ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 2, 2018

बळीराजा पुन्हा रस्त्यावर

देशातील सात राज्यांतील शेतकरी कालपासून आपल्या विविध मागण्यांसाठी ‘गाव बंद’चा पुकारा करून रस्त्यावर उतरला आहे. शहरांना पुढील दहा दिवस भाजी, दूध आणि कृषी मालाचा पुरवठा करणार नाही असा त्याचा निर्धार आहे. केंद्र सरकार देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे वायदे करीत असताना प्रत्यक्षात मात्र बळीराजाला आपल्या साध्या साध्या मागण्यांसाठी पुन्हा पुन्हा रस्त्यावर उतरावे लागते आहे हे लाजीरवाणे आहे. काही काळापूर्वी महाराष्ट्रातील ... Read More »

हिरव्या गणवेशातील रणरागिणी डॉक्टर

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सेनेतील जवानांच्या जीवन मरणाशी निगडित असलेल्या कॅप्टन देविका गुप्ता नामक हिरव्या गणवेषातील एका रणरागिणीने तिच्या कर्तव्यदक्षतेसमोर १८,००० सैनिकांच्या जीवन मरणाचा सर्वेसर्वा असलेल्या मेजर जनरल रँकच्या एका डिव्हिजनल कमांडरला कसे झुकायला लावले याची कहाणी प्रस्तुत लेखात आहे… मी संरक्षण दलातून २००२ मध्येच निवृत्त झालो असलो तरी अजूनही सेनेत माझे अनेक मित्र आहेत. घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असणार्‍या जनरलकडून ... Read More »

खाणी सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच

>> उसगाव सभेत खाण अवलंबितांचा इशारा >> पणजीत ४ जूनपासून धरणे आंदोलन राज्यातील खाणी सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असून सरकारला जागे करून अध्यादेश काढण्यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या वेळी भव्य मोर्चा व दि. ४ जून पासून पणजीत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय तिस्क – उसगाव येथील गोवा मायनिंग पीपल्स फोरमच्या जाहीर सभेत काल घेण्यात आला. वेळप्रसंगी सर्व मतभेद विसरून सर्व ... Read More »

खाण प्रश्‍नावर केंद्र सरकार गंभीर नसल्याचा कॉंग्रेसचा आरोप

राज्यातील खाण बंदीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार आणि केंद्रीय नेते गंभीर नाहीत, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते ऍड. यतीश नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केला. सर्वोच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारी २०१८ रोजी खाणबंदीचा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर कोणताही तोडगा काढण्यात भाजपच्या केंद्र आणि राज्यातील सरकारला यश प्राप्त झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुध्दा खाण प्रश्‍नाकडे लक्ष देण्यास ... Read More »

राज्यातील ५४ खाण लीजधारकांना नोटिसा

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने अटींच्या उल्लंघन प्रकरणी ५४ खाण लिजधारकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. खाण कंपन्यांनी अटींचे उल्लंघन केल्याने त्यांची बँक हमी का जप्त केली जाऊ नये? अशी विचारणा मंडळाने केली आहे. संबंधित खाण कंपन्यांना पंधरा दिवसांत उत्तर देण्याचा आदेश देण्यात आला आहे. मंडळाने खाण कंपन्यांना खाण सुरू करण्यापूर्वी प्रदूषण नियंत्रण व इतर बाबतीत अनेक अटी घातल्या होत्या. ... Read More »

मुख्यमंत्र्यांविरुद्ध कॉंग्रेसची सीआयडी पोलिसात तक्रार

>> ईमेल अकाऊंट गैरवापराचा संशय मुख्यमंत्र्यांच्या ईमेल अकाऊंटचा वापर अन्य व्यक्तींकडून केला जात असल्याचा संशय कॉंग्रेस पक्षाने व्यक्त केला असून यासंबंधी एक तक्रार कॉंग्रेसचे प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव यांनी गुन्हा अन्वेषण विभागाकडे काल दाखल केली आहे. या ईमेलच्या आधारे सरकारी फाईल्स हातावेगळ्या करण्यात येत असल्याने गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंका कॉंग्रेस पक्षाने व्यक्त केली आहे. अमेरिकेमध्ये वैद्यकीय उपचार ... Read More »

आपल्या नातेवाईकांचा अमेरिका दौरा स्वखर्चाने : पर्यटनमंत्री

गोवा पर्यटन खात्याच्या शिष्टमंडळाबरोबर आपल्या कुटुंबातील जे सदस्य अमेरिकेला गेले होते ते स्वखर्चाने गेल होते असा खुलासा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काल केला. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा पर्यटन खात्याचे एक शिष्टमंडळ हल्लीच अमेरिकेला गोवा पर्यटनासंबंधीचा एक रोड शो करण्यासाठी गेले होते. या शिष्टमंडळात आजगावकर यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा समावेश असल्याने कॉंग्रेस पक्षाने त्याला आक्षेप घेत आजगावकर यांचे कुटुंबीय ... Read More »

गोव्यातील आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेविषयी आज अंतिम निर्णय

Read More »

जुन्या यंत्रणेमुळे वीजपुरवठ्याची समस्या ः वीजमंत्री

राज्यातील वीज वाहिन्यांसाठीची संपूर्ण यंत्रणा ही जुनी झालेली असून त्यामुळेच राज्याला खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुढील २५ वर्षांचा विचार करून नवी वीज उपकेंद्र उभारणे, भूमीगत वीजवाहिन्या घालणे, एरियल बंचिंग वाहिन्या घालणे, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ‘रिंग’ पद्धतीचा वापर करणे, जुन्या वीज उपकेंद्रांत सुधारणा घडवून आणणे, ठिकठिकाणी नवे ट्रान्सफॉर्मर बसवणे, खराब झालेले जुने खांब बदलून त्याजागी नवे वीज खांब ... Read More »

दिमित्रोव, स्वितोलिनाचे आव्हान आटोपले

>> जोकोविच, झ्वेरेव, वर्दास्को, वॉझनियाकी, निशिकोरी, बुस्टा उपउपांत्यपूर्व फेरीत फ्रेंच ओपन स्पर्धेत काल शुक्रवारीदेखील सनसनाटी निकालाची मालिका कायम राहिली. पुरुष एकेरीत चौथ्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव याला व महिला एकेरीत चतुर्थ मानांकित इलिना स्वितोलिना यांना पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या व चौथ्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव या बल्गेरियाच्या खेळाडूचे आव्हान तिसर्‍याच फेरीत आटोपले. तिसाव्या मानांकित स्पेनच्या फर्नांडो वर्दास्कोने दिमित्रोवला ... Read More »