ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 17, 2018

युद्धविराम का?

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांशी रमझानच्या महिन्यात युद्धविराम करावा अशी मागणी जम्मू व काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत तशी मागणी झाल्याचेही मेहबुबांनी आपला हा प्रस्ताव पुढे रेटताना सांगितले. खरे तर सर्वपक्षीय बैठकीत ही मागणी केवळ एका सदस्याने केली होती. नेहमीच फुटिरतावाद्यांची कड घेत आलेल्या रशीद इंजिनिअर ह्या अपक्ष आमदाराने ती केली होती आणि ... Read More »

हे फलित नव्हे काय?

शैलेंद्र देवळाणकर व्यापारातील तूट कमी करण्याची जबाबदारी चीनवर टाकून जमणार नाही. मात्र भारताला यापुढे काळजीपूर्वक आणि संपूर्ण तयारीनिशी हा मुद्दा निकाली काढावा लागणार आहे. भारताला आपली ओळख ही स्वस्त आणि गुणवत्तापूर्वक साहित्य उत्पादक देश म्हणून निर्माण करावी लागणार आहे. केंद्रातील मोदी सरकारला येत्या २७ मे रोजी चार वर्षे पूर्ण होतील. या सरकारच्या कामकाजाचे मूल्यमापन करताना नेहमीच पंतप्रधानांनी केलेल्या विदेश दौर्‍यांवर ... Read More »

तळीत बुडून ३ मुलांचा दुर्दैवी अंत

>> नागेशी येथे देवस्थानच्या तळीत दुर्घटना >> बुडालेली मुले मंगळूर – कर्नाटकातील नागेशी येथील नागेश देवस्थानच्या समोर असलेल्या तळीत काल बुधवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ३ मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अदिती वेंकटेश भट (१२), भुवनेश्वर वेंकटेश भट (८) व श्रावण होला (७) अशी बुडून अंत झालेल्या मुलांची नावे आहेत. मृत झालेली तिन्ही मुले मंगळूर – कर्नाटक येथील असून कुटुंबीयांसोबत ... Read More »

कर्नाटक : येडियुरप्पांचा आज शपथविधी

कर्नाटकात सरकार स्थापन करण्यावरून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून राज्यपाल वजुभाई वाला यांनी सर्वाधिक १०४ जागा जिंकणार्‍या भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान, बी. एस. येडियुरप्पा आज सकाळी ९ वाजता कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, शपथविधीला स्थगिती देण्यासाठी कॉंग्रेस-जेडीएसने सर्वोच्च न्यायालयात धाव ... Read More »

ग्रेटर पीडीएतून १० गावे वगळली

>> नगरनियोजन मंत्र्यांची माहिती ग्रेटर पणजी पीडीएतून सांताक्रुज आणि सांत आंद्रे या दोन मतदारसंघांतील १० गावे वगळण्याचा निर्णय नगरनियोजन मंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला आहे. नगरनियोजन कायद्यात काळानुरूप आवश्यक दुरुस्तीचा प्रस्ताव आहे, असे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ग्रेटर पणजी पीडीएमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून गावांचा समावेश करण्यात आला होता. आता स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार १० गावे ... Read More »

एटीएममधून २८ लाख उकळणार्‍या एटीएम कर्मचार्‍याला वास्कोत अटक

एटीएम मशीनमध्ये पैसे भरणार्‍या ‘लॉजीकॅश’ सोलूशन प्रा. लि. व्यवस्थापनात काम करणार्‍या २६ वर्षीय शिवानंद मस्तोली याने व्यवस्थापनाला २८ लाख रुपयांना गंडवल्याने त्याला अटक करण्यात आली. शिवानंदने २८ लाख रुपये लुटल्याची तक्रार ३ मे रोजी वास्को पोलीस स्थानकात करण्यात आली होती. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक नालास्को रापोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे २०१८ रोजी लॉजीकॅश सोलूशन प्रा. लि. व्यवस्थापनाने केलेल्या तक्रारीला ... Read More »

मुंबईचा थरारक विजय

>> कायरन पोलार्डचे अर्धशतक >> जसप्रीत बुमराहचा प्रभावी मारा मुंबई इंडियन्सने आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना काल बुधवारी किंग्स इलेव्हन पंजाबवर ३ धावांनी विजय मिळविला. राहुलचा कडवा प्रतिकार मोडून काढत मुंबईने इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील या ५०व्या सामन्यात विजय नोंदवून गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली. विजयासाठी १८७ धावांचा पाठलाग करताना पंजाब संघाला १८३ धावांपर्यंतच पोहोचता आले. राहुलने ६० चेंडूंचा सामना ... Read More »

केव्हिन ओब्रायन ६६व्या स्थानी

आयर्लंडचा ३४ वर्षीय अष्टपैलू केव्हिन ओब्रायन याने आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ‘टॉप १००’मध्ये प्रवेश करताना ४४० गुणांसह ६६वा क्रमांक मिळविला आहे. आयर्लंडच्या पदार्पणाच्या कसोटीत केव्हिनने पहिल्या डावात ४० व दुसर्‍या डावात ११८ धावा करत सामनावीर पुरस्कार पटकावला होता. आयर्लंडच्या दुसर्‍या डावात ५३ धावांची खेळी केलेल्या स्टुअर्ट थॉम्पसन याने २१८ गुणांसह १२५वा क्रमांक मिळविला आहे. गोलंदाजांमध्ये टिम मुर्ताघ याने (४५-४ ... Read More »

महिला हॉकी संघाचा चीनवर विजय

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आपला दमदार फॉर्म कायम राखताना भारताच्या महिला संघाने क्रमवारीत आपल्यापेक्षा वरच्या स्थानी असलेल्या चीनवर काल ३-१ असा विजय मिळविला. भारताकडून वंदना कटारिया (चौथे व ११वे मिनिट) हिने दोन तर गुरजीत कौरने एक गोल केला. चीनचा एकमेव गोल वेन डान हिने १५व्या मिनिटाला नोंदविला. जागतिक क्रमवारीत भारतीय संघ दहाव्या तर चीनचा संघ आठव्या स्थानी आहे. भारताचा पुढील ... Read More »