ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: June 2018

काळा की पांढरा?

स्वीस बँकेमधील भारतीयांच्या ठेवींमध्ये गेल्या वर्षी पन्नास टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची नुकतीच जाहीर झालेली अधिकृत आकडेवारी मोदी सरकारच्या काळ्या पैशाविरुद्धच्या मोहिमेच्या यशस्वीततेविषयी शंका उत्पन्न करणारी आहे. भारतीयांचे सात हजार कोटी रुपये स्वीस बँकेत असल्याची ही आकडेवारी काही नुसते ‘अंदाज पंचे धावोद्रसे’ नाही. स्वित्झर्लंडमधील स्वीस नॅशनल बँकेने (एसएनबी) दिलेल्या अधिकृत आकडेवारीतून हे सत्य समोर आलेले आहे. कॉंग्रेस पक्षाने या विषयावर काल ... Read More »

एनएसजीची काश्मीरमधील संभाव्य रणनीती

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) आजवर एनएसजीला ‘पर्सनल सिक्युरिटी’ किंवा ‘अर्बन अँटी टेरर ऑपरेशन्स’ शिवाय कुठेही, कशासाठीही तैनात केले गेलेले नव्हते. पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल आणि गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काश्मिरमध्ये सुरू असलेल्या प्रच्छन्न युध्दात कार्यरत जिहाद्यांच्या सत्वर नायनाटासाठी सेनेच्या मदतीला आणि अर्ध सैनिक बल आणि पोलिसांच्या प्रशिक्षणासाठी एनएसजीला खोर्‍यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे… काश्मीरला भारतापासून वेगळे करण्यासाठी मागील ... Read More »

मोरजीत मटका अड्‌ड्यावर धाड, ६० लाख जप्त

>> सूत्रधारासह ११ संशयितांना अटक >> अधीक्षक चंदन चौधरी यांची कारवाई गेले महिनाभर पेडणे तालुक्यातील जुगारासंबंधी प्रसिद्धी माध्यमातून होत असलेल्या चर्चेची गंभीर दखल घेत उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांनी सहकारी पोलिसांच्या मदतीने विठ्ठलदासवाडा, मोरजी – पेडणे येथील रेजिनाल्ड डिकॉस्ता यांच्या घरावर धाड घालून मटका अड्डा उद्ध्वस्त केला. या धाडीत सुमारे ५९,३२,५०० रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात मटका साहित्य आणि ... Read More »

कारवार येथे भीषण अपघातात ३ ठार

पोळे चेक नाक्याजवळ माजाळी – कारवार महामार्गावर भरधाव पर्यटक स्वीफ्ट कारने वीज खांबाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ३ माणसे जागीच ठार झाली. हा अपघात काल संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला. कारवार येथील केए – ३० – ए – ११९४ क्रमांकाची पर्यटक स्वीफ्ट कार पोळे चेकनाका ओलांडून सुसाट वेगाने कारवारच्या दिशेने महामार्गावरून जात होती. त्यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ... Read More »

रॉय नाईकची दीड तास चौकशी

राजकारणी-पोलीस-ड्रग्समाफिया यांच्यातील साटेलोटे तपासासाठी एसआयटीने फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांची पोलीस-ड्रग्समाफिया साटेलोटे प्रकरणी दीड तास काल चौकशी केली. गोवा विधानसभेने माजी आमदार मिकी पाशेको यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह समितीने पोलीस-ड्रग्स माफिया साटेलोटेप्रकरणी तयार केलेल्या अहवालात रॉय याच्या नावाचा समावेश आहे. Read More »

अपयश लपवण्यासाठी भाजपकडून आणीबाणी, सर्जिकल स्ट्राइकचे भांडवल

>> कॉंग्रेस नेते रमाकांत खलप यांची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मागील चार वर्षांत सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याने नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भाजपने ४२ वर्षांनंतर आणीबाणीचा दिवस काळा दिवस म्हणून पाळला आणि सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ व्हायरल केला आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी पत्रकार परिषदेत काल केली. देशातील आणीबाणीच्या दिवसाला काळा ... Read More »

भाजप प्रदेशाध्यक्षांविरुद्ध पणजी पोलिसात तक्रार

>> गिरीश चोडणकरांना धमकीचा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना धमकी दिल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्याविरोधात पणजी पोलिसात काल तक्रार दाखल केली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या पणजी गट समितीचे अध्यक्ष प्रसाद आमोणकर यांनी ही तक्रार दाखल केली. भाजपने गेल्या २६ जून रोजी मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना तेंडुलकर यांनी गोवा प्रदेश कॉंग्रेस ... Read More »

अर्जेंटिनासमोर फ्रान्सचे आव्हान

>> फिफा विश्‍वचषकाची बाद फेरी आजपासून रडतखडत बाद फेरीत स्थान मिळविलेला अर्जेंटिना व गटात अपराजित कामगिरी करूनही प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी ठरलेला फ्रान्स यांच्यातील सामन्याने आजपासून फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या ‘अंतिम १६’ फेरीला सुरुवात होत आहे. बाद फेरी असल्याने पराभूत होणार्‍या संघाला घरचा रस्ता धरावा लागणार आहे. त्यामुळे विश्‍वचषक स्पर्धेतील चुरस वाढणार आहे. गट फेरीत एखादी चुक महागात पडली नसेल परंतु, ... Read More »

बेल्जियमची इंग्लंडवर मात; गटात अव्वल

अदनान जानुझाजने दुसर्‍या सत्रात नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर बेल्जियमने जेतेपदाचे प्रमुख दावेदार असलेल्या इंग्लंडला गटफेरीतील शेवटच्या सामन्यात पराभवाचा धक्का देत आपल्या सलग तिसर्‍या विजयासह ९ गुणांसह विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘जी’ गटात अव्वल स्थान मिळविले. ६ गुण मिळविलेल्या इंग्लंडला दुसर्‍या स्थानी समाधान मानावे लागले. आता बाद फेरीत इंग्लंडचा सामना ३ जुलै रोजी कोलंबियाशी तर बेल्जियम संघ २ जुलै रोजी आशियाई संघ ... Read More »

प्रवेश तर घेतला, पण नियोजन महत्त्वाचे!

 प्रा.रामदास केळकर एखादी गोष्ट मिळविण्यासाठी तुमच्या मनात इच्छा उत्पन्न होते, पण ती इच्छा उद्दात्त असावी ह्यासाठी नियोजनावर भर द्या आणि त्याला कृतीची जोड द्या. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आपल्या नियोजनात शारीरिक व्यायाम, योग, प्राणायामाचा समावेश, नियमित वृत्तपत्रातील अग्रलेख, लेखांचे वाचन, ज्ञान वाढविण्यासाठी एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे, तज्ञ लोकांची चर्चा ऐकण्यासाठी टीव्हीचा कार्यक्रम बघणे यांचाही अंतर्भाव असायला हवा. स्व-विकासावर आधारित नामवंत ... Read More »