ‘इंदिरा हटाव’ नारा देऊन सामंजस्याने लोकसभा निवडणूक लढविली होती. पण खूप प्रयत्न करुनही शेवटी इंदिला कॉंग्रेसला ५४५ पैकी ३५२ जागा मिळाल्या होत्या व अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर इंदिराजींचे ‘दुर्गा’ असे वर्णन करण्याची पाळी आली होती. जवळपास तशीच परिस्थिती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनिमित्त निर्माण झाली आहे असे म्हणता येईल… कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या ... Read More »

एक अनोखी मैत्री

माधव बोरकार बोर्‍हेसला शिक्षितपेक्षाही अशिक्षित लोकांकडे बोलायला आवडायचे. भाषेची सूक्ष्म जाण अशाच अशिक्षित लोकांकडून मिळत असते हे त्याचं निरीक्षण अन्य लेखकांना खूप काही सांगून जातं. बोर्‍हेसच्या सहवासाच्या आठवणी लिहून आल्बॅर्त मँग्वेलने साहित्य जगतावर खूप मोठे उपकार केले आहेत. डोळे अधू असूनही जॉर्ज लुईस बोर्‍हेस वाचन करायचा. वाचन ही त्याची बौद्धिक गरज होती. पुढे पूर्ण अंधत्व आल्यावर दुसर्‍यांकडून वाचून घेण्याची त्याने ... Read More »

खाण प्रश्न लटकला

पावसाळा जवळ आल्याने खाणींचा हंगाम जरी सध्या संपलेला असला, तरी पावसाळ्यानंतर तरी खाणी पुन्हा सुरू व्हाव्यात, यासाठी खाण अवलंबितांनी जोरदार मोर्चेबांधणी पुन्हा एकवार सुरू केली आहे. गेल्या वेळी त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनानंतर धास्तावलेल्या सरकारने त्यांना खाण बंदीप्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिलेले होते, परंतु त्या आघाडीवर अजूनही काही ठोस घडू शकलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकवार राज्य सरकारला घेरण्याची तयारी खाण ... Read More »

गोमचिम : मराठी चित्रपटांचा सुखद वर्षाव

 देवेंद्र वालावलकर काळ बदलत गेला तसा मराठी सिनेमा बदलत गेला. मराठी सिनेमा विश्वव्यापी बनला. मराठी सिनेमांमधून गेल्या काही वर्षांत जे विषय हाताळले त्याला तोड नाही. विनोदी आणि रडपटांच्या जोखडातून बाहेर पडलेला मराठी सिनेमा बघता बघता लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करू लागला. मराठी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने… ‘जिकडे पिकते तिकडे विकले जात नाही’ ही म्हण वेगळ्या अर्थाने गोव्यात सलग ११ वर्षे ... Read More »

विकासाच्या मुद्द्यावरच २०१९ ची निवडणूक लढवणार

>> केंद्रीय मंत्री मुख्तार नक्वी : राम मंदिर, हिंदुत्वाचा मुद्दा नाही राम मंदिर व हिंदुत्त्व नव्हे तर विकास हाच मुद्दा घेऊन भाजप २०१९ सालची निवडणूक लढवणार आहे, असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काल येथे पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्रातील मोदी सरकारने गेली चार वर्षे केलेल्या कामाची माहिती नक्वी यांनी यानी यावेळी दिली. गेल्या चार वर्षात सरकारने देशात ... Read More »

मेरशीत टोळीयुध्द : चौघे जखमी

>> आठ जणांना अटक; चौघेजण गोमेकॉत दाखल मेरशी मार्केट येथील गोवेकर बार ऍण्ड रेस्टॉरंटजवळ शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास दोन गटांत पूर्ववैमनस्यातून झालेल्या टोळी युद्धात चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी ओल्ड गोवा पोलिसांनी आत्तापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. तसेच घटनास्थळांवरून २ मोटरसायकली, ५ स्कूटर, २ चाकू ताब्यात घेतले आहेत. या टोळी युद्धासंबंधी समीर मुल्ला (इंदिरानगर चिंबल) आणि ... Read More »

सुषमा स्वराजांच्या विमानाचा संपर्क तुटल्याने गोंधळ

मॉरिशस दौर्‍यासाठी विदेश व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांना घेऊन जाणार्‍या विमानाचा काही काळासाठी संपर्क तुटल्याने शनिवारी बराच गोंधळ उडाला. त्रिवेंद्रम येथून या विमानाने उड्डाण केल्यानंतर त्याचा सुमारे १४ मिनिटे संपर्क तुटल्याने ही स्थिती निर्माण झाली. त्रिवेंद्रम येथून शनिवारी दु. २.०८ वा. स्वराज यांच्या या विमानाने मॉरिशससाठी उड्डाण केले होते. सुमारे १४ मिनिटे संबंधित यंत्रणांशी असलेला या विमानाचा संपर्क तुटला. मात्र अखेर ... Read More »

तिलारी कालव्याचे शिल्लक काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्णत्वास : पालयेकर

राज्यातील तिलारी धरणाच्या कालव्याचे शिल्लक १२.५ किलो मीटरचे काम डिसेंबर २०१९ पर्यत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी काल दिली. तिलारी कालव्याचे काही भागात बांधकाम जमीन संपादन व इतर काही कारणांमुळे रखडले आहे. कालव्याचे काम रखडलेल्या भागांना भेटी देऊन अधिकार्‍यांना आवश्यक सूचना करण्यात आली आहे. तिलारी कालव्याचे पाणी शेतीसाठी उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे तिलारी ... Read More »

पाक सैनिकांच्या हल्ल्यात जम्मूत भारताचे २ जवान शहीद

>> दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४ जखमी जम्मू भागातील आंतरराष्ट्रीय सीमेलगत पाकिस्तानी सैनिकांनी काल केलेल्या हल्ल्यात एका अजधकार्‍यांसह भारताचे दोन जवान शहीद झाले. उभय सैन्यांच्या लष्कर औपरेशन्सच्या महासंचालकांदरम्यान शस्त्रसंधीबाबत करार झाल्यानंतर एका आठवडाभरात पाकिस्तानी सैनिकांनी काल तोफगोळे व गोळ्याचा भडीमार भारतीय हद्दीतील चौक्यांच्या दिशेने करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. अखनूर विभागातील प्रगवाल भागात झालेल्या हल्ल्यामुळे एका पोलिसासह एक महिला मिळून दहाजण जखमीही ... Read More »

वीजमंत्र्यांच्या राजीनाम्याची कॉंग्रेसकडून मागणी

राज्यातील जनतेला सुरळीत वीज पुरवठा करण्यात अपयशी ठरलेले वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. माजी वीजमंत्री दिगंबर कामत यांच्याकडून वीज खात्याचा कारभार योग्य पद्धतीने हाताळण्याबाबत महिनाभर प्रशिक्षण घ्यावे, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने काल केली. गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील जनता खंडीत वीज पुरवठ्यामुळे त्रस्त बनली आहे. राजधानी पणजीमधील नागरिकांना सुध्दा खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ... Read More »